Author Archives: Kokanai Digital
आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 25:11:42 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 11:48:41 पर्यंत
- करण-वणिज – 14:29:58 पर्यंत, विष्टि – 25:11:42 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वरियान – 18:47:12 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:04
- सूर्यास्त- 18:00
- चन्द्र-राशि-मीन – 11:48:41 पर्यंत
- चंद्रोदय- 14:33:00
- चंद्रास्त- 27:37:00
- ऋतु- हेमंत
- १६८७: ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास मध्ये सर्वात आधी महानगरपालिका बनवली होती.
- १८१६: इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.
- १८४५: पहिले आंग्ल-सिख युद्ध झाले होते.
- १८५८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आणि यदुनाथ बोस हे कलकत्ता विश्वविद्यालयामधून पहिले पदवीधर बनले.
- १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
- १९३७: इटली ने मित्र राष्ट्र संघ ला सोडले.
- १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४६: डॉ. राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे निर्वाचित अध्यक्ष बनले होते.
- १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
- १९४६: स्पेन या देशाला संयुक्त राष्ट्र संघाने निलंबित केले.
- १९६०: लहान मुलांच्या विकासकामाला लागलेली संस्था युनिसेफ च्या सन्मानासाठी १५ नवीन टपाल तिकिटांची निर्मिती सुरु केली होती.
- १९६४: संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफ ची स्थापना.
- १९६७: कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
- १९७२: अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
- १९९४: अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
- २००१: चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
- २००३: मेरिदा येथे ७३ देशांनी भ्रष्टाचार विरोधी करारावर सह्या केल्या.
- २००७: उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या मध्ये ५० वर्षानंतर पुन्हा रेल्वे सेवा पुर्वव्रत.
- २०१४: भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या योग दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेने स्वीकृती दिली होती.
- १८१०: फ्रांस चे प्रसिद्ध कवी अल्फ्रेड डोमोसे यांचा जन्म.
- १८४३: रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)
- १८६७: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)
- १८८२: सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
- १८९२: अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ – १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ – १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ – १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ – १९६६), पद्मविभूषण (१९७७)
- १८९९: पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक (मृत्यू: ? ? ????)
- १९०९: नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
- १९१५: मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)
- १९२२: मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
- १९२५: राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)
- १९२९: सुभाष गुप्ते – लेगस्पिनर (मृत्यू: ३१ मे २००२)
- १९३१: भगवान श्री रजनीश (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
- १९३५: भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म.
- १९४२: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (मृत्यू: २६ मार्च १९९९)
- १९६९: विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
- १९८२: ला तमिळ चे प्रसिद्ध लेखक सुब्रह्मण्य भारती यांचा जन्म.
- २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.
- १७८३: रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)
- १९३९: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचे निधन.
- १९४९: प्रसिद्ध विचारक आणि लेखक कृष्णचंद्र भट्टाचार्य यांचा जन्म.
- १९८७: गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
- १९९८: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
- २००१: झांबिया देशाचे पहिले पंतप्रधान मेन्झा चोना यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९३०)
- २००१: रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
- २००२: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
- २००४: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
- २०१३: भारतीय तत्त्ववेत्ता आणि विद्वान शेख मुसा शरीफी यांचे निधन.
- २०१५: भारतीय चित्रकार आणि मूर्तिकार हेमा उपाध्याय यांचे निधन.
सिंधुदुर्ग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व दीपकभाई केसरकर यांना घेऊन २७ जून २०१५ सावंतवाडी टर्मिनसचा शिलान्यास केला होता. तेव्हा कोकणी जनता आणि मुंबईस्थित चाकरमानी या घटनेने सुखावले होते, मात्र त्यानंतर या टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत पूर्ण झाले नाही आहे. २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ असा नारा त्यांनी दिला होता. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते नुसते आलेच नाही तर पक्षाच्या विक्रमी जागांसह सत्तेवर आले आहेत. त्यामुळे आता तरी ते सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करतील अशी आशा समस्त कोकणकरां कडून करण्यात येत आहे.
आता नाही तर कधीच नाही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासासाठी पोषक राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात केंद्रात आणि राज्यात महायुतीचा दबदबा आहे. जिल्हय़ातील सर्वच आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनस आणि ईतर रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी एक सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खासदार नारायण राणे आणि सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगले संबध निर्माण झाले आहेत. आमदार दिपक केसरकर यापुर्वीपासूनच सावंतवाडी टर्मिनस साठी आग्रही आहेत आणि त्यांच्या परीने ते त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सावंतवाडी टर्मिनस साठी लागणार्या पाण्यासाठी तिलारी प्रकल्पातून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत असल्याचेही मागे सांगितले होते. मात्र त्यासाठी मोठी दिरंगाई होताना दिसत आहे. सध्याची केंद्रीय, राज्यातील आणि जिल्हय़ातील राजकिय परिस्थिती पाहता हे काम पूर्ण करून घेण्यासाठी हीच नामी संधी आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी चा पाठपुरावा
सावंतवाडी येथे टर्मिनस व्हावे, येथे महत्त्वाच्या गाडय़ांना थांबा मिळावा आणि ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने प्रयत्न करत आली आहे. विविध माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यासाठी जनजागृती केली तर आहे त्याबरोबरच आपला मागण्या प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी संघटना आग्रही आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येवून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. २०१५ साली त्यांनी सावंतवाडी टर्मिनसचे जे स्वप्न त्यांनी कोकणी जनतेला दाखवले होते ते लवकरच पूर्ण करतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.
Konkan Railway Updates:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. तब्बल सहा गाड्यांच्या डब्यांच्या बदल करण्यात येणार असून खासकरून या गाड्यांचे जनरल डबे कमी करण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे.
१६३३४ / १६३३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, 3 टियर एसी इकॉनॉमी – ०२ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०४ , पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, ३ टियर एसी इकॉनॉमी – ०३ ,स्लीपर – ०७ ,जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०२ डिसेंबर २०२४ ते २६ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
१६३१२/ १६३११ कोचुवेली – श्रीगंगानगर -कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल -०४, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०७,जनरल – ०३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६३४ / २२६३३ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०३, स्लीपर – ०६,जनरल – ०४, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१
दिनांक ०४ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५३ / २२६५४ तिरुवनंतपुरम सेंट्रल – एच. निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -०४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६,जनरल -0२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०७ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५५ / २२६५६ एर्नाकुलम जं. – एच. निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०३, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०५, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०७, स्लीपर – ०४ ,जनरल – २, जनरेटर कार – ०२
दिनांक ११ डिसेंबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२२६५९ / २२६६० कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश – कोचुवेली एक्सप्रेस
सध्याची रचना – टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०४, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ४, जनरेटर कार – ०२
सुधारित रचना -०२, थ्री टियर एसी – ०६, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०४, स्लीपर – ०६ ,जनरल – ०२, जनरेटर कार – ०२
दिनांक ०६ डिसेंबर २०२४ ते २३ डिसेंबर २०२४ पर्यंत या बदलानुसार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 27:45:08 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 13:31:09 पर्यंत
- करण-तैतुल – 16:56:36 पर्यंत, गर – 27:45:08 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-व्यतापता – 22:02:30 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:03
- सूर्यास्त- 18:00
- चन्द्र-राशि-मीन
- चंद्रोदय- 13:52:59
- चंद्रास्त- 26:36:00
- ऋतु- हेमंत
- अल्फ्रेड नोबेल दिवस
- १७९९: ला जगात सर्वात आधी फ्रांसने आजच्या दिवशी मेट्रिक सिस्टम चा उपयोग केला.
- १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.
- १८८७: ला आस्ट्रिया, हंगरी, इटली और ब्रिटेन या देशांनी बाल्कन सैन्य करारावर सह्या केल्या.
- १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
- १९०२: तस्मानिया मध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
- १९०२: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.
- १९०३: पियरे क्यूरी और मैरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.
- १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
- १९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- १९४८: मानवी हक्क दिन.
- १९६२: ला नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट लूथली यांनी दक्षिण आफ्रिकी मध्ये वर्णभेद समाप्त करण्याची अपील केली.
- १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
- २०००: ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तान मधून १० वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
- २००२: ला अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी यूनाइटेड एयरलाइंस पूर्णपणे कंगाल घोषित करण्यात आली.
- २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
- २००४: ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.
- २००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
- २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
- १८७०: सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)
- १८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
- १८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)
- १८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)
- १९०८: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तसेच पुरातत्व विज्ञान मध्ये तज्ञ असलेले हसमुख धीरजलाल संकलीया यांचा जन्म.
- १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.
- १९२८: लोक सभेचे सदस्य चंद्रकांत भंडारे यांचा जन्म.
- १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.
- १९६०: भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा जन्म.
- १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू धवल कुलकर्णी यांचा जन्म.
- १८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
- १९२०: होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)
- १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)
- १९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
- १९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
- १९६३: सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
- १९६३: आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केले.
- १९९२: भारताच्या गुजरात मध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.
- १९९४: यासिर अराफात, यित्जाक रॉबिन आणि शिमोन पेरेज यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १९९५: स्वातंत्र्य सैनिक चौधरी दिगंबर सिंह यांचे निधन.
- १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)
- २००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)
- २००३: श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????
- २००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)
आजचे पंचांग
- तिथि- अष्टमी – 08:04:55 पर्यंत, नवमी – 30:03:56 पर्यंत
- नक्षत्र- पूर्वाभाद्रपद – 14:56:52 पर्यंत
- करण- भाव – 08:04:55 पर्यंत, बालव – 19:06:47 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग- सिद्वि – 25:05:09 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:03
- सूर्यास्त- 18:00
- चन्द्र राशि- कुंभ – 09:15:24 पर्यंत
- चंद्रोदय- 13:15:00
- चंद्रास्त- 25:37:00
- १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
- १७५८: मद्रास मध्ये सुरु झालेल्या तेरा महिन्यांच्या युद्धाला सुरुवात.
- १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
- १८९८: बेलूर मठाची स्थापना झाली.
- १९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
- १९२४: हंगेरी आणि हॉलंड या दोन देशांमध्ये व्यापार करार झाला होता.
- १९४१: चीन ने जर्मनी, इटली, आणि जपान यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
- १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
- १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
- १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
- १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
- १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
- १९७५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
- १९९८: शेन वार्न और मार्क वॉ या दोघांनी १९९४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना एका पाकिस्तान सट्टेबाजा कडून काही रक्कम घेतल्याची कबुली केली.
- २००२: जॉन स्नो अमेरिकेचे नवीन अर्थमंत्री बनले.
- २००६: पाकिस्तान ने अणु क्षमता असलेले क्षेपणास्त्र हत्फ़-3 गजनवी चे यशस्वी प्रक्षेपण केले.
- २००७: पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकारे त्यांचे संबंध समाप्त केले.
- २००८: इस्त्रो ने युरोप च्या प्रसिद्ध कंपनी एडीएम एस्ट्रीयस साठी नवीन उपग्रहाचे निर्माण केले होते.
- २०१३: इंडोनेशिया मेंबिनटारो च्या जवळ एका ट्रेन अपघातात ६३ लोक जखमी झाले होते.
- १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.
- १४७८: भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.
- १६०८: जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
- १८२५: भारताचे प्रमुख नायक राव तुला राम यांचा जन्म.
- १८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)
- १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
- १८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
- १८८९: मध्ये आसाम मधील प्रथम असहयोगी चळवळीतील नेते चन्द्रनाथ शर्मा यांचा जन्म.
- १९१३: पहिली महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म.
- १९१८: भारताचे प्रसिद्ध नाटककार कुशवाहा कान्त यांचा जन्म.
- १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.
- १९२२: अमेरिकेचे हास्यकलाकार रेड फॉक्स्स यांचा जन्म.
- १९२९: प्रसिद्ध भारतीय कवी रघुवीर सहाय यांचा जन्म.
- १९४६: सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
- १९४६: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.
- १९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.
- १७६१: हंबीरराव मोहिते यांच्या पुत्री ताराबाई यांचे निधन.
- १९७१: भारतीय नौसेना सैनिक महेंद्रनाथ मुल्ला यांचे निधन.
- १९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)
- १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
- १९९७: के. शिवराम कारंथ – कन्नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
- २००७: भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
- २००९: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.
- २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)
- pacer height=”20px”]
Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.
स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –
1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.
3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.
4- EN मानकांच्या अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.
5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.
6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.
7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.
8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.
9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.

आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 09:46:31 पर्यंत
- नक्षत्र-शतभिष – 16:03:47 पर्यंत
- करण-वणिज – 09:46:31 पर्यंत, विष्टि – 20:58:12 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वज्र – 27:53:05 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:02
- सूर्यास्त- 17;59
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 12:37:59
- चंद्रास्त- 24:40:00
- ऋतु- हेमंत
- जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.
- १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
- १९२३: अमेरिका आणि जर्मनी मध्ये मित्रासंधी होऊन हस्ताक्षर झाले होते.
- १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
- १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
- १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
- १९५६: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ऑलंपिक खेळांचा समारोप झाला.
- १९६७: आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
- १९७१: भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
- १९७६: अमेरिका ने नेवादा येथे अणुबॉम्ब चाचणी केली होती.
- १९८०: इंग्रजी संगीतकार जॉन लेलेन यांना त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
- १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
- १९९८: कर्नल ह्यूगो शावेज यांनी व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
- १९९८: ऑलंपिक च्या इतिहासात महिलांचा बर्फावर खेळल्या जाणारा हॉकी खेळाला खेळल्या गेले.
- १९९८: फिनलँड ने स्वीडन ला ६-० ने बर्फावरील खेळल्या जाणाऱ्या हॉकी मध्ये हरवले होते.
- २०००: ब्रिटन आणि रशिया या दोन देशांत सुरक्षा करार पार पडला.
- २००३: जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये निलंबना चा काळ वाढविल्यामुळे झिंबाब्वे ने स्वतःला वेगळे करून घेतले.
- २००३: वसुंधरा राजे ह्या राजस्थान च्या मुख्यमंत्री बनल्या.
- २००३: उमा भारती ह्या मध्य प्रदेश च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
- २००४: पाकिस्तान ने ७०० किलोमीटर दूर मारा करणारी शाहीन-१ नावाच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी रित्या परीक्षण केले.
- २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
- २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
- २००७: अमेरिकी संघटना NATA ने दक्षिणी अफगानिस्तान च्या मुसाकला जिल्ह्यात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांवर हल्ला केला होता.
- २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
- १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)
- १७६५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
- १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)
- १८७५: भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
- १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (मृत्यू: १ मार्च १९५५)
- १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)
- १८९७: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
- १९००: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)
- १९०१: भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
- १९२७: पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा जन्म.
- १९३५: धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
- १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
- १९४४: शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री.
- १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म
- १९४७: भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.
- १९७८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)
- २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
- २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
- २०१५: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.











