कोकण रेल्वेच्या गाड्यांत जास्त मागणी आणि मर्यादित आसन उपलब्धता यामुळे वर्षभर गर्दी होत आहे. सध्या कोंकण रेल्वे मार्गाचा वापर दर Utilization Rate 168% आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर ट्रेनची क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे. सध्या कोकणरेल्वे, मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या विभागातर्फे कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या काही गाड्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत नसून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वाव आहे. कोकण विकास समितीने रेल्वे बोर्ड, विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री आणि संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिधींना या गोष्टीसाठी एक इमेलद्वारे मागणी केली आहे. या मागणी मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील ज्या गाडयांची क्षमता वाढवता येणे शक्य आहे अशा गाड्यांची यादी आणि बदलांच्या शिफारशी देण्यात आल्या आहेत.
या शिफारशींची पूर्तता केल्याने अंदाजे 3,691 आसनांची (दररोज सुमारे 46 डबे) क्षमता वाढेल, ज्यामुळे प्रवाशांची सोय लक्षणीयरीत्या वाढेल आणि या अत्यंत वापरल्या जाणाऱ्या मार्गावरील गर्दी कमी होईल. नवीन रेल्वे सेवेची मागणी पाहता, या वाढीमुळे प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल असे कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर यांनी या ई-मेल मध्ये नमूद केले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेसचा अपघात होता होता टळला; लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेचे कौत...
अपघात
गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्या जादा गाड्या परतीच्या प्रवासात मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात -...
कोकण
''नुसताच बाकड्यावर बसणारा...'' राज ठाकरे यांचे कणकवलीतील जाहीर सभेतील संपूर्ण भाषण
कोकण
Vision Abroad