Author Archives: Kokanai Digital

‘त्या’ ओव्हर नंतर अर्जुन तेंडुलकर होतोय ट्रोल; नक्की काय म्हणत आहेत नेटकरी? इथे वाचा…

सध्या क्रिकेट चाहत्यामंध्ये आयपीएलचा फिव्हर आहे. सोशल मीडियावर तर या संदर्भात दिवसाला हजारोने पोस्ट व्हायरल होताना दिसतात. कोण चांगला खेळाला, कोण वाईट खेळाला याची चर्चा तर होतेच. असाच एक विषय सध्या सोशल मीडिया वर खूप गाजतोय तो म्हणजे अर्जुन तेंडुलकरची एक वाईट ओव्हर. पंजाब विरुद्ध खेळताना एका ओव्हरमध्ये त्याने ३१ रन दिलेत आणि तो सोशल मीडियावर एक महत्वाचा विषय बनला. या संदर्भात क्रिकेट चाहते दोन्ही बाजूनी आपली आपली मते मांडत आहेत. त्यातील काही कंमेंट्स आपण खाली बघू.
@nilzalte
अर्जुन तेंडुलकरने एका ओव्हरमध्ये 31 रन दिल्या. 
अर्शदिप सिंहनं अटीतटीच्या ओव्हरमध्ये दोन स्टंप तोडून केवळ दोन रन दिल्या. 
टॅलेंट इसे कहते है! बाकी आप समझदार है.
@prashantsuroshi
स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने ६ सिक्स मारले होते पण आज तो जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोक्सला ५ सिक्स मारले होते आज स्टोक्स कुठे पोहोचला आहे आणि कार्लोस कुठे आहे ? बॉब विलीसला संदीप पाटील ने ६ फोर्स मारले होते पण तरी तो इंग्लडच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी आहे. प्रत्येकाचा दिवस असतो हो. इतक्या लवकर निष्कर्ष काढून काय होणार आहे. 
@हेमन्त१८५६
युवराज सिंग ने स्टुअर्ट ब्रॉड ला एका षटकात सहा षटकार मारले होतें,कसोटी सामन्यांमध्ये याच ब्रोडने
पुढे 576 बळी घेतले आहेत.
@rohitjangam01
अनुभव येण्यासाठी काही सामने खराब जावे लागतात, सगळेच पहिल्या प्रयत्नात यशस्वी होतीलच अस नाही. मुळात तुलना होऊ नये. प्रत्येक खेळाडू हा चांगल्या किंवा वाईट परिस्थितितून शिकण्याचा व त्यातून चांगल देण्याचा प्रयत्न करत असतो.
@ivikas_bhartiya
Arjun Tendulkar conceded 31 runs in the 16th Over. He is a brilliant bowler but his ups and downs will make him a better player. Stop trolling and give Support.
@Nidhin_B_
Here we gooo.. The result of nepotism, 31 runs in one over and he couldn’t handle the pressure.  
I’ve seen lot of players coming in support of Arjun, and speaking against 
SanjuSamson
. Yeah he’s not a nepo product
@Msabzar2
Surprised to c mumbai playing handicaped Arjun tendulkar in their squad. Sachin Tendulkar shouldn’t let his son play this game. He is not worth it

Loading

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण सोमवारपासून; परिसरात शासनाचा जमावबंदी आदेश लागू

रत्नागिरी – कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवारपासून केली जाणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.
सोमवारी २४ एप्रिल म्हणजे उद्यापासून हे ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
 ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग’ विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत. याबाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरुपाची आंदोलने केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, चिथावणी देणे, समान उद्देशासाठी बेकायदेशीर जमाव जमवून त्यात सामील होणे, इच्छा पूर्वक दुखापत पोहोचविणे, नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आवेग करणे, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेऊन हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/04/बारसू-बंदी-आदेश.pdf” title=”बारसू बंदी आदेश”]

Loading

पर्यटन महामंडळाचा फिलोशिप उपक्रम; पर्यटनात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी संधी, मिळणार ४० हजार रुपये दरमहा!

मुंबई  – महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.
या फेलोशिप उपक्रमासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून  २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या फेलोशिप उपक्रमातील विषयात पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. फेलोशिपसाठी उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये  प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत. फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक यांच्या [email protected] आणि [email protected] या ईमेल पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे.
एमटीडीसीच्या फेलोशिप उपक्रम २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातील अभ्यास आणि सेवा, संशोधन, पर्यटन आधारित संस्था आणि पुढाकार विकसित करणे, प्रशिक्षण आणि फेलोची वाढ करणे समाविष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय विकास, विपणन, रेस्टॉरंट ऑपरेशन्स, जलपर्यटन, विधी, विशिष्ट आणि अनुभवात्मक पर्यटन, टूर पॅकेजेस, प्रशिक्षण, पर्यटन पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट अकाउंटिंग, पर्यटन नावीन्यपूर्णप्रकल्प, बैठका, परिषद, प्रोत्साहन आणि प्रदर्शन (MICE) यासारख्या एमटीडीसीच्या विविध विभागांमधील तज्ज्ञांच्या आवश्यकतेमधील अंतर कमी करण्यास सहाय्य होणार आहे. समाज माध्यम, निर्मिती-ब्रॅंडींग-डिझाइन, डिजिटल मार्केटिंग-प्रसिद्धी- आंतरराष्ट्रीय संबंध, सामान्य व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, महसुली यंत्रणेत सुधारणा आणि उत्पन्न व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील तरुणांकडून, त्यांची तंत्रज्ञानाची आवड आणि नवीन दृष्टीकोन मिळवणे इत्यादी बाबी या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आल्या आहे. 

Loading

बंदी असतानाही भोस्ते येथील धोकादायक जगबुडी पुलावरून अवजड वाहतूक चालूच; सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी – भोस्ते जगबुडी पूल धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला होता. त्यानुसार हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसा सूचना फलकही पुलाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आला आहे. मात्र या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. रात्री-अपरात्री व सकाळच्या सुमारास वाळूचे डम्पर याच पुलावरून राजरोसपणे धावत आहेत. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लाल फितीतच अडकून पडला पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह स्वयंसेवी संस्था व प्रशासनाकडे सातत्याने पक्षांनी पत्रव्यवहारही पुलाच्या दुरुस्तीसाठी कुठलीच ठोस पावले उचललण्यात आलेली नाहीत. सरकारने दुर्लक्ष केल्यास सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही 
शहरातून चिपळूण तसेच खाडीपट्ट्यातील शिवभागातील सुमारे १५ ते २० गावांना जवळचा रस्ता म्हणून या पुलाचा वापर केला जातो. या पुलाचे बांधकाम सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. सद्यःस्थितीत रेल्वस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा पूल अत्यंत महत्वाचा आहे; मात्र हा अरुंद असल्याने तसेच कुमकुवत असल्याने या पुलावरून अवघड वाहनातून राजरोसपणे खडी, वाळू तसेच खासगी बसेसच्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा पूल कमकुवत होऊ नये यासाठी भोस्ते गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेतला होता. बांधकाम विभागाने या पुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घातली होती .

Loading

गुंगीचे औषध देऊन रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला लुटले

रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याची लूट करण्याचा प्रकार रत्नागिरी स्थानकावर घडला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही घटना शुक्रवारी दिनांक ०७ एप्रिल रोजी घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे थांबली असता दोन अनोळखी प्रवाशांनी ओळख वाढवून  या प्रवाशाला शितपेय पिण्यास दिले. या शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे त्या प्रवाशालागुंगी आली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पाकिटातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन पळवली. याप्रकरणी प्रवाशाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत. ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात भादवि कलम ३२८,३६९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

मुंबई-गोवा महामार्गावरील वेत्ये येथे खाजगी बसला अपघात; चालकासह क्लिनर जखमी

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे काळ शुक्रवारी एक च्या सुमारास  एका खाजगी बस ला अपघात झाला. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्ता सोडून रस्त्यालगत असलेल्या खाईत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातझालेल्या अपघातात चालकासह क्लिनर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक  ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. संबंधित बस गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होती. अपघातात जखमी झालेल्या चालक व क्लीनरला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाईत घसरल्यामुळे बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Loading

सोन्याच्या शुद्धतेबद्दल साशंक? बीआयएसच्या ‘या’ मोबाईल ऍप्लिकेशनवर शुद्धता तपासा

Gold Purity Test – आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे.

या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे.

बीआयएस केअर ॲप कसे डाउनलोड करावे?

अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन बीआयएस केअर ॲप असे सर्च करावे आणि ते ॲप इन्स्टॉल करावे

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपले नाव फोन नंबर आणि ईमेल आयडी एंटर करावा.

ओटीपीचा वापर करून आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी कन्फर्म करावा.या ॲपचा वापर करून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत चाचणी करू शकता. या ॲपमध्ये व्हेरिफाय HUID नावाचे फीचर आहे. तुम्ही विकत घेतलेले सोन्याचे दागिने जर हॉलमार्क सहित असतील तर तुम्ही व्हेरिफाय HUID वापर करू शकता. 

HUID नंबर म्हणजे काय? 

एक जुलै 2021 रोजी भारत सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचे सिम्बॉल बदलले. या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यांवर तीन सिम्बॉल असतील.

1. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचा हॉलमार्क

2. सोन्याची प्युरीटी ग्रेड

3. सहा आकडी अल्फा न्यूमेरिक HUID नंबर

HUID नंबर हा इंग्रजी अक्षरे आणि अंक यांच्यापासून बनलेला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करताना दागिन्याच्या प्रत्येक तुकड्याला HUID नंबर दिला जातो. हा नंबर युनिक असतो. ज्वेलरीवर हा नंबर स्टॅम्प केलेला असतो.

31 मार्च 2023 नंतर  सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.

जर तुम्हाला आपण खरेदी केलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत, हॉलमार्कबाबत काही तक्रार असेल तर ती तुम्ही या ॲपचा वापर करून दाखल करू शकता.

 

Loading

कोंकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार एकमार्गी विशेष गाडी

Konkan Railway News: दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कोंकण रेल्वे मार्गावर कासरगोड ते निजामुद्दीन दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. .

 कसारगोड  निजामुद्दीन स्पेशल (06007) ही वनवे  गाडी दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 17:05 वाजता सुटेल आणि दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी 18:00 वाजता पोहोचेल.

या गाडीचे मडगाव स्थानकापासून थांबे
मडगाव करमाळी थिवी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर,सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा,पनवेल, कल्याण नाशिक मार्गे इटारसी, मथुरा

डब्यांची संरचना

एसएलआर – 02  + सेकंड सीटिंग – 10 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण 23 डबे







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

केरळमध्ये रेल्वेचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या ‘या’ गाड्यांवर परिणाम

संग्रहित फोटो

Konkan Railway News | दक्षिणेकडील केरळ राज्यातील करुकुट्टी – चालाकुडी या रेल्वेस्थानकां दरम्यान  दिनांक २७ एप्रिल रोजी  एक दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.

कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

12202 – कोचुवेली – एलटीटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक २७/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.
12201 – एलटीटी – कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी दिनांक २८/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.

तर गाडी क्रमांक 20923 तिरुनवेल्ली गांधीधाम एक्सप्रेस दिनांक २७/०४/२०२४ रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून तिच्या दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे, कोकणातील स्थानकांच्या थांब्यामध्ये काही बदल केला गेला नाही आहे.

प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाच्या योजनेत बदल करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात

रत्नागिरी – मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पुलावर काल गुरुवारी  सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी  निर्माण झालेली होती. हा अपघात गुरुवार सकाळी 10:50 च्या दरम्यान घडला आहे.पुलावर अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे. 
सोनवी पूल हा अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी कों होते. काही दिवसापूर्वी
या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्री च्या दिशेने जाणारे क्रेटा गाडी आणि रत्नागिरी हुन डेरवणला च्या दिशेने जाणारी गाडी या गाड्यांमध्ये अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search