Author Archives: Kokanai Digital
रायगड: काल दिनांक-२८ जुलै २०२४ रोजी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने मुंबई गोवा महामार्ग पूर्णतःवासाठी विधित महायज्ञ माणगाव येथे ११ महंत आणि समस्त कोकणकरांच्या उपस्थितीत पार पडला.

मागील १७ वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधीना,शासनाला आणि प्रशासनाला सुद्बुद्धी देवो असे यावेळी समस्त कोकणकरांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आले. तसेच महामार्गांवर गेलेल्या हजारो लोकांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या महायज्ञास कोकणातील अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

काल येथे जमलेल्या कोकणकरांनी शांततेत गणरायाचे पूजन करून, साकडे घालून शासनाला विनंती करण्यात आली मात्र या १५ दिवसात कामाला गती न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमरण उपोषणात तीव्र संताप व्यक्त करण्यात येईल व वेळ आल्यास माणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून पर्यंत स्वतः मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेण्यात असल्याची माहिती समितीचे सचिव श्री. रुपेश दर्गे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग, २७ जुलै: सध्या संपूर्ण जग आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत असून त्याद्वारे विकासाचे पुढच्या टप्प्यात जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI च्या जगात कित्येक क्षेत्रात मोठे बदल अनुभवण्यास येत आहेत. मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही समाज विघातक प्रवृत्त्या वापरकर्त्यांची फसवणूक करून आपला फायदा करून घेत असल्याच्या कित्येक घटना समोर येत आहेत.
अलीकडे रत्नागिरी जिल्हय़ात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल अॅप च्या माध्यामातून फसवणूक करण्याचे प्रयत्न झाल्याची घटना काल कोकणकरांनी अनुभवली. एका अपरिचित नंबरवरून ‘ सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk’ हे मोबाईल ऍप्लिकेशन ईंन्स्टॉल करा असा व्हाट्सएप्प मेसेज कित्येक जणांना यायला सुरवात झाली. खरेतर असे कोणते ऍप्लिकेशनच नाही आहे. ही गोष्ट निदर्शनास येताच कोकण प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील गैरप्रकार टाळण्यासाठी कंबर कसली. ज्या नंबर वरून हे मेसेज येत होते त्या नंबरवर कॉल करुन नक्की प्रकार काय आहे तो जाणून घेतला. आपला नंबर हॅक झाला असून कोणीतरी दुसराच आपले व्हाट्सएप्प कंट्रोल करत असून हे मेसेज पाठवत असल्याचे त्या नंबरधारकाने कबूल केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबद्दल समाज माध्यमातून जनजागृती केली. ‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ नावाचे कोणतेही मोबाईल ऍप्लिकेशन आपण बनवले नसून त्यासंबंधी असे मेसेज आल्यास त्यावर दुर्लक्ष करावेत आणि तो नंबर ब्लॉक करावा असे आवाहन करणारे मेसेज व्हायरल करण्यात आलेत.
‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ हेच नाव का?
हॅकर्सने सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk हेच नाव का निवडले असेल याबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. साधारणपणे हॅकर्स हे एखाद्या भागातील युजर्सना टार्गेट करण्याआधी त्या भागाचा अभ्यास करतात. त्या भागात सध्या समाज माध्यमांवर कोणता विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात किंवा लोकप्रिय आहे हे हेरतात आणि युजर्सना शंका येणार नाही अशा प्रकारे त्यासंबधित मेसेज पाठवतात. सध्या ‘सावंतवाडीत टर्मिनस व्हावे’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे हॅकर्सने तोच विषय निवडला असल्याची शक्यता आहे.
पुरेशी काळजी घेणे आवश्यक
आपली फसवणूक होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. बनावट अॅप्सवरून आपल्या मोबाइलमधील डाटा ‘हॅक’ केला जाऊ शकतो. त्यामुळे ‘अॅप्स’ घेताना पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.







- १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
- १९१७: कॅनडात आयकर लागू झाला.
- १९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
- १९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
- १९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.
- १९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
- १९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
- १९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
- १९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
- २००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
- २०२०: द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली
- १८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
- १९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)
- १९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
- १९२९: सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
- १८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)
- १९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: ? ? ????)
- २०१२: बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)











