Author Archives: Kokanai Digital
मुंबई : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात आपल्या पक्षास ‘शिंदे गट’ असे न संबोधता ‘शिवसेना’ असे संबोधले जावे अशी विनंती शिवसेनेतर्फे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
हे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.
रत्नागिरी: रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केल आहे.
हेही वाचा >Breaking | संसदेतील शिवसेना कार्यालय एकनाथ शिंदेंच्या ताब्यात
संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिलेले पत्र आपल्या ट्विटटर हँडलवरून ट्विट केले आहे. आपली सुरक्षा हटवण्यात आल्याचा उल्लेखही संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी काय लिहिलं आहे पत्रात?
@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/n3XlVQV8bb
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 21, 2023
नवी दिल्ली :भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भातील पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात आज एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी प्रवेश घेतला.
काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.
मुंबई :मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठा व महत्त्वाचा अपडेट समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार आज, २० फेब्रुवारी २०२३ पासून मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. कामाला जाताना आयत्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून हा नवा बदल नेमका काय आहे हे आधीच सविस्तर जाणून घेऊयात.
प्राप्त माहितीन्वये, जलद मार्गावरील रेल्वे अप व डाऊन दिशेने ज्या १२ डब्यांची रेल्वे गाडी पहिल्या प्लॅटफाॅर्मवर जिथे थांबत होती ती आता १५ डब्यांची रेल्वे जिथे थांबते त्या जागी थांबणार आहे. म्हणजेच १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे बदल लागू असतील.
दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या स्थानकात हे नवे बदल अंमलात आणण्यात आले आहेत. या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. अद्यापही या मार्गावर काही ठराविकच गाड्या १५ डब्याच्या आहेत. विशेषतः लांब पल्ल्याच्या म्हणजेच कर्जत- कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे प्रचंड गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या तरी मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
मुंबई : निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमावलेल्या उद्धव ठाकरे गटाला निलेश राणे यांनी एक उपहासात्मक नवीन चिन्ह सुचवले आहे.
परिस्थिती पाहता आता उद्धव ठाकरे गटाला ‘फावडे’ हे चिन्ह योग्य राहील अशी ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वर केली आहे.
उद्धव ठाकरे 25 वर्षे मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे होती मग मराठी माणसाची टक्केवारी 20% पेक्षा खाली का? मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? उद्धव ठाकरे तुम्हाला मराठी माणसाबद्दल बोलायचा अधिकारच नाही. असेही ते अजून एका ट्विट मध्ये म्हणाले आहेत.
मी ऐकलं उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षासाठी नवीन चिन्ह आणि नाव शोधतायत, माझ्या डोळ्यासमोर त्यांच्यासाठी एकच ऑप्शन आलं. pic.twitter.com/i1RO1iD1Vk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 20, 2023
- 22655 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २२/०२/२०२३
- 22656 – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस, दिनांक २४/०२/२०२३
- 22633 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २२/०२/२०२३
- 22634 – कोयंबटूर एक्सप्रेस, २४/०२/२०२३
- 22653 – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस, २५/०२/२०२३
- 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस, २७/०२/२०२३
रत्नागिरी: रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.
खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
- भगवतीनगर,
- चवे,
- देवीहसोळ,
- कापडगाव,
- उक्षी,
- कशेळी,
- वाढारूणदे,
- बारसू
या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.