Track Fit Certificate (TFC) issued at 16:30hrs for Km 79/4-6 between Diwankhavati – Vinhere section of Ratnagiri region. @RailMinIndia
— Konkan Railway (@KonkanRailway) July 15, 2024
Author Archives: Kokanai Digital
Follow us on
रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.
आज दिनांक – १५ जुलै २०२४
महत्त्वाच्या घटना:
- १६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना
- १६७४: मुघल सरदार बहादुरशाह कोकलताश याच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटिची लूट रायगडावर जमा झाली.
- १९१६: जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
- १९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.
- १९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.
- १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
- १९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ
- १९७९: भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- १९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
- १९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड
- २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.
- २०११: भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पीएसएलव्हीद्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जीसॅट-१२ अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.
- २०१४: जागतिक युवा कौशल्य दिन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
- १६०६: रेंब्राँ – डच चित्रकार (मृत्यू: ४ आक्टोबर १६६९)
- १६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
- १७८३: पर्शियन भारतीय व्यापारी व दानवीर जमशेदजी जीजाभाई यांचा जन्मदिन.
- १८४०: स्कॉटिश इतिहासकार, सांखिकीतज्ञ, संकलक आणि भारतीय नागरी सेवेचा सदस्य विलियम विलसन हन्टर (William Wilson Hunter) यांचा जन्मदिन.
- १९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५)
- १९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१)
- १९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८०)
- १९०९: भारतीय स्वतंत्रता सेनानी, मुत्सदी, वकील व आंध्रप्रदेश राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिन.
- १९१७: नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९७९)
- १९२७: प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१०)
- १९२२: नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ लिओन एम. लेडर मैन (Leon M. Lederman) यांचा जन्मदिन.
- १९३२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
- १९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
- १९३६: भारतीय हिंदी पत्रकारिता, लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्मदिन.
- १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९
- १९४९: माधव कोंडविलकर – दलित साहित्यिक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १२९१: रुडॉल्फ (पहिला) – जर्मनीचा राजा (जन्म: १ मे १२१८)
- १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन. (जन्म: १५ जून १४७९)
- १९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (जन्म: २९ जानेवारी १८६०)
- १९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२)
- १९५३: ऑर्डर ऑफ दी इमिटेशन ऑफ क्राइस्ट चे संस्थापक भारतीय आर्चबिशप गिवरगीस मार इव्हानिओस यांचे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १८८२)
- १९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ – गायक व नट (जन्म: २६ जून १८८८)
- १९७९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावोदियाझ ओर्दाझ यांचे निधन.
- १९९१: जगन्नाथराव जोशी – जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: ? ? १९२०)
- १९९८: ताराचंद परमार – गांधीवादी कार्यकर्ते व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
- १९९९: इंदुताई टिळक – सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
- १९९९: जगदीश गोडबोले – पर्यावरणवादी लेखक व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
- २००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लेटर्स (१९५५) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुण्यातील के. इ. एम. रुग्णालय, जहांगीर नर्सिंग होम, दैनिक सकाळ, इंडिया फांउंडेशन इ.संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८)
रत्नागिरी दि. १५ जुलै, 11:30AM:
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर झालेल्या भुरस्सलनामुळे बंद झालेली वाहतूक अजून पर्यन्त पूर्वपदावर आली नसून. अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द, पुनर्नियोजित आणि पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे. या मार्गातील अडथळा संपूर्णपणे दूर करण्यासाठी अजून किमान ३ तास लागतील असे कोंकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने राज्य परिवहनच्या मदतीने सावंतवाडी, चिपळूण, रत्नागिरी आदी स्थानकावरून बसेस सोडल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२२२९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “वंदे भारत” एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१९ लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरु सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. – मुंबई CSMT “तेजस” एक्स्प्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस
-
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास खेड स्थानकाकडे संपविण्यात आला असून तो खेड – दिवा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आला.
-
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जं. – मुंबई CSMT “मांडवी” एक्सप्रेसचा प्रवास चिपळूण स्थानकावर संपविण्यात आला असून तो चिपळूण – मुंबई CSMT दरम्यान अंशतः रद्द करण्यात आला आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२४१३ मडगाव जं. – H. निजामुद्दीन “राजधानी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ८ वाजता न सुटता संध्याकाळी १६:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १११०० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेस आपल्या नियोजित वेळेत सकाळी ११:३० वाजता न सुटता संध्याकाळी १८:३० मडगाव स्थानकावरून
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई CSMT “जनशताब्दी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत दुपारी १२:०० वाजता न सुटता संध्याकाळी ०८:०० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. – मुंबई CSMT “कोकण कन्या” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १८:०० वाजता न सुटता रात्री २३:३० वाजता मडगाव स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर “तुतारी” एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत संध्याकाळी १७:५५ वाजता न सुटता रात्री २२:३० वाजता सावंतवाडी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 00847 हटिया – मडगाव “भारत गौरव” FTR विशेष प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 20909 कोचुवेली – पोरबंदर एक्सप्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
- दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणाऱ्या गाडी क्र. १२९७७ एर्नाकुलम जं. – अजमेर जं. प्रवास पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे.
रत्नागिरी दि. १५ जुलै, 08:00AM: कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी येथे रेल्वे मार्गावर आलेल्या मातीच्या भल्या मोठ्या भरावामुळे कोकण रेल्वेचे ठप्प झालेली वाहतूक अजूनही पूर्वपदावर आली नाही आहे. रेल्वे मार्गावरील अडथळा हटवण्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसून मार्ग बंद झाल्याने अनेक गाड्या रद्द, पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १२ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३३५ गांधीधाम- नगरकोइल जं. एक्स्प्रेसआता विन्हेरे येथून मागे फिरवण्यात आली असून ती कल्याण – लोणावळा – पुणे – मिरज – लोंडा – मडगाव – ठोकूर – मंगळुरू जंक्शन मार्गे वळवली जाईल.
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२२८४ – एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
दिनांक १३ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२७४२ – वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र.१६३४५ – नेत्रावती एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र २२१५० – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र ०९०५७ – मंगळुरु. विशेष भाडे उन्हाळी विशेष ट्रेन
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२४३२ – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्स्प्रेस
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र १२६१८ – मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३३ मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं.
दिनांक १४ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ११००३ दादर – सावंतवाडी रोड “तुतारी” एक्स्प्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. जनशताब्दी” एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०५ दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ५०१०७ सावंतवाडी रोड – मडगाव जं.
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०४ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी मांडवी
एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई CSMT एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड
दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस
रत्नागिरी, १४ जुलै, १८:३० | कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे. या व्यत्ययामुळे गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे अडकली आहे. मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबविण्यात आली आहे.

मुंबई, दि. १४ जुलै: पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान झाड पडल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी सकाळच्या सुमारास झाड पडल्याने धिम्या मार्गावरील लोकल जवळपास तासभर खोळंबली होती. रविवारी सकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी-दादर दरम्यान डाऊन दिशेकडील धीम्या मार्गावर झाड पडले.
रेल्वे रुळांवर झाड पडल्याने, बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पश्चिम रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी दाखल होऊन झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले. जवळपास तासाभराच्या रखडपट्टी सकाळी ८.२० वाजता झाड बाजूला काढण्यात यश आले. त्यानंतर बोरिवलीच्या दिशेने धीम्या मार्गावरील लोकल सुरू झाल्या.
तर, सकाळच्या सुमारास बोरिवली रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दुरुस्तीची कामे करून सकाळी ९.०५ वाजता बिघाड दूर करून बोरिवली येथील ठप्प झालेल्या तीन मार्गिका सुरू केल्या. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा लवकरच सुरू केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
- १७८९: पॅरिस मध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्तमेढ होती.
- १८५३: न्युझीलंड मध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
- १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
- १९०१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार रती राम देशबंधू गुप्ता यांचा जन्मदिन.
- १९०२: उत्तरप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्र भानू गुप्ता यांचा जन्मदिन.
- १९२०: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्मदिन.
- १९५८: इराक मध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- १९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.
- १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
- १९७६: कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
- २००३: जागतिक बुद्धिबळ महासंघ द्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
- २०१३: डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
- १८५६: गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (मृत्यू: १७ जून १८९५)
- १८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट यांचा जन्म.
- १८८४: यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
- १८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १९५२)
- १९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारा चित्रकार विल्यम हॅना यांचा जन्म.
- १९१७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
- १९२०: शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
- १९४७: नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान
- १९६७: हशन तिलकरत्ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी
- १९७१: भारतातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू ज्यांनी केवळ क्रिकेट आणि टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले नाही तर फिल्ड हॉकी, सॉकर, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि पोलो खेळांमध्ये देखील पारंगत असणारे सय्यद मोहम्मद हाडी यांचे निधन.
- १९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुगर यांचे निधन.
- १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८९०)
- १९६३: स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)
- १९७५: मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)
- १९७९: अमेरिकेने अणुचाचणी केली.
- १९९३: श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार (जन्म: ? ? ????)
- १९९८: मॅकडॉनल्ड चे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १९०९)
- २००३: लीला चिटणीस – हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
- २००३: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)
- २००४: स्वामी कल्याणदेव, पद्म भूषण पुरस्कार विजेते धर्मगुरू, विचारवंत , समाजसुधारक
- २००८: यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)










