Author Archives: Kokanai Digital

पगार रखडले.. एसटी कर्मचारी आक्रमक

 

MSRTC Employees News :महिन्याची 12 तारीख उलटली तरी पगार झाला नसल्याने एसटी कामगार चिडले आहेत. मागे एसटी कामगारांनी संप केला होता, त्यावेळी हायकोर्टाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे कोर्टात मान्य केले होते. पण महामंडळ आपला शब्द पाळत नसून कोर्टाचा अवमान करत असल्याचे दिसत आहे.

(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर)

काल 12 तारखेपर्यंतही वेतन न झाल्याने हा कोर्टाचा केलेला अवमान आहे. शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे असे ते पुढे म्हणाले.

 

Loading

कोकण रेल्वेमार्गावरील एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन या गाडीला अतिरिक्‍त डबे

संग्रहित फोटो
Konkan Railway News | 12/01/2023:  कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.  हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५  – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६  – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक  : २०/०१/२०२३ शुक्रवारपासून
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील (महाराष्ट्र) थांबे
रत्नागिरी,पनवेल,वसई रोड आणि डहाणू रोड

Loading

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर

आधीच मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना त्यात कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे होणार्‍या अपघातांची भर पडताना दिसत आहे.

Mumbai Goa Highway News :आज मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने डोंगर कापत असताना निसटलेला एक भला मोठा दगड चक्क रस्त्यावर आला. सुदैवाने त्यावेळी कोणतेच वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ह्या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी ह्या प्रकारामुळे धास्तावले आहेत.

(हेही वाचा >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)

मागेच अशा दुर्लक्षामुळे येथे असे दोन प्रकार घडले आहेत. एक असाच मोठा दगड निसटून पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घर मालकांस नुकसान भरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भिंती उभारलेल्या असतानाच गेल्या शनिवारी डोंगर कापत असतानाच निसटलेला दगड एका घराजवळ येवून पडला. यात तेथील साहित्याची मोडतोड होवून नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना मात्र टळली.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

ह्या सर्व प्रकारांवरून ह्या कामादरम्यान होणारी सुरक्षेच्या उपयोजनांकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. कंपनी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.

 

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..

पूर्वी आपल्या देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीत काही व्यावसाय असे होते की तो व्यवसाय एक महिला करणार आहे असे म्हंटले तर असे बोलणार्‍याची गणती मूर्खात होत असे. त्यातला एक व्यवसाय म्हणजे रिक्षा चालवणे. आता विचार बदललेत, पुरुषांनी व्यापित या व्यवसायात महिलांनी प्रवेश केला आहे. अशी क्रांती आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण पाहावयास मिळाली आहे. 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका गावातील तरुणी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा चालवत आहे . वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावातील राऊळवाडी येथील कुमारी हेमलता रवींद्र राऊळ असे त्या तरुणीचे नाव आहे. रिक्षा चालवणारी ती जिल्ह्यातील दुसरी महिला ठरली आहे तर वेंगुर्ले तालुक्यातील पहिली महिला ठरली आहे. ह्या आधी कुडाळ तालुक्यातील मनीषा दामले यांनी १९९० ह्या वर्षी जिल्ह्यातील पहिली रिक्षाचालक होण्याचा मान मिळवला होता.

2 वर्षापुर्वी बारावीचे शिक्षण पूर्ण केलेली हेमलता आता आपल्या भागात रिक्षा चालवत आहे. तिला ही रिक्षा ‘अनाम प्रेम’ ह्या संस्थेच्या वतीने एका योजनेतून देण्यात आली आहे. त्यासाठी माऊली महिला मंडळ,शिरोडा या संस्थेकडून वाहतुक परमिट आणि परवाना मिळवण्यासाठी मदत करण्यात आली आहे. खास करून गायकवाड मॅडम कडून आपणास ह्यासाठी खूप मदत मिळाली असे हेमलता आवर्जून सांगते.हेमलताच्या आईवडिलांनी हेमलताला रिक्षा चालण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

(Also Read >विविध शासकीय योजनांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर… नावे पाहण्यासाठी ही बातमी वाचा..)

मला पोलीस किंवा सैन्य दलात जायची इच्छा आहे, त्यादृष्टीने माझे प्रयत्न चालू होते, त्याचबरोबर रिकामे राहण्यापेक्षा काहितरी करावे हा विचार करून मी नोकरीच्या पर्यायांपेक्षा रिक्षा चालवणे हा पर्याय निवडला. माझा आदर्श घेऊन जिल्हय़ातील ईतर मुलींनी पण ह्या व्यवसायात उतरावे अशी माझी इच्छा आहे असे हेमलताचे म्हणणे आहे.

(Also Read>सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार

Loading

मोपा विमानतळावर अकासा एअरची सेवा आजपासून सुरु…

Mopa Airport News : नवे अकासा एअर देशाच्या नेटवर्कमधील १२ वे ठिकाण म्हणून आज बुधवारपासून गोव्यातून मोपा (Manohar International Airport) विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू करतकेली आहे आहे. दरम्यान, अकासा एअरचे बंगळुरू ते गोवा QP1392 विमान गोव्यातील मोपा विमानतळावर 11 वाजता उतरले. अकासा विमान कंपनीने विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पदभरती सुरु केली होती.

आजपासून अकासा एअरने गोव्यातून मोपा विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू केली आहे. मुंबई-गोवा-बंगळुरू अशी ही दुहेरी सेवा असेल, अशी माहिती अकासा एअरचे सह-संस्थापक व मुख्य व्यवसाय अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिली.

अय्यर म्हणाले, अकासा एअरने अलीकडेच हैदराबाद-बेंगळुरू आणि हैदराबाद-गोवा मार्गांवर २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दैनंदिन उड्डाण ऑफर करत असलेल्या नेटवर्कवरील १३ वे डेस्टीनेशन म्हणून हैदराबादची घोषणा केली आहे.

Loading

पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ लोकल्स उद्यापासून १५ डब्यांसह धावणार..


Mumbai News :पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १२ लोकल्सचा  १५ डब्यांपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक लोकलमध्ये २५ टक्के अतिरिक्त आसनक्षमता वाढणार आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवार ११ जानेवारी २०२३ पासून या गाड्या १५ डब्यांसहित धावणार आहेत. जलद मार्गावर ६ लोकल्स आणि धीम्या मार्गावर ६ लोकल्स मध्ये हा बदल करण्यात आला आहे.
सध्या ह्या मार्गावर १५ डब्यांच्या १३२ लोकल फेऱ्या होत्या त्याची संख्या १४४  होणार आहे.  असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.१५ डब्यांचा विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading

‘वेड’ ने वेड लावले! ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

Marathi Cinema News:बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ हा चित्रपट अकराव्या दिवशीही गर्दी खेचत आहे. अकरा दिवसांत जवळपास ३५.७७  कोटी रुपयांची एकूण कमाई चित्रपटाने केली आहे.
फक्त ११ दिवसांत ३५.७७ कोटी रुपये कमाई  करून असा विक्रम करणारा हा मराठीतील पहिला चित्रपट ठरला आहे. ह्या आधी हा रेकॉर्ड रितेशच्याच ‘लय भारी’ ह्या चित्रपटाच्या नावावर होता.
वेडमध्ये जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान हा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवाशांकडून ५ कोटी १६ लाख रुपये दंड वसूल

कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या सहा महिन्यांत कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी अशा प्रवाशांकडून सुमारे ५ कोटी १६ लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत  गेल्या सहा महिन्यात एकूण ८२,५१२ अशा प्रवाशांवर कारवाई करून  कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी  ५,१६,३३,१९७ रुपये  दंडापोटी वसूल केले आहेत.
ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होते. अशा वेळी काही प्रवासी विनातिकिट डब्यात चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन बिनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे.
दरम्यान गैरसोय आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Loading

२० जानेवारी नंतर जर कोकणकन्या एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरुन धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस दिनांक २१ जानेवारी पासून सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने कोकणकन्या एक्स्प्रेसच्या वेळपत्रक आणि गाडीच्या क्रमांकामध्ये बदल केला आहे.
21 जानेवारीपासून मडगाव जंक्शन-मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन कोकणकन्या सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. याशिवाय कोकणकन्या एक्स्प्रेसचा क्रमांकही बदलला आहे. प्रचलित असलेल्या 10112  आणि 10111 या क्रमांकाऐवजी 20112 आणि 20111 या क्रमांकासह धावणार आहे.
सुधारित वेळापत्रक
ह्या गाडीचे आरक्षण करताना हा नवीन नंबर लिहून आरक्षण अर्ज भरावा जेणेकरून ऐन वेळी गोंधळ होणार नाही. तसेच गाडीच्या वेळापत्रकामध्ये बदल झाला आहे त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.

Loading

विविध शासकीय योजनांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी जाहीर… नावे पाहण्यासाठी ही बातमी वाचा..

सिंधुदुर्ग: समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देण्याकरिता शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतिम लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

खालील योजनांच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना लाभार्थी यादी
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभार्थी यादी
श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी
संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान लाभार्थी यादी

 

ह्या सर्व याद्या पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.
टीप: पीडीएफ डाउनलोड होण्यास काही अवधी लागू शकतो. कृपया संयम ठेवा. लिस्ट वर क्लिक केल्यास खाली पीडीएफ च्या खाली पेजेस बदलण्यासाठी किंवा झूम करून पाहण्यासाठी ऑप्शन येईल.

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-वृद्धापकाळ-निवृत्तीवेतन-योजना-लाभार्थी-यादी.pdf” title=”इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-विकलांग-योजना-लाभार्थी-यादी.pdf” title=”इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना लाभार्थी यादी”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-विधवा-योजना-लाभार्थी-यादी.pdf” title=”इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना लाभार्थी यादी”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/श्रावणबाळ-राज्यसेवा-निवृत्तीवेतन-योजना-लाभार्थी-यादी.pdf” title=”श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी यादी”] [pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/01/संजय-गांधी-निराधार-अनुदान-योजना-अनुदान-लाभार्थी-यादी.pdf” title=”संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुदान लाभार्थी यादी”]

 

डाऊनलोड करता येणार अशा फाईल 👇🏻

संजय-गांधी-निराधार-अनुदान-योजना-अनुदान-लाभार्थी-यादी.pdf

 

इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-विकलांग-योजना-लाभार्थी-यादी.pdf

 

इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-विधवा-योजना-लाभार्थी-यादी.pdf

 

श्रावणबाळ-राज्यसेवा-निवृत्तीवेतन-योजना-लाभार्थी-यादी.pdf

 

इंदिरा-गांधी-राष्ट्रीय-वृद्धापकाळ-निवृत्तीवेतन-योजना-लाभार्थी-यादी.pdf

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search