Author Archives: Kokanai Digital

५ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 12:53:49 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 25:09:09 पर्यंत
  • करण-तैतुल – 12:53:49 पर्यंत, गर – 23:50:18 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 23:06:43 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:57
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मेष – 08:13:48 पर्यंत
  • चंद्रोदय- 10:39:59
  • चंद्रास्त- 24:23:59
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1851: भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ची स्थापना झाली.
  • 1931: दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
  • 1933: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
  • 1966: म्हैसूरचे राजे वाडियार यांचा बंगळुरूमध्ये असेलेला राजवाडा सरकारच्या ताब्यात घेण्याचा विधेयक मंजूर झाला.
  • 1982: सोव्हिएत प्रोब व्हेनेरा 14 शुक्रावर उतरले.
  • 1997: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
  • 1998: रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत आगमन झाले.
  • 2000: कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
  • 2007: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापना
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1512: ‘गेर्हाट मार्केटर’- नकाशाकार आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1594)
  • 1898: ‘चाऊ एन लाय’ – चीनचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1976)
  • 1908: ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील व हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जून 1990)
  • 1910: ‘श्रीपाद वामन काळे’ – संपादक यांचा जन्म.
  • 1913: ‘गंगुबाई हनगळ’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 21 जुलै 2009)
  • 1916: ‘बिजू पटनायक’- ओरिसाचे मुखमंत्री आणि स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1997)
  • 1959: ‘शिवराज सिंह चौहान’ – मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1974: ‘हितेन तेजवानी’- अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1827: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – इटालीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 18 फेब्रुवारी 1745)
  • 1914: ‘शांताराम अनंत देसाई’ – नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक यांचे निधन.
  • 1953: ‘जोसेफ स्टॅलिन’ – सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 18 डिसेंबर 1878)
  • 1968: ‘नारायण गोविंद चाफेकर’ – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार यांचे निधन
  • 1985: ‘पु. ग. सहस्रबुद्धे’ – महाराष्ट्र संस्कृतीकार  यांचे निधन
  • 1985: ‘देविदास दत्तात्रय वाडेकर’- कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक  यांचे निधन
  • 1995: ‘जलाल आगा’- हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन
  • 2013: ‘ह्युगो चावेझ’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 28 जुलै 1954)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Ration Card E-KYC: रेशन कार्ड धारकांसाठी EKYC करण्याची ऑनलाइन सुविधा सुरू…

   Follow us on        

Ration Card E-KYC: शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देते. मात्र, या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा, यासाठी आता e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे e-KYC पूर्ण झाले नसेल, तर लवकरच ते पूर्ण करा; अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याचा धोका आहे.

ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला रास्त भाव दुकानात जायची गरज नाही. EKYC ॲप मधून लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे EKYC करू शकतो.

मुख्य वैशिष्ट्ये

▪️घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा

▪️फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी

▪️रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो

▪️आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक

 

ॲप लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth

1)राज्य : महाराष्ट्र निवडा- आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून कॅप्चा कोडची नोंद करा.

2) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)- स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा. स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.

3) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल- याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये “E-KYC Status” तपासा- जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

EKYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.

Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘अनारक्षित विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या दादर ते रत्नागिरी आठवड्यातुन तीन दिवस धावणार आहेत. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे.

गाडी क्रमांक ०११३१/०११३२ दादर-रत्नागिरी दादर त्रि-साप्ताहिक विशेष 

गाडी क्रमांक ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी १४:५० ला सुटून रात्री २३:४० ला रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ रत्नागिरी दादर होळी विशेष गाडी १२, १४ आणि १७ मार्च, २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १३:२५ ला दादरला पोहोचेल.

या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड

डब्यांची संरचना: जनरल – १४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण १६ आयसिएफ कोच

 

४ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 15:19:04 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 26:38:26 पर्यंत
  • करण-बालव – 15:19:04 पर्यंत, कौलव – 26:03:36 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-इंद्रा – 26:06:11 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय – 06:58
  • सूर्यास्त – 18:43
  • चन्द्र राशि-मेष
  • चंद्रोदय-09:52:59
  • चंद्रास्त-23:18:5 9
  • ऋतु-वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय सुरक्षा दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1791: व्हर्मोंट अमेरिकेचे 14 वे राज्य बनले.
  • 1837: शिकागो शहराची स्थापना झाली.
  • 1861: अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले गेले.
  • 1882: ब्रिटनमधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये सुरू झाली.
  • 1936: हिंडेनबर्गरने पहिले उड्डाण केले.
  • 1951: पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन नवी दिल्लीत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले.
  • 1961: 1946 मध्ये इंग्लंडमध्ये बांधलेले आय. एन. एस. विक्रांत हे विमानवाहू जहाज भारतीय नौदलात दाखल झाले.
  • 1994: स्पेस शटल प्रोग्राम: एसटीएस-62 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
  • 1996: चित्रकार रवी परांजपे यांना राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या कॅग हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1868: ‘हरीश्चंद सखाराम भाटवडेकर’ – चलत चित्रपटाचे प्रवर्तक यांचा जन्म.
  • 1893: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1985)
  • 1906: ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
  • 1922: ‘विना पाठक’ – गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 2002)
  • 1926: ‘रिचर्ड डेवोस’ – अॅमवे चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1973: ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1980: ‘रोहन बोपन्ना’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1986: ‘माईक क्रीगेर’ – इंस्ताग्राम चे सहसंस्थापक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1852: ‘निकोलय गोगोल’ – रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार यांचे निधन.
  • 1915: ‘विल्यम विल्लेत्त’ – ब्रिटिश समर टाईम चे निर्माता यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1856)
  • 1925: ‘ज्योतीन्द्रनाथ टागोर’ – रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 4 मे 1849 – कोलकाता, पश्चिम बंगाल)
  • 1941: ‘ताचियामा मिनीमोन’ – जपानी 22वे योकोझुना सुमो पैलवान यांचे निधन (जन्म: 15 ऑगस्ट 1877)
  • 1948: ‘बाळकृष्ण शिवारम मुंजे’ – भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1872)
  • 1952: ‘सर चार्ल्स शेरिंग्टन’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1857 – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
  • 1976: ‘वॉल्टर शॉटकी’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1886)
  • 1985: ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक यांचे निधन(जन्म: 4 मार्च 1893)
  • 1985: ‘डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे’ – साहित्यिक यांचे निधन.
  • 1992: ‘शांताबाई परुळेकर’ – सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका यांचे निधन.
  • 1995: ‘इफ्तिखार’ – चरित्र अभिनेता यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1920)
  • 1996: ‘आत्माराम सावंत’ – नाटककार आणि पत्रकार यांचे निधन.
  • 1997: ‘रॉबर्ट इह. डिक’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1999: ‘विठ्ठल गोविंद गाडगीळ’ – भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी यांचे निधन.
  • 2000: ‘गीता मुखर्जी’ – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1924)
  • 2007: ‘सुनील कुमार महातो’ – भारतीय संसद सदस्य यांचे निधन.
  • 2011: ‘अर्जुनसिंग’ – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, 3 वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1930)
  • 2020: ‘जेवियर पेरेझ डी क्युलर’ – पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव यांचे निधन(जन्म: 19 जानेवारी 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरु पर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरू.

   Follow us on        

Konkan Railway: जलद, आरामदायी आणि अनेक आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली वंदेभारत एक्सप्रेस प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. भारत सरकारने देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांदरम्यान या गाड्या सुरू केल्या असून काही अपवाद वगळता सर्व गाड्या यशस्वी ठरल्या आहेत. मुंबई मडगाव मार्गावर सुरू करण्यात आलेली गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेसची या यशस्वी गाडय़ांमध्ये गणना होत आहे. या गाडीचा मंगळुरू पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता होताना दिसत आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे.

मुंबई ते मंगळुरू अशी अखंड वंदेभारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्यातून होत आहे. मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (22229/30) हीच गाडी पुढे मंगळुरू पर्यंत विस्तारित करावी. ही गाडी विस्तारित केल्यास तिला सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे धावण्यासाठी जो अतिरिक्त रेक लागेल तो गाडी क्रमांक 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल ही गाडी बंद करून तिचा रेक वापरण्यात यावा. असे केल्याने अतिरिक्त रेक न वापरता आहे त्या गाड्यांमध्ये हा बदल करून कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई साठी जलद प्रवासाचा एक पर्याय उपलब्ध होईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधींनी विविध माध्यमांतून ही मागणी जोर लावून धरल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील प्रवासी संघटनांचा विरोध.

सध्या मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. मुंबई कर्नाटक दरम्यान गरज पडल्यास नवीन गाडी मागावी. –अखंड कोकण रेल्वे प्रवासी समिती

आम्ही तुम्हाला कर्नाटकसाठी नवीन रेकची मागणी करण्याची विनंती करतो. सध्याची सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आधीच १०० टक्के पूर्ण क्षमतेने धावत आहे, नवीन ट्रेन सुरू झाल्यास महाराष्ट्र, गोवा कर्नाटकातील प्रवाशांना अधिक फायदा होईल. सध्या आम्ही या विस्ताराच्या विरोधात आहोत. –रोहा रेल्वे प्रवासी समिती

मुंबई गोवा वंदे भारत मंगळुरूपर्यंत नेण्याची मागणी कर्नाटकातून होत आहे. तेथील खासदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले आहेत. आपण जोरदार विरोध करणे आवश्यक आहे. अन्यथा कोकणकन्याचा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेल्या १२१३३/१२१३४ मुंबई कारवार एक्सप्रेसप्रमाणे आपल्याला वंदे भारतलाही मुकावे लागेल. मंगळुरूच्या नवीन गाडीला विरोध नाही. परंतु आपली गाडी पुढे वाढवून नाही, तर स्वतंत्र गाडी सुरू व्हावी. तसेच, त्या गाडीला सर्व स्थानाकांना समान कोटा मिळावा व महाराष्ट्रात पुरेसे थांबे मिळावेत.-श्री. अक्षय म्हापदी, रेल्वे अभ्यासक

Loading

३ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 18:04:34 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 28:30:29 पर्यंत
  • करण-वणिज – 07:33:08 पर्यंत, विष्टि – 18:04:34 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 08:56:41 पर्यंत, ब्रह्म – 29:24:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:58
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 09:09:00
  • चंद्रास्त- 22:15:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक वन्यजीव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1845: फ्लोरिडा हे अमेरिकेचे 27 वे राज्य बनले.
  • 1865: हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.
  • 1885: अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी (AT&T) ची स्थापना झाली.
  • 1923: टाईम मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1938: सौदी अरेबियामध्ये तेलाचा शोध लागला.
  • 1966: डॉ. धनंजय राव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू बनले.
  • 1969: अपोलो कार्यक्रम: चंद्र मॉड्यूलची चाचणी घेण्यासाठी नासाने अपोलो-9 लाँच केले.
  • 2003: महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेल्या शरच्चंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
  • 2005: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर विमानातून ६७ तासांत जगाची एकट्याने, इंधन न भरता केलेली प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2015: 20 डिसेंबर 2013 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1839: ‘जमशेदजी टाटा’ – टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1904)
  • 1845: ‘जॉर्ज कँटर’ – जर्मन गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1918)
  • 1847: ‘अॅलेक्झांडर ग्राहम बेल’ – टेलिफोनचा जनक यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑगस्ट 1922)
  • 1920: ‘मुकुंद शंकरराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर मासिकाचे संपादक यांचा जन्म.
  • 1923: ‘प्रा. सदाशिव नथोबा आठवले’ – इतिहासकार आणि ललित लेखक यांचा जन्म.
  • 1926: ‘रवि शंकर शर्मा’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 मार्च 2012)
  • 1928: ‘पुरुषोत्तम पाटील’ – कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1948: ‘स्टीव्ह विल्हाइट’ – अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, GIF इमेज फॉरमॅटचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 14 मार्च 2022)
  • 1967: ‘शंकर महादेवन’ – गायक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1977: ‘अभिजित कुंटे’ – भारताचा चौथा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
  • 1987:’ श्रद्धा कपूर’ – भारतीय अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1700: ‘छत्रपती राजाराम महाराज’ – मराठा साम्राज्याचे 3रे छत्रपती यांचे निधन (जन्म: 24 फेब्रुवारी 1670)
  • 1703: ‘रॉबर्ट हूक’ – इंग्लिश वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1635)
  • 1707: ‘औरंगजेब’ – सहावा मोघल सम्राट यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1618)
  • 1919: ‘हरी नारायण आपटे’ – कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1864)
  • 1924: ‘वूड्रो विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे 28वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1965: ‘अमीरबाई कर्नाटकी’ – पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचे निधन.
  • 1967: ‘स. गो. बर्वे’ – माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन.
  • 1982: ‘रघुपती सहाय’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1896)
  • 1995: ‘पं. निखील घोष’ – तबलावादक यांचे निधन.
  • 2000: ‘रंजना देशमुख’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

तुतारी एक्सप्रेससह राज्यातील एकूण ११ एक्सप्रेस गाडयांना ‘एलएचबी कोच’ जोडणे गरजेचे

 

LHBfication of Trains:रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढवा यासाठी रेल्वे प्रशासन जुन्या प्रकारातील, पारंपरिक पद्धतीमधील डब्यांऐवजी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी रेल्वेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना सुरक्षित असलेले ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्यातील काही महत्वाच्या गाड्या ज्यांना आधुकीकरण करण्याची खरी गरज असताना अजूनही जुन्या प्रकारातील आयसीएफ रेक सह चालविण्यात येत आहेत.
कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना अनेकदा पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये कमी प्राधान्य दिले असल्याचा आरोपही समितीने केला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी  ई-मेल द्वारे या एक्सप्रेस गाड्यांची यादी प्रशासनाला पाठवली असून या गाड्यांचे रूपांतर लवकरात लवकर एलएचबी स्वरूपात करावे अशी मागणी केली आहे.

कोणत्या आहेत या गाड्या?

  • ११००३/११००४  दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस (२ रेक)
  • ११०२९/११०३०  कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस (३ रेक)
  • ११०३९/११०४०  कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस / ०१०२३/०१०२४ कोल्हापूर – पुणे एक्सप्रेस (५ रेक)
  • १७६१७/१७६१८ नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस / १७६८७/१७६८८ मराठवाडा एक्सप्रेस (३ रेक)
  • १७६११/१७६१२ नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस (२ रेक)
  • २२१५५/२२१५६ कोल्हापूर – कलबुर्गी एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०१/११४०२ (०१.०३.२०२५ पासून ११००१/११००२ या नावाने पुनर्क्रमित करा) मुंबई – बल्हारशाह नंदीग्राम एक्सप्रेस (3 रेक)
  • ११०२७/११०२८ दादर – सातारा एक्सप्रेस (पुणे-पंढरपूर मार्गे) / ११०४१/११०४२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (पुणे मार्गे) (2 रेक)
  • १२१३१/१२१३२ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) / २२१४७/२२१४८ दादर – शिर्डी एक्सप्रेस (मनमाड मार्गे) (१ रेक)
  • ०११३९/०११४० नागपूर – मडगाव एक्सप्रेस (१ रेक)
  • ११४०३/११४०४ कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (१ रेक)
या गाड्या मध्य आणि दक्षिण रेल्वे विभागाच्या अखत्यारीत आहेत. या गाड्यांचे महत्व आणि प्रवाशांकडून होणारी गर्दी पाहता या गाडयांना ‘एलएचबी कोच’ तातडीने जोडण्यात यावेत अशी समितीने मागणी  केली आहे.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

२ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 21:04:28 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 09:00:07 पर्यंत, रेवती – 30:39:55 पर्यंत
  • करण-तैतिल – 10:37:40 पर्यंत, गर – 21:04:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 12:38:39 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:59
  • सूर्यास्त- 18:43
  • चन्द्र-राशि-मीन – 30:39:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:28:59
  • चंद्रास्त- 21:12:59
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • १८५५: अलेक्झांडर (दुसरा) हा रशियाचा झार बनला.
  • १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
  • १९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
  • १९४६: हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.
  • १९४९: न्यू मिलफोर्ड, कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वंयंचलित दिवे बसविण्यात आले.
  • १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
  • १९५६: मोरोक्‍को देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
  • १९७०: ब्रिटनकडून स्वातंत्र्य घेऊन र्‍होडेशिया प्रजासत्ताक बनले.
  • १९७८: स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
  • १९९२: आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले.
  • २००१: बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
  • १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
  • १९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
  • १९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
  • १९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय कन्नड स्त्रीवादी लेखक – साहित्य अकादमी पुरस्कार – गीता नागाभूषण (मृत्यू : २८ जून २०२०)
  • १९१४: भारतीय राजकारणी, पंजाबचे आमदार – तोता सिंग (मृत्यू : २१ मे २०२२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.
  • १७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
  • १८३०: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार डी. एच. लॉरेन्स यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८८५)
  • १९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.
  • १९७६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.
  • १९९४: धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न पं. श्रीपादशास्त्री जेरे यांचे निधन.
  • १९८६: मराठी चित्रपट अभिनेते – डॉ. काशिनाथ घाणेकर


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी पूर्ण न झाल्यास ‘रेल रोको’ चा इशारा

   Follow us on        

मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.

होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको

दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search