Author Archives: Kokanai Digital

खेड | क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेडमधील जामगे गावात ….

   Follow us on        

खेड: महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे ( खेड ) येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ८ फेब्रुवारी व रविवार ९ फेब्रुवारी यादिवशी आयोजित करण्यात आले आहे.

प्राचीन सत्ताधीश कदंब राजवंशाचा इतिहास लाभलेल्या कदम कुटुंबीयांना स्वतःचे कुलाचार, परंपरा , वारसा याबद्दल माहिती व्हावी, नोकरी व्यवसायात एकमेकांना सहकार्य मिळावे तसेच घराण्यातील नामवंतांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून क्षत्रिय मराठा कदम परिवार संस्थेने आजतागायत तुळजापूर, गिरवी ( फलटण ), गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग) , गलांडवाडी ( दौंड) , धामदरी ( नांदेड) , आणि आंबेचिंचोली( पंढरपूर) याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. या वर्षाचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन कोकणातील खेडजवळच्या जामगे या गावामध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कुलसंमेलनासाठी विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचे मूळगावामध्ये महाराष्ट्रासह गोवा , मध्यप्रदेश, कर्नाटक , बडोदा या राज्यातूनही कदम बांधव उपस्थित राहणार आहेत.

नोकरी, व्यवसाया निमित्त अनेक गावात, शहरात वास्तव्यास असलेले कदम भाऊबंद कुलसंमेलना निमित्त एकत्र येणार असून, घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस मेळाव्यातून केला जाणार आहे. कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदेवता श्रीतुळजाभवानीच्या जागर गोंधळाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.तसेच मागील कुलसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे.

कुलसंमेलनाच्या मुख्य दिवशी सकाळी जामगे गावचे ग्रामदैवत श्रीकोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर कदंब राजवंशाचे ध्वजारोहण गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे हस्ते होणार आहे.त्यानंतर बदलापूर येथील सुप्रसिद्ध शस्त्रसंग्राहक सुनील कदम यांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कदम कुलसंमेलनाचे उदघाटन शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रा. डाॅ. सतीश कदम, उद्योजक मनोज कदम आणि चिपळूण येथील पराग कदम(अडरे) यांची कदम घराण्याचा इतिहास आणि सद्यस्थितीतील तरूणांना मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. मागील वर्षभरात ज्या ज्या कदम बंधू किंवा भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा कर्तृत्ववान कदमांचा सन्मान सोहळा सुध्दा संपन्न होणार आहे. या कुलसंमेलनास सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील (कदम), गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर (कदम) , पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम, नांदेडचे हदगाव विधानसभा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुलसंमेलनाचे निमंत्रक खेड पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गंगाराम कदम असून, या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, सल्लागार माऊलीशेठ कदम पाटील, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम तसेच जामगे कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी या मागणीसाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समितीचा पत्रव्यवहार

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचा/निवेदनाचा  एक ई-मेल समितीच्या वतीने समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य आणि केंद्र सरकार मधील संबंधित लोकप्रतिनिधींना केला आहे.

या निवेदनात समिती म्हणते  

”मुंबई आणि मंगळुरु ही दोन बंदरे जोडण्याच्या दृष्टीने रोहा ते मंगळुरु दरम्यान नवीन ब्रॉडगेज मार्ग बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्य शासनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. १५ वर्षांनंतर किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. त्यानुसार वर्ष २००८-०९ मध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता असताना केंद्र शासनाने सर्व देणी देऊन झाल्यावरही हे महामंडळ स्वतंत्रच राहील असे प्रथम आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात ठरवले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. ०७.०१.२००९ चे पत्र क्र. 2007/PL/50/7). त्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वे महामंडळ Sick Company म्हणून गणले जाऊ नये याकरिता द्वितीय आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात कोकण रेल्वेतील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे ४०७९.५१ कोटींचे Non-Cumulative Redeemable Preference Shares (RPS) चे रूपांतर Compulsorily Convertible Non-Cumulative Preference Shares (CCPS) मध्ये करण्यात आले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. २६.१२.२०१७ चे पत्र क्र. 2015/PL/50/9).

रोहा – वीर दुहेरीकरणानंतर दि. १६.०८.२०१६ ला रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ किमीच्या मार्गाच्या टप्पा दुहेरीकरणाच्या आणि २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५०% समभाग (Equity) आणि ५०% कर्जाच्या रूपात उभा करण्याचे ठरवले. दि. २६.०६.२०१८ ला रेल्वेच्या विस्तारित बोर्डाने (Expanded Board for Railways) या प्रकल्पाची किंमत ४९८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नंतर हा प्रस्ताव कॅबिनेट समितीकडे व त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. दि. १८.०६.२०१९ ला त्याविभागाने प्रस्तावाला मान्यता दिली व संबंधित राज्य शासनांकडून (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) निधी देण्याबद्दल लेखी हमीची मागणी केली. त्यात महाराष्ट्र ४९६.४६९ कोटी, गोवा १३५.४०१ कोटी, कर्नाटक ३३८.५०२ कोटी आणि केरळ १३५.४०१ कोटी असा आर्थिक सहभाग अपेक्षित होता.

कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून आर्थिक सहभागाची हमी देण्याबाबत विनंती केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. ३० ऑगस्ट, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion). राज्यांकडून निधी मिळण्यास उशीर झाल्यास एकूणच प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम एकूणच प्रगतीवर होऊ नये याकरिता राज्यांनी तो निधी प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच एकरकमी देण्यासंदर्भात लेखी हमी मागितली. पूर्वीच्या पत्राला उत्तर न आल्यामुळे व केंद्रीय कॅबिनेटच्या नवीन सूचनांनुसार महाराष्ट्राकडून अपेक्षित असलेला ४९६.४६९६ कोटींचा निधी एकरकमी देणेबाबत कोकण रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना सूचित केले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १३ सप्टेंबर, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion).

त्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावात काहीसा बदल करून १४७.६८ ऐवजी १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरण व २१ ऐवजी १८ नवीन स्थानकांचा ४५१३ कोटींचा सुधारित प्रस्ताव केला. राज्यांवर एकरकमी निधी देण्याचा ताण येऊ नये याकरिता राज्य शासनांनी पहिल्या वर्षी २०%, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ४०% अशा तीन हप्त्यांमध्ये निधी द्यावा परंतु त्याबद्दल लेखी हमी देण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सूचित केले. त्यामुळे कोकण रेल्वेने पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून निधीबाबत विचारणा केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १६ एप्रिल, २०२१ चे पत्र क्र. CO/S/Bonds/State Correspondence).

वरीलपैकी एकही पत्राला महाराष्ट्र शासनाने किंवा परिवहन सचिवांनी उत्तर न दिल्यामुळे कोकण रेल्वेने महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. मनू कुमार श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांना महाराष्ट्राच्या ५७२.४४ कोटींच्या आर्थिक सहभागाबद्दल सहमती किंवा असहमती विचारण्याकरता पत्र पाठवले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. २ डिसेंबर , २०२२ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Rights Issue). त्याच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राच्या तत्कालीन गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव श्री. सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेमध्ये असलेल्या आतापर्यंतच्या भागभांडवलावर किती लाभांश (Dividend) मिळाला व तो जर रु. ५७२.४४ कोटी किंवा त्याहून अधिक असेल आणि पुढील उपयोगाकरिता राखून ठेवला असेल तर तो सदर क्षमतावृद्धीच्या खर्चासाठी वापरण्यात येऊ शकेल का याबाबत विचारणा केली (संदर्भ: दि. १८ जानेवारी, २०२३ चे पत्र क्र. आरएलवाय-०४२२/प्र.क्र.११२/परि-५).

या सर्व प्रक्रियेत बराच कालावधी लोटल्यामुळे प्रकल्पाची किंमत ४३१९ कोटींवरून ५२०४ कोटींपर्यंत वाढली व यातून अपेक्षित परतावा १२.४३% वरून २.९५% पर्यंत कमी झाला. राज्य शासनांपैकी कर्नाटक राज्याने निधी देण्यास नकार दिला व इतर राज्यांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही उत्तर न दिल्यामुळे संचालक (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांनी कोकण रेल्वेचा हा १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याचे कळवले (संदर्भ: दि. २७.०२.२०२३ चे पत्र क्र. 2022/P/50/10). याकाळात महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ महायुती, २०१९ ते २०२२ महाविकास आघाडी व २०२२ ते २०२४ महायुतीचे शासन होते.

राज्य शासनांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे किंवा वेळेत उत्तर न दिल्यामुळे रेल्वेचा दुहेरीकरण प्रकल्प रद्द झाल्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून भारतीय रेल्वेत आधुनिकीकरण व क्रांती सुरु असताना कोकण मात्र त्यापासून वंचित आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग नसून स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे हे घडते. केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला निधी मिळत नाही. त्यांना पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या निधीकरिता राज्य शासन व बाहेरील कर्जांवर अवलंबून राहावे लागते.

संपूर्ण देशात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून रेल्वे विकास प्रकल्प सुरु असताना केवळ स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे कोकणाला त्याचा लाभ न देणे अन्यायकारक आहे. ६ ऑगस्ट, २०२३ ला आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील (म्हणजेच महाराष्ट्रातील) एकाही स्थानकाचा समावेश नाही.

महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या सावंतवाडी टर्मिनसचे कामही तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये भूमिपूजन करूनही अपूर्णच आहे. यालाही कोकण रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्वच कारणीभूत आहे. २००८ मध्ये होणारे विलीनीकरण आज २०२४ पर्यंतही न झाल्यामुळे रेल्वे सुधारणांच्या बाबतीत कोकण आधीच १५ वर्षे मागे पडला असून आणखी उशीर झाल्यास आणखी बऱ्याच संधी हुकतील.

देशातील व्यस्त व जास्त प्रवासी घनता असलेल्या मार्गांचे High Density Network (HDN) किंवा Highly Utilized Network (HUN) असे वर्गीकरण केले जाते. या मार्गांच्या क्षमतावृद्धीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जातात. यात दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण, गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधांचे काम व इतर अनेक कामे केली जातात. परंतु, केवळ स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे १६८% वापर असूनही कोकण रेल्वे मार्गाचा यात समावेश झालेला नाही.

याचकरिता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील सर्व समाजघटक कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी माजी खासदार श्री. विनायक राऊत, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, खासदार श्री. सुनील तटकरे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे, खासदार श्री. रविंद्र वायकर, खासदार श्री. धैर्यशील पाटील तर कर्नाटकातील खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार कॅप्टन ब्रिजेश चोवटा यांनी व इतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनीही ही मागणी लावून धरली आहे.

कोकण रेल्वेत सुरुवातीला केंद्र शासन ५१%, महाराष्ट्र २२%, कर्नाटक १५% तर गोवा व केरळ प्रत्येकी ६% आर्थिक भागीदार होते. आताच्या बदलांनुसार हे समभाग केंद्र शासन ६५.९७%, महाराष्ट्र १५.५७%, गोवा ३.५९%, कर्नाटक १०.६२% आणि केरळ ४.२५% या प्रमाणात आहेत. परंतु, सर्वात कमी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या दोन राज्यांनाच कोकण रेल्वेकडून सर्वाधिक गाड्या व सुविधा मिळाल्या आहेत. सर्वाधिक गुंतवणूक करून महाराष्ट्र व त्याखालोखाल कर्नाटक अजूनही पुरेशा रेल्वे सुविधांकरिता अजूनही संघर्ष करत आहेत.

कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याआधी ही कंपनी १००% मालकी हक्कांसहित केंद्र शासनाच्या अखत्यारित येणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य शासनांनी त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन केले पाहिजेत असे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी व खासदार श्री. धैर्यशील पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रशांत उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

म्हणून, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राकडून मान्यता मिळण्याकरिता आपण प्रयत्न करावेत. त्यासाठी गरज पडल्यास महाराष्ट्राच्या ताब्यात आता असलेले ३९६.५४२५ कोटी रुपयांचे समभाग कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला सुपूर्द करावेत. ते केल्यानंतर कोकण रेल्वे केंद्र शासनाच्या ताब्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम न राहता ताबडतोब भारतीय रेल्वेत विलीन केले जाईल याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून लेखी हमी घ्यावी.

दोन शासकीय विभागांतील समन्वय कठीण असून दोन रेल्वे विभागांसंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी रेल्वे बोर्डाची मध्यस्थी आवश्यक ठरते. तर एकच विभाग असल्यास संबंधित महाव्यवस्थापक (General Manager) आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही विभागातील नागरिकांना आपल्या राज्याच्या राजधानीकडेच जास्त प्रवास करावा लागतो. त्यानुसार कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग (रोहा ते मडुरे मार्ग) मध्य रेल्वेत व कारवार विभाग (पेडणे ते ठोकूर मार्ग) नैऋत्य (दक्षिण पश्चिम) रेल्वे विभागात विलीन झाल्यासच स्थानिकांच्या मागण्या व्यवस्थित पूर्ण होऊ शकतील.

मुंबई, पुणे, भुसावळ व सोलापूर विभागांच्या माध्यमातून ७०% महाराष्ट्र मध्य रेल्वेच्या अखत्यारित असल्यामुळे कोकणही त्याच विभागाकडे असावा हेच प्रवासी हिताचे आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे एकाच विभागा अंतर्गत येतील व राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात सक्षम रेल्वे सुविधा पुरवणे मध्य रेल्वेला शक्य होईल. नांदेड विभाग मध्य रेल्वेकडे नसून दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्यामुळे तेथून मुंबईला येणाऱ्या गाड्यांपेक्षा तेलंगणातील हैदराबादला जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत.

कोकण रेल्वे स्वतंत्र झोन झाल्यास त्याचे मुख्यालय महाराष्ट्रातून बाहेर जाईल. हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा तोटा असेल. तसेच, स्वतंत्र झोनसाठी महाव्यवस्थापक आणि इतर प्रशासकीय पद निर्मिती तसेच नवीन मुख्यालयासाठी भूसंपादन व मुख्यालयाचे बांधकाम ही अत्यंत खर्चिक कामे आल्यामुळे विलीनीकरणास आणखी उशीर होईल. तसेच मुख्यालय महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे कोकण रेल्वेत आपला कोकण व महाराष्ट्र क्वचितच दिसेल. इतर सर्व रेल्वे झोन २००० ते ५००० किलोमीटर मार्गाचे असताना केवळ ७४१ किलोमीटरचा स्वतंत्र कोकण झोन तयार करणे व्यवहार्य नाही.

वरील सर्व बाबींचा व प्रवाशांच्या हिताचा विचार करता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेला व कारवार विभाग नैऋत्य रेल्वेला जोडण्यासाठी आपण आपल्या अधिकारात प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती.

सध्याच्या विधानसभेच्या २०२४ ते २०२९ या कार्यकाळातच हा ऐतिहासिक निर्णय व्हावा अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या स्थापनेकरिता आदरणीय श्री. मधू दंडवते, श्री. जॉर्ज फर्नांडिस व सर्व मुख्यमंत्र्यांची आजही आठवण काढली जाते त्याचप्रमाणे ज्यांच्या कार्यकाळात हे विलीनीकरण होईल त्यांचे नावही इतिहासात अजरामर होईल. आपण ही संधी गमावू नये, ही नम्र विनंती.” 

 

 

३१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 14:01:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 28:15:09 पर्यंत
  • करण-कौलव – 14:01:31 पर्यंत, तैतिल – 24:51:48 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 15:32:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:13:13
  • सूर्यास्त- 18:30:50
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 08:35:59
  • चंद्रास्त- 20:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:

  • १८९३: आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.
  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
  • १९१५: जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.
  • १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकावी सुरूवात
  • १९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
  • १९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण ४९ सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.
  • १९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
  • १९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
  • १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
  • १९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
  • २०००: हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.
  • २००५: आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.
  • २०१०: ला हॉलीवूड चित्रपट अवतार ने २ बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८), त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २१ आक्टोबर १९८१)
  • १९२३: परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
  • १९३२: पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म.
  • १९४९: ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेश विवेक यांचा जन्म.
  • १९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
  • १९७७: मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी यांचा जन्म.
  • १९८६: भारतीय अभिनेत्री मनीषा केळकर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
  • १९६१: बिहार चे माजी मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांचे निधन.
  • १९६९: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)
  • १९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे (जन्म: ? ? ????)
  • १९८६: विश्वनथ मोरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • १९९५: सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण (जन्म: ? ? ????)
  • २०००: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
  • २०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
  • २००४: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
  • २००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

MSRTC: एसटीचा “आवडेल तेथे कोठेही प्रवास” महागला; सुधारित दर असे असतील

   Follow us on        
MSRTC: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नुकतीच एसटी बस दरात १५ टक्क्यांची वाढ केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच आता एसटी महामंडळाच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या सवलत योजनेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या योजने अंतर्गत येणाऱ्या बससेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हे दर १ फेब्रुवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

पासचे सुधारित दर खालीलप्रमाणे

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 1814 910
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 2533 1269
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 2861 1433

७ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 3171 1588
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 4429 2217
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 5003 2504

दहावी बारावी परीक्षांना बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी; मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्रालयाला पत्र

   Follow us on        

मुंबई – पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या बुरखा बंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नितेश राणेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, १० वी आणि १२ वी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. जर या परीक्षेत बुरखा घालून कुणी परीक्षा देत असेल तर संबंधित युवती इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून परीक्षेत हेराफेरी आणि कॉपीचीही शक्यता नाकारता येत नाही. जर अशा घटना घडल्या तर अनेक समस्या निर्माण होतील म्हणुन परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

३० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 16:13:08 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 07:16:17 पर्यंत, धनिष्ठा – 29:51:37 पर्यंत
  • करण-भाव – 16:13:08 पर्यंत, बालव – 27:08:56 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 18:33:02 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:15
  • सूर्यास्त- 18:29
  • चन्द्र-राशि-मकर – 18:35:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:52:59
  • चंद्रास्त- 19:26:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • कुष्ठरोग निवारण दिन
  • नशा मुक्ती संकल्प आणि शपथ दिवस.
  • आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस.
  • शहीद दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.
  • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.
  • १९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
  • १९७१: आजच्या दिवशी फोकर फ्रेंडशिप विमान चे अपहरण झाले होते.
  • १९७२: आजच्या दिवशी कॉमनवेल्थ मधून पाकिस्तान बाहेर निघाले.
  • १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
  • १९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
  • १९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’
  • २००४: मंगळावर पाठविलेल्या अपॉर्चुनिटी अंतरीक्ष यानाने मंगळावर आयरन ऑक्साइड (गंज) असल्याचे शोधल्या गेले.
  • २००८: चेन्नई च्या विशेष न्यायालयाने स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी ला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली.
  • २००९: ऑस्ट्रेलिया च्या मिक्स ओपन मध्ये सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांची जोडी अंतिम फेरीत पोहचले.
  • २००९: कोका कोला क्लासिक चे नाव बदलवून कोका कोला करण्यात आले.
  • २०१६: दक्षिण कोरिया ने त्याचे पहिले रॉकेट रॉकेट नारो-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)
  • १८८९: हिन्दी भाषेतील प्रसिद्ध कवी जयशंकर प्रसाद यांचा जन्म.
  • १९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)
  • १९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७)
  • १९१३: प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचा जन्म.
  • १९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७)
  • १९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)
  • १९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
  • १९३७: भारतीय न्यायाधीश के.टे. थॉमस यांचा जन्म.
  • १९४९: डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, ’थिएटर अ‍ॅकॅडमी’चे एक संस् थापक,’ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते
  • १९५१: भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा जन्म.
  • १९७५: भारतीय कलाकार अनुप सोनी यांचा जन्म.
  • १९८०: छोट्या पडद्यांवरील कलाकार गुरदीप कोहली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५२८: राजपूत राजवंशाचे राजा राणा संग्राम सिंह यांचा जन्म.
  • १९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)
  • १९४८: महात्मा गांधी (जन्म: २ आक्टोबर १८६९)
  • १९५१: फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)
  • १९६०: प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, नाथूराम प्रेमी यांचे निधन.
  • १९६०: गांधीवादी व्यक्तिमत्व जे.सी. कुमारप्पा यांचे निधन.
  • १९६८: प्रसिद्ध लेखक, कवी, माखन लाल चतुर्वेदी यांचे निधन.
  • १९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक (जन्म: ? ? ????)
  • २०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • २००४: रमेश अणावकर – गीतकार (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर चालू करा अन्यथा ‘त्या’ गाड्या सोडू दिल्या जाणार नाही; रेल कामगार सेनेचा रेल्वेला इशारा

   Follow us on        
मुंबई : जवळपास वीस वर्षे दादर जंक्शनवरून रत्नागिरीसाठी सुटणारी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपुर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दणका दिला. दि. ९ जानेवारीला दिलेल्या पत्राची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या १ मार्चला गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटू देणार नाही, असा सज्जड लेखी इशारा कोकणवासीयांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.
“दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरु करण्यासंदर्भात आम्ही यापूर्वी दि.०१.०१.२०२५ रोजी आपणास भेटून विनंती केली होती. आपणही लवकरात लवकर सदर दोन्ही ट्रेन लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सुमारे १९ दिवस होऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. समस्त कोकणवासिय न्याय मागण्यासाठी सातत्याने आपणाकडे विनंतीवजा पाठपुरावा करीत असूनही आपणाकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याची शंका आम्हा सर्वांना येत आहे. यास्तव पुनःश्च आपणास विनंती करण्यात येते की, दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार तातडीने सुरु कराव्यात. यासंदर्भात रेल्वे विभागाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास दि. १ मार्च २०२५ रोजी दादर स्टेशनवरून सुटणाऱ्या दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या ट्रेनसमोर रेल रोको आंदोलन केले जाईल आणि दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या रेल्वे सोडू दिल्या जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.” अशा शब्दात हा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दिला आहे.

सिंधदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान

   Follow us on        
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. बाहेरून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर काढणार असे विधान त्यांनी केले आहे.
माझ्या जिल्ह्यामध्ये परप्रांतीयांची मस्ती चालणार नाही. युपी- बिहार आणि बाहेरचे फेरीवाले इथे आले आहेत त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढणार. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ते म्हणाले.
अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून युपी बिहारला थेट जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही परप्रांतीय बेकायदेशीररित्या अवैध ड्रुग्स आणि दारूच्या तस्करी मध्ये आढळून आले आहेत. या पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.

मुंबई गोवा महामार्ग इथेही ‘बदनाम’

   Follow us on        
Mumbai Goa Highway:मुंबई गोवा महामार्गाचे काम काही केल्या पूर्णच होत नाही आहे. कोकणवासीयांना मिळत आहेत त्या पुढे ढकलत जाणाऱ्या फक्त तारखा! गेल्या १७ वर्षांपासून या महामार्गाचे रखडले काम, सुमार दर्जाचे काम या महामार्गावरून नेहमीच टीकेची झोड उठत आहे. हे कमी होते म्हणून की काय या महामार्गाविषयी नकोशी वाटणारी अजून एक बातमी समोर आली आहे.
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे.  गौण खनिज उत्खननाचा  कर  (रॉयल्टी) न  भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना  नोटिस बजावण्यात आली आहे. या चार ही  कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी एवढा कर थकविला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेगाने सुरु आहे. या कामाचे  सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले. मात्र दुसऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. डिसेंबर २०२५ हा महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाचा कर  भरला नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला आहे.  इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस), ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी),चेतक इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा अशी त्या चार कर बुडविणाऱ्या कंपनीची नावे आहेत.

प्रयागराज कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती, शाही स्नान रद्द

   Follow us on        

Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search