Author Archives: Kokanai Digital

०२ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

  • आजचे पंचांग
  • तिथि-अष्टमी – 07:25:25 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 07:25:25 पर्यंत, बालव – 20:36:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 19:12
  • चन्द्र-राशि-तुळ – 23:53:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:26:00
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1677 : शिवाजी महाराजांनी तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनाला भेट दिली. तेथे त्यांनी डच प्रतिनिधींशी चर्चा केली.
  • 1790 : अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू झाली.
  • 1870 : टॉवर सबवे, जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे, लंडनमध्ये उघडली.
  • 1923 : केल्विन कूलिज हे अमेरिकेचे 30 वे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
  • 1979 : नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे आणि त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 1990 : इराकने कुवेतवर आक्रमण करून आखाती युद्धाला सुरुवात केली.
  • 1996 : अटलांटा ऑलिम्पिकमध्ये, अमेरिकेचा मायकेल जॉन्सन हा ऑलिम्पिक इतिहासातील पहिला ऍथलीट बनला ज्याने त्याच ऑलिम्पिक स्पर्धेत 200 आणि 400 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले.
  • 2001 : ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते पुलेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1820 : ‘जॉन टिंडाल’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 डिसेंबर 1893)
  • 1834 : ‘फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड’ – स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1904)
  • 1835 : ‘अलीशा ग्रे’ – वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1901)
  • 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
  • 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
  • 1877 : ‘रविशंकर शुक्ला’ – मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 31 डिसेंबर 1965)
  • 1892 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1978)
  • 1910 : ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 17 फेब्रुवारी 1978)
  • 1918 : ‘जे. पी. वासवानी’ – आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा यांचा जन्म.
  • 1929 : ‘विद्याचरणा शुक्ला’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुन 2013)
  • 1932 : ‘लमेर हंट’ – अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2016)
  • 1941 : ‘ज्यूल्स हॉफमन’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘बंकर रॉय’ – भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचा जन्म.
  • 1958 : ‘अर्शद अयुब’ – भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1589 : ‘हेन्‍री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1551)
  • 1781 : ‘सखारामबापू बोकील’ – पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली मंत्री यांचे निधन.
  • 1922 : ‘अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल’ – टेलिफोन चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 मार्च 1847)
  • 1934 : ‘पॉल फॉन हिन्डेनबर्ग’ – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 2 ऑक्टोबर 1847)
  • 1978 : ‘अॅन्टोनी नोगेस’ – मोनॅको ग्रांप्री चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 13 सप्टेंबर 1890)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

वैभववाडी: देव तरी त्याला कोण मारी! करूळ घाटातील अपघातात दोघेजण थोडक्यात वाचले

   Follow us on        

वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.

अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली.  टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.

   

सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले.  चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

 

३१ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 29:00:25 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 24:42:33 पर्यंत
  • करण-गर – 15:50:07 पर्यंत, वणिज – 29:00:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 28:32:00 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या – 11:16:07 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:46:00
  • चंद्रास्त- 23:26:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक रेंजर दिन
  • हॅरी पॉटर वाढदिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1498 : ख्रिस्तोफर कोलंबस हा पश्चिम गोलार्धातील तिसऱ्या प्रवासादरम्यान त्रिनिदाद बेटांचा शोध घेणारा पहिला युटोपियन बनला.
  • 1657 : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
  • 1658 : औरंगजेब मुघल सम्राट झाला.
  • 1856 : न्यूझीलंडची राजधानी क्राइस्ट चर्चची स्थापना.
  • 1937 : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
  • 1948 : न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ उघडले.
  • 1951 : जपान एरलाइन्सची स्थापना झाली.
  • 1954 : के-2 (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर इटालियन गिर्यारोहकांनी प्रथमच सर केले.
  • 1956 : जिम लेकर कसोटी सामन्यात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
  • 1964 : रेंजर 7 अंतराळयानाने चंद्राची पहिली स्पष्ट छायाचित्रे घेतली.
  • 1992 : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • 1992 : सातारचे वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2000 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्र डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2001 : डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार संचालक प्रदान.
  • 2012 : मायकेल फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याचा विक्रम मोडला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1704 : ‘गॅब्रिअल क्रॅमर’ – स्विस गणिती यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 1752)
  • 1800 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1882)
  • 1872 : ‘लक्ष्मणरामचंद्र पांगारकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1941)
  • 1880 : ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 8 नोव्हेंबर 1936)
  • 1886 : ‘फ्रेड क्विम्बे’ – अमेरिकन अ‍ॅनिमेशन चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 16 सप्टेंबर 1965)
  • 1902 : ‘के. शंकर पिल्ले’  व्यंगचित्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 1989)
  • 1907 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 29 जून 1966)
  • 1912 : ‘मिल्टन फ्रिडमन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 16 नोव्हेंबर 2006)
  • 1918 : ‘डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर’ – संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 10 एप्रिल 2000)
  • 1919 : ‘हेमू अधिकारी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
  • 1941 : ‘अमरसिंग चौधरी’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑगस्ट 2004)
  • 1947 : ‘मुमताज’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1954 : ‘मनिवंनान’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जून 2013)
  • 1965 : ‘जे. के. रोलिंग’ – हॅरी पॉटर च्या लेखिका यांचा जन्म.
  • 1992 : ‘श्रेया आढाव’ – आहारतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1992 : ‘कियारा अडवाणी’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1750 : ‘जॉन (पाचवा)’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1689)
  • 1805 : ‘धीरान चिन्नमलाई’ – तामिळ सरदार यांचे निधन. (जन्म : 17 एप्रिल 1765)
  • 1865 : ‘जगन्नाथ शंकर शेटे’ – आधुनिक मुंबईचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1803)
  • 1875 : ‘अँड्रयू जॉन्सन’ – अमेरिकेचे 17वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1808)
  • 1940 : ‘उधम सिंग’ – भारतीय कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1899)
  • 1968 : ‘पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचे निधन. (जन्म : 19 सप्टेंबर 1867)
  • 1980 : ‘मोहंमद रफी’ – पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1924 – कोटला सुलतान सिंग, पंजाब)
  • 2014 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 23 जून 1948)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

३० जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 26:43:39 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 21:53:56 पर्यंत
  • करण-कौलव – 13:42:43 पर्यंत, तैतुल – 26:43:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 27:40:13 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 10:56:59
  • चंद्रास्त- 22:52:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
  • व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 762 : 762ई.पुर्व : खलीफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
  • 1629 : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप झाला आणि सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1898 : विल्यम केलॉगने कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
  • 1930 : पहिला विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
  • 1945 – दुसरे महायुद्ध : जपानी पाणबुडी I-58 ने यूएसएस इंडियानापोलिस बुडवले आणि 883 नाविकांचा मृत्यू झाला. विमानाने वाचलेल्यांना लक्षात येईपर्यंत पुढील चार दिवसांत बहुतेकांचा मृत्यू होतो.
  • 1962 : ट्रान्स कॅनडा महामार्ग, जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, सुमारे 8,030 किमी खुला झाला.
  • 1971 : अपोलो 15 चंद्रावर उतरले.
  • 1997 : राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना जाहीर.
  • 2000 : चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
  • 2001 : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2014 : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू.
  • 2020 : नासाच्या मंगळ 2020 मोहिमेचे केप कॅनवेरल एअर फोर्स स्टेशनवरून ॲटलस V रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1818 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1848)
  • 1855 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1919)
  • 1863 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 1947)
  • 1947 : ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर’ – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38वे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1951 : ‘गॅरी यहूदा’ – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू निगम’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू सूद’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1980 : ‘जेम्स अँडरसन’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1622 : ‘संत तुलसीदास’ – यांनी देहत्याग केले.
  • 1718 : ‘विल्यम पेन’ – पेनसिल्व्हेनियाचे स्थापक यांचे निधन.
  • 1898 : ‘ऑटोफोन बिस्मार्क’ – जर्मनीचे पहिले चान्सलर यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1815)
  • 1930 : ‘जोन गॅम्पर’ – बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1877)
  • 1947 : ‘जोसेफ कूक’ – ऑस्ट्रेलियाचे 6वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1960 : ‘गंगाधर बाळकृष्ण देशपांडे’ – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 31 मार्च 1871)
  • 1983 : ‘वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक यांचे निधन. (जन्म : 2 मे 1920)
  • 1994 : ‘शंकर पाटील’ – मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1926)
  • 1995 : ‘डॉ. विनायक महादेव दांडेकर’ – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1920)
  • 1997 : ‘बाओडाई’ – व्हिएतनामचा राजा यांचे निधन.
  • 2007 : ‘इंगमार बर्गमन’ – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2007 : ‘मिकेलांजेलो अँतोनियोनी’ – इटालियन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2011 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1937)
  • 2013 : ‘बेंजामिन वॉकर’ – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search