बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
याविषयी महाराष्ट्र पोलिस निरीक्षक पवार यांच्याशी संपर्क साधला असता गोवा आणि महाराष्ट्र पोलिसांचे चांगले संबंध राहावेत. त्यासाठी संयुकरतीत्या ही मोहीम राबवली जात आहे. वेळप्रसंगी गोव्यातील पोलिस महाराष्ट्र हद्दीमध्ये येऊन महाराष्ट्रातील वाहने गोव्यात जात असतील आणि एखाद्यावेळी संशय असेल तर तेसुद्धा तशा प्रकारची तपासणी करू शकतात, असे सांगितले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.
Konkan Railway News 20/11/2023 : ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे तर्फे मुंबई आणि पुण्यावरून काही विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. आज या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख पण जाहीर करण्यात आली आहे.
1)खालील विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 21 नोव्हेंबर पासून पिआरएस PRS काऊंटर वर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी करंजाडी ते कामथे विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore – Jabalpur Special
दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ११० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
१) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ७० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
दापोली :कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी Seagull Birdअवतरले असून, त्यांच्या येण्याने दापोली तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे गजबजले आहेत. हर्णैच्या किनाऱ्यावर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मज्जा करत असतात. विशेषतः सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहारण्याची शैली पाहता प्रत्यक्षदर्शीची करमणूक होत आहे.
या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोगा असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळतात. यावर्षीही या पक्ष्यांचे आगमन झाल्याने किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. पुढील दोन-तीन महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जाणार आहेत.
थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात. दिवाळी सुटीमुळे किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.
Konkan Railway News:हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमस साठी गोव्याकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
ही गाडी दिनांक २२/१२/२०२३ आणि २९/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01454 Mangaluru Jn. -Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २३/१२/२०२३ आणि ३०/१२/२०२३ या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01455 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक २४/१२/२०२३ आणि ३१/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २५/१२/२०२३ आणि ०१/०१/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २६/१२/२०२३ आणि ०२/०१/२०२४ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:०५ वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २७/१२/२०२३ आणि ०३/०१/२०२४ या दिवशी मंगुळुरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १४:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01459 Lokmanya Tilak (T) – Karmali Special (Weekly):
ही गाडी दिनांक २१/१२/२०२३ आणि २८/१२/२०२३ या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01460 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
ही गाडी दिनांक २२/१२/२०२३ आणि २९/१२/२०२४ या दिवशी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ११:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
सावंतवाडी :सावंतवाडी रेल्वे स्थानकावर बऱ्याच सुविधेंचा अभाव आहे. येथून मिळणारे उत्त्पन्न तुलना केल्यास चांगले असूनही खूप कमी गाडयांना येथे थांबे आहेत. टर्मिनस चे काम अपुरे आहेत. असे अनेक प्रश्न असल्याने सावंतवाडीकर कधी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, तर कधी राजकीय पुढाऱ्यांना निवेदने देत आहेत. तरीही सर्वच प्रश्नच तसेच आहे. उलट सावंतवाडीकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार कोकण रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडून होताना दिसत आहेत. निवेदने स्वीकारताना दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता सावंतवाडीकरांना कोकण रेल्वे प्रशासनाने ‘भीक नको पण कुत्रा आवर’ या म्हणीप्रमाणे म्हणण्याची वेळ आणून ठेवली आहे.
काल कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय गुप्ता सावंतवाडी स्थानकाच्या भेटीला आले असता आपल्या ग्रुप तर्फे मिहिर मठकर, विनायक गवस आणि भूषण बांदिवडेकर यांनी सावंतवाडी स्थानकातील गैरसोयी बद्दल निवेदन दिले परंतु श्री गुप्ता यांनी दिलेल्या निवेदनाची अक्षरशः थट्टा केली. ते या वरही ना थांबता स्वर्गीय डी के सावंत यांच्याबद्दल टिपण्णी केली असल्याचा आरोप मिहिर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. यावेळचा विडिओ देखील त्यांनी बनवला असून त्यात श्री संजय गुप्ता हे या मागण्यांची चेष्ठा करताना दिसत आहेत.
मागे ऑगस्ट महिन्यात मीहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली होती. त्यावेळी सावंतवाडी स्थानकावरील राजधानी एक्सप्रेस या गाडीचा थांबा पूर्ववत करावा तसेच वंदे भारत तसेच अन्य गाडयांना या स्थानकावर थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावेळी वी.स. सिन्हा यांनी राजधानी सारख्या गाड्यां मधून प्रवास करण्याची सावंतवाडीकरांची कुवत नाही असे अपमानास्पद विधान केले होते.
मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.
Konkan Railway News: पुढील महिन्यात कोकणात गावी कोकणवासीयांची आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – थिविम – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक)
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01151 मुंबई CSMT – थिविम स्पेशल म्हणून रोज धावणार आहे 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत ही गाडी जाणार आहे. मुंबई CSMT येथून दररोज 00.20 वाजता हि गाडी सुटे आणि त्याच दिवशी 14.00 वाजता थिविमला पोहोचेल.
गाडी क्र. 01152 थिविम – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) गाडी असेल. थिविम येथून हि गाडी 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत दररोज 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
ही गाडी एकूण 22 डब्यांची असेल. त्यात दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 05 डबे, एसएलआर – 02 अशी रचना असेल.
२) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)
गाडी क्र. ०१४४५ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन शुक्रवार, 22/12/2023 आणि 29/12/2023 रोजी 17:30 वाजता सुटून ट दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४६ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार, 24/12/2023 आणि 31/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:35 वाजता पोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.
3) गाडी क्र. ०१४४८ / ०१४४७ करमाळी – पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) :
गाडी क्र. 01448 करमाळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01447 पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी पनवेल येथून 22:00 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.
मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.
दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.
प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे.
सिंधुदुर्ग :दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.
श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो.
या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे