ठाणे:मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी कोकण रेल्वेची अवस्था झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. आरक्षित डब्यांतून प्रतीक्षा तिकीट धारकांना प्रवासावर प्रतिबंध घालण्यात आल्याने ही गर्दी भयंकर वाढली आहे. मडगाव येथून मुंबईसाठी सकाळी सुटणारी मांडवी एक्सप्रेस सिएसएमटी येथे पोचल्यावर कोकणकन्या एक्सप्रेस बनते. या गाडीच्या जनरल डब्यांत जागा मिळविण्यासाठी दादर, ठाणे आणि पनवेल स्थानकाहून डाऊन करणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या गाडीतून उतरणार्या प्रवाशांची संख्या, डाऊन करणार्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि या गाडीला या स्थानकांवर गाडी थांबण्याचा कमी अवधी या सर्वांमुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
ठाण्यात आज एक दुर्घटना होता होता टळली
ठाणे स्थानकावर आज एक दुर्घटना होता होता टळली. मांडवी एक्सप्रेस ठाण्यात आल्यावर डाऊन करणार्या प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्यामुळे उतरणार्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीस सामोरे जावे लागले. ठाणे स्थानकावर आठ नंबर प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्यास पनवेलच्या दिशेने फलाट आणि गाडीच्या फुटबोर्ड दरम्यान खूप मोठे अंतर होते. त्यामुळे उतरणार्या प्रवाशांना या गर्दीमुळे अंदाज आला नाही. त्यामुळे गाडीतून उतरताना एक प्रवासी चक्क खाली रूळावर गेला. काहींच्या बॅगा ही खाली गेल्या. सुदैवाने एकदम मागचा डबा असल्याने तत्परतेने गार्डला पाचारण करण्यात आले आणि त्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अलीकडेच बांद्रा येथे गाडी पकडताना प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन काही प्रवासी गंभीर झाले होते. त्यातील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यामुळे सध्या रेल्वे प्रशासन अशा घटना टाळण्यासाठी जनरल डब्यांजवळ रेल्वे पोलीस तैनात ठेवण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने ठाण्यातील या घटनेची गंभीर दखल घेऊन येथे रेल्वे पोलीस तैनात ठेवण्याची गरज आहे.
ठाणे : कोकणकन्या एक्सप्रेससाठी डाऊन करणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ… दुर्घटना होण्याची शक्यता…
Video Credit – Kokanai Team
सविस्तर वृत्त – https://t.co/kqgjIsdk4y@Central_Railway @KonkanRailway @RailMinIndia#konkanrailway pic.twitter.com/PoGMBoRHtx— Kokanai Digital News Channel (@kokanai21) November 11, 2024
ठाणे :कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यांतून डाऊन करणार्या प्रवासांच्या संख्येत वाढ….दुर्घटना होण्याची शक्यता.. @Central_Railway@KonkanRailway@RailMinIndia
Video Credit – Kokanaiसविस्तर वृत्त – https://t.co/kqgjIsdk4y pic.twitter.com/tjRxUfEdfS
— Kokanai Digital News Channel (@kokanai21) November 11, 2024
Vision Abroad