दिव्यांगांना सुद्धा आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार

मुंबई : वरीष्ठ नागरिकांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवासाची सुविधा आता दिव्यांगांना पण दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.

Loading

Facebook Comments Box

अतिवृष्टीचा कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम; ‘या’ गाड्या उशिरा सुटणार

रत्नागिरी |राज्यात होणार्‍या अतिवृष्टीचा परिणाम कोकण रेल्वेवर पण झाला आहे. कुडाळ आणि झाराप या स्थानकांदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणुन या मार्गावरील काही गाड्या आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सुटणार आहेत.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार खालील गाड्यां आज दिनांक 20 जुलै रोजी आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सोडण्यात येणार आहेत.




1.संध्याकाळी 7 वाजता सुटणारी 01140 मडगाव नागपूर विशेष गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 10 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.

2.संध्याकाळी 6 वाजता सुटणारी 20112 मडगाव – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 9 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.



3.संध्याकाळी 5:55 सुटणारी 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 8:55 वाजता सावंतवाडी स्थानकावरून सुटणार आहे.

Loading

Facebook Comments Box

Rainfall Updates | मुंबईसह कोकणातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व  संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढून उद्या  प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे

Loading

Facebook Comments Box

राज्यात चार जिल्ह्यांना आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रायगड : हवामान खात्याने IMD दिलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यामुळे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील 24 तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

IMD ने आज दिनांक 19 जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

Loading

Facebook Comments Box

कोंकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या २ गाड्यांचे जनरल डबे कमी केले.

Kokan Railway | रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या LHB डब्यांच्या संरचनेत काही बदल केले आहेत. या दोन्ही गाड्यांचे प्रत्येकी एक जनरल डबा कमी करण्यात आले असून इतरही काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे

1) 22113/22114 Lokmanya Tilak (T) - Kochuveli - Lokmanya Tilak (T) Bi-Weekly Express

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )01-डबा कमी केला
टू टियर एसी0101बदल नाही
थ्री टायर एसी0507२ डबे वाढवले
स्लीपर 0909बदल नाही
जनरल 0403१ डबा कमी केला
जनरेटर कार 0202बदल नाही
एकूण 2222

दिनांक ०४/११/२०२३ पासून Train no. 22113 ex. Lokmanya Tilak (T) ही गाडी तर दिनांक 06/11/2023Train no. 22114 ex. Kochuveli ही गाडी या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.

 

2) 11099 / 11100 Lokmanya Tilak (T) - Madgaon Jn. - Lokmanya Tilak (T) Express

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )0101बदल नाही
फर्स्ट एसी ---
टू टियर एसी0102१ डबा वाढवला
थ्री टायर एसी0806२ डबे कमी केले
स्लीपर 0608२ डबे वाढवले
जनरल 0302१ डबा कमी केला
एसएलआर-01१ डबा वाढवला
पेन्ट्री कार0101
जनरेटर कार0201१ डबा कमी केला
एकूण 2222

दिनांक 10/11/2023 पासून या दोन्ही गाड्या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

पर्यटकांना भुरळ पाडणारा मुंबई-गोवा महामार्गालगतचा ‘सवतसडा धबधबा’ प्रवाहित

चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.

मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.

या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर  उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.

धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.

Loading

Facebook Comments Box

आंबोली धबधबा | पर्यटकांकडुन शुल्क आकारण्याचा निर्णय स्थगित

सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर लागोपाठ दोन दिवस मेगाब्लॉक; ६ गाड्यांवर परिणाम

 

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी लागोपाठ दोन दिवस देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 

A) संगमेश्वर ते भोके

संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 असा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक मुळे खालील गाड्यांवर परिणाम होणार आहे. 

1) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुनेलवेली-जामनगर एक्सप्रेस 11577 ही गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 उशिराने चालविण्यात येणार आहे. 

2) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास उशिराने चालविण्यात येणार आहे. 

B) कुडाळ ते वेर्णा

दि. 12 रोजी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्‍या सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) 12 जुलै रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी -मडगाव (12051) ही जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास थांबवून ठेवण्यात येणार आहे. 

2) दि. 11 जुलैला सुटणारी हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस (12618) ही गाडी रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास उशिराने चालविण्यात येणार आहे. 

3) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे उशिराने चालणार आहे. 

4) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटेे उशिराने चालविण्यात येणार आहे. 

Loading

Facebook Comments Box

वंदेभारत एक्सप्रेसचा रंग बदलणार; ‘हे’ आहे कारण

 

Vande Bharat Express :निळ्या आणि पांढर्‍या रंगातील वंदे भारत एक्सप्रेसला आता नवीन लूक मिळणार आहे. यापुढे निर्मिती होणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाच्या असणार आहेत.

सध्या असलेला पांढरा रंग धूळ चिटकून खराब होत असल्याने लूक व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला वारंवार धुवून साफ करावे लागत आहे. हे जरा जास्त गैरसोयीचे होत असल्याने त्याला पर्यायी दुसरा कोणता रंग देता येईल याबद्दल ईतर रंगाचे पर्याय शोधले जात आहेत. सध्या भगव्या Orange आणि राखाडी Grey रंगाचा पर्याय विचाराधीन असून एका गाडीला प्रायोगिक तत्त्वावर हा रंग दिला आहे. या रंगाना हिरवा झेंडा भेटल्यास भविष्यात सर्वच वंदे भारत एक्सप्रेस भगव्या आणि राखाडी रंगाच्या दिसणार आहेत. या बदला बरोबरच प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी आसनव्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार आहेत. 

भगवा रंग देशाच्या झेंड्याच्या रंगातून घेतला आहे असे केंदीय रेल्वे मंत्री आदित्य वैष्णव म्हणाले आहेत. भगवा रंग भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे तर राखाडी रंग आधुनिकतेचे प्रतीक आहे म्हणुन हे दोन्ही रंग या एक्सप्रेस गाडीसाठी निवडण्यात आले आहेत.

Loading

Facebook Comments Box

कोकणच्या ‘समृद्धीला’ राज्य सरकारची मान्यता.

Mumbai : नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर प्रस्तावित असणार्‍या पेण ते पत्रादेवी या ग्रीनफील्ड महामार्गास सरकारकडून मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक जीआर गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे. कोकण तसेच गोवा ते कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. मुंबई ते कोकण पुढे गोवा असा द्रुतगती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.

कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.

महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि पुढील टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.

पेण-बलवली ते रायगड/रत्नागिरी सीमा (रायगड जिल्हा) 94.40 किलोमीटर

रायगड/रत्नागिरी सीमा ते गुहागर चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) 69.39 किलोमीटर

गुहागर,चिपळूण ते रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा (रत्नागिरी जिल्हा) 122.81 किलोमीटर

रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग जिल्हा) असा 100.84 किलोमीटर

असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे.

या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search