रायगड: अलीकडेच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मात्र याच भाषेचा चक्क महाराष्ट्रातच अपमान होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने वापरून तिची ‘हत्या’ करण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माणगाव रेल्वे स्थानकावर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकावरही हे काम चालू आहे. मात्र या सुशोभीकरणादरम्यान या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मराठी भाषेमध्ये कंत्राटदाराकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत. “स्वर्ग कोकणाचा मातीवर”, “कोकणाचा निसर्गात वंदे भारत” अशी चुकीची वाक्ये इथे वापरण्यात आली आहेत. तर येथे लावण्यात एका फलकावर काही स्थानकांची नावे मराठीत लिहिण्यात चुका झाल्या आहेत. जसे कि कुडाळच्या जागी “कुंडल”, माणगाव च्या जागी “मांणगाव” इत्यादी
रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी X च्या माध्यमातून या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या असून त्या लवकरात लवकर सुधारण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
महत्वाचे: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून; अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपल...
कोकण
Revas Reddy Coastal Highway: बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठीची निविदा NCC Ltd ने जिंकली
कोकण
मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक सेवेची पहिली गाडी मडगाववरून मुंबईच्या दिशेने रवाना; मान्यवरांची...
कोकण रेल्वे
Vision Abroad