Mumbai Goa Vande Bharat Express :मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.
गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.
यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (गोवा राज्य), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(गोवा राज्य), केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (गोवा राज्य), पर्यटनमंत्री रोहन खंवटे(गोवा राज्य), महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.
Vande Bharat trains flagged off by PM #NarendraModi today:
Mumbai Goa Vande Bharat Express :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आज दिनांक 26 जून पासून सुरू होणार आहे.
आज सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर तसेच ऑनलाईन संकेतस्थळांवर या गाडीचे आरक्षण करता येईल. आगामी 4 महिन्यांचे बूकिंग चालू होत असल्याने गणेशोत्सवासाठी सुद्धा बूकिंग करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
उद्या दिनांक 27 जून रोजी या गाडीचे उद्घाटन होणार असून नियमित सेवा बुधवार दि. 28 जून पासून सुरू होणार आहे.
Mumbai Goa Highway News :परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या पावसातही हा घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत.
रत्नागिरी जिल्हय़ात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी २४ जून रोजी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून गाडी चालवताना वाहकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
या धोक्याबरोबरच या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Mumbai Goa Vande Bharat Express : सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे पावसाळी वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. पावसाळ्यात ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवसच धावणार आहे.
मान्सूनमुळे ट्रेनचे नियमीत वेळापत्रक बदलले आहे. पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सप्रेस पावसाळ्यात मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सीएसएमटीहून पहाटे ५.३२ वाजता सुटणार असून पुढच्या १० तासांनंतर दुपारी ३. ३० वाजता मडगावला पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर रात्री १०. २५ पर्यंत ही एक्सप्रेस सीएसएमटीला पोहोचेल. मडगावहून परतीच्या प्रवासासाठी एक्सप्रेस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावणार आहे.
Ganesha Festival Special Trains:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी भाविकांसाठी मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. नियमित गाड्यांच्या आरक्षणाचा प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्यरेल्वेने या मार्गावर एक दोन नाही तर तब्बल १५६ अतिरिक्त फेऱ्या विशेष शुल्कासह चालवणार आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २७ जून रोजी खुले होणार आहे अशी माहित रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या गाड्याची माहिती खालीलप्रमाणे
१) मुंबई-सावंतवाडी रोड डेली स्पेशल (४० सेवा)-
01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
रचना: 18 स्लीपर क्लास, एक गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
2) LTT-कुडाळ- LTT विशेष (24 सेवा)
01167 स्पेशल एलटीटी 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर रोजी 22.15 वाजता सुटेल आणि ऑक्टोबरमध्ये 1.10 आणि 2.10.2023 रोजी (12 ट्रिप) आणि कुडाळला पुढील 09 वाजता पोहोचेल. दिवस
01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि ऑक्टोबर 2 आणि 3 मध्ये रात्री 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.
01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.
01152 स्पेशल मडगावहून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
Talathi Recruitment : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेद्वार किमान पदवीधारक आसावा. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)
मुंबई : गणेशोत्सवासाठी झालेल्या रेल्वे आरक्षणात काळाबाजार होत असल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. याविरोधात संघटनांनी, राजकीय नेत्यांनी तसेच सोशल मीडियावर कोकणवासीयांनी उठवलेल्या आवाजामुळे रेल्वे प्रशासनास याबाबत कारवाई करणे भाग पडले आहे. दिनांक १५ सप्टेंबर रोजी सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या आरक्षणाबाबत मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले. या खात्यांद्वारे १८१ तिकिटे काढण्यात आली होती.
गणेशोत्सवानिमित्त कोकणातील गावी जाण्यासाठी मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू असते. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. १८ मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात होता. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड केले. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर या खात्यावरून काढण्यात आलेली तिकिटे बाद करायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवाशांकडून या कारवाईचे कौतुक होत असून इतर गाड्यांच्या आरक्षणातील अशा अवैध आरक्षणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. तसेच भविष्यात अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून बनावट खात्याद्वारे होणारे आरक्षण ते होण्यापूर्वीच रोखले जावे अशी मागणी होत आहे.
ICCW RBI | तुम्ही एटीएमवर गेलाय अन् डेबीट कार्ड जर विसरला असाल तर? चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही युपीआयच्या माध्यमातून आता एटीएममधून पैसे काढू शकता.
२०२२मध्ये आरबीआयने आयसीसीडब्लू नावाची सुविधा सुरु केलीय. ज्यात आपण डेबीट कार्ड न वापरता युपीआय थ्रू एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.
यासाठी तुम्हाला फक्त एक प्रोसेस फॉलो करावी लागते. सर्वात पहिलं तुम्ही एटीएम मशीवर एटीएम कॅश विल्ड्राल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती टाका, त्यानंतर क्युआर कोड जनरेट होईल.
जनरेट झालेल्या क्युआर कोडला तुमच्या युपीआय ॲपवरुन स्कॅन करा आणि युपीआय पीन टाका. त्यानंतर ‘प्रेस हिअर फॉर कॅश’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला एटीएम मशीनमधून मिळेल.
ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाही. युपीआयचा वापर करुन तुम्ही दोन वेळा दिवसांत असे पैसे काढू शकता. तसेच प्रत्येक ट्रान्जेक्शनला तुम्ही जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढू शकता.
Mansoon Alert : उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासीयांसाठी तसेच पेरणीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहाणार्या शेतकर्यांसाठी कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशात चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा मार्ग मोकळा झाली आहे. यामुळे राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं की, ‘२३ जूनपासून कोकणातील काही भागांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर २४-२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI
Mumbai Goa Vande Bharat |कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 27 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस चालू होत आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि अनेक सुविधा असलेली ही गाडी नेमकी कशी असेल याची उत्सुकता सर्व कोकणवासीयांना आणि गोवेकरांना लागून राहिली आहे. खरे सांगायचे तर अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधांचा घेतलेला हा विशेष आढावा..
काय आहेत सुविधा
या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
कोकणातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध
प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलेशन.
प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
अत्याधुनिक प्रणाली असलेल्या शौचालयांची डब्यात सुविधा.
अर्थातच यातील काही सुविधांमध्ये श्रेणीनुसार फरक असेल. उदाहरण द्यायचे झाले तर रोटेट चेअरची सुविधा फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यांत उपलब्ध असेल.