'मुडी' : कोकणातील पारंपरिक धान्य साठवणुकीची नष्ट होत चाललेली पद्धत#kokanaiLiveNews #KonkanNews#ancientKonkan pic.twitter.com/iHYm0uEmWd
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) August 27, 2023
'मुडी' : कोकणातील पारंपरिक धान्य साठवणुकीची नष्ट होत चाललेली पद्धत#kokanaiLiveNews #KonkanNews#ancientKonkan pic.twitter.com/iHYm0uEmWd
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) August 27, 2023
Mumbai Goa Highway :मुंबई गोवा महामार्गा संबधी एक महत्त्वाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे. उद्या दिनांक उद्या २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ही बंदी असणार आहे.
गणेशोत्सवा तीन आठवड्यावर येऊन ठेपला असून मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यावर अहोरात्र काम सुरु असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण विशेषतः रायगड जिल्ह्यातील रस्ते कामावर येतोय म्हणून उद्या २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविन्द्र चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
माझ्या कोकणी चाकरमान्यांसाठी मुंबई-गोवा महामार्गाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पळस्पे ते वाकण फाटा या दरम्यान अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी जायचे असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे असे ते पुढे म्हणाले
Mumbai Goa Highway |दि.२६.०८.२०२३ :आज सकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा केला. ज्या गतीने काम होत आहे ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिनांक 10 सप्टेंबर पूर्वी या मार्गावरील सिंगल लेन चालू करणार हा आपण दिलेला शब्द आपण नक्किच पूर्ण करू असे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्याचप्रमाणे आज त्यांनी ट्विटर च्या माध्यमातून आपला शब्द पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली. ते म्हणाले…
एरवी पोटापाण्यासाठी मुंबई, ठाणे यासारख्या महानगरात राहणारे हजारो कोकणवासी गणेशोत्सवात न चुकता आपल्या मूळ गावी जातात आणि सगळ्यांसोबत एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यांचा प्रवास सुखाचा करणारच हा ध्यास आहे. यातूनच १० सप्टेंबर पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन पूर्ण करणारच हा जनतेला दिलेला शब्द आहे. त्यादिशेने झपाट्याने काम सुरु आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरु आहे. आज पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर आहे, या दौऱ्यादरम्यान पांडापूर येथील कामाची पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून या कामासाठी मागवण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरीजची माहिती घेतली. तसंच हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत असे निर्देश दिले.
दिलेला शब्द पूर्ण करायचा हा निर्धार करून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. महामार्गाचं काम पूर्ण होत आलं, हे बघून कोकणवासीयांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. हा आनंद हीच आमच्या कामाची पोचपावती आहे.
मदुराई : तामिळनाडूच्या (Tamilnadu) मदुराईमध्ये पुनालूर-मदुराई एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला भीषण आग (Train Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
#WATCH | Tamil Nadu: Fire reported in private/individual coach at Madurai yard at 5:15 am today in Punalur-Madurai Express. Fire services have arrived and put off the fire and no damage has caused to another coaches. The passengers have allegedly smuggled gas cylinder that caused… pic.twitter.com/5H7wQeGu93
— ANI (@ANI) August 26, 2023
आंबोली :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीमध्ये गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:४५ वाजता काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला या नोंदीबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या आंबोलीमधून नोंदी झाल्या आहेत. २०१४ साली आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी कुडाळ तालुक्यात काळ्या बिबट्याच्या बछड्याला पकडण्यात आले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या बिबटय़ाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्यात मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक गोष्ट असल्याचे तज्ञ सांगतात. मेलानिस्टीक बिबटे साधारणतः घनदाट जंगलांमध्ये आढळतात.
"…'या' एसटी बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा" असे आवाहन करणाऱ्या 'त्या' बस चालकाचे निलंबन – Kokanai https://t.co/qyAqHBqZMH#kokanaiLiveNews#msrtc#Ratnagiri pic.twitter.com/vrkhFshHy0
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) August 26, 2023
पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.
सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.
सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.
सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.
गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.
Content Protected! Please Share it instead.