६२५ नारळांच्या तोरणासह कोकण रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने विविध मागण्या आई भराडी देवीच्या चरणी अर्पण

गेली १७ वर्षे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी तसेच इतर कोकणातील प्रश्नांसाठी लढणार्‍या कोकण रेल्वे प्रवासी संघाचे श्री. राजू कांबळे आणि ईतर कार्यकर्त्यांनी काल आई भराडी देवीच्या जत्रेला हजेरी लावून ६२५ नारळांचे तोरण देवीस अर्पण करून कोकणवासियांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या पूर्ण होवो असे साकडे घातले.
मागण्यांचे फलक चर्चेत 
कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या प्रकारच्या ईतर मागण्याही संघटना करत आहे. काल जत्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात या मागणीचे फलक होते. हे फलक ईतर सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कोणत्या मागण्या होत्या या फलकांवर? 
  • कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
  • कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
  • “अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
  •  सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे  टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा.  मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
  • कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
  •  महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
  • कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी  आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
  • मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
  • मुंबई  – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.
Facebook Comments Box
   

1 thoughts on “६२५ नारळांच्या तोरणासह कोकण रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने विविध मागण्या आई भराडी देवीच्या चरणी अर्पण

  1. प्रसाद चंद्रकांत पेठे says:

    दोन लोकल गाड्या मुंबईतुन सुरू कराव्यात जशी रत्नागिरी दादर दिवा सावंतवाडी गाडी आहे तश्या दोन सुरू कराव्यात… व त्या गाडी रोहा न थांबता कोलाड पासून पुढे थांबाव्यात एक गाडी रत्नागिरी पर्यंत आणी एक सावंतवाडी पर्यंत असावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search