मुंबई: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने तब्बल ९६८ विशेष गाड्यांच्या (Special Trains) कालावधीत मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या ९६८ विशेष गाड्यांमध्ये दैनंदिन, साप्ताहिक, द्वि-साप्ताहिक आणि आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
गाड्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
-
७७० दैनंदिन विशेष गाड्या (Daily Special Trains)
-
११० विशेष गाड्या (आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या)
-
४४ साप्ताहिक विशेष गाड्या (Weekly Special Trains)
-
४४ द्वि-साप्ताहिक विशेष गाड्या (Bi-weekly Special Trains)
मुदतवाढ देण्यात आलेल्या सर्व गाड्यांची यादी
१. साप्ताहिक विशेष गाड्या (४४ सेवा)
-
गाडी क्र. 01435 सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष: पूर्वी १४.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता २१.०७.२०२६ ते २९.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).
-
गाडी क्र. 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर साप्ताहिक विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता २२.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).
-
गाडी क्र. 01477 सोलापूर – अनाकापल्ले साप्ताहिक विशेष: पूर्वी १०.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता १७.०७.२०२६ ते २५.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).
-
गाडी क्र. 01478 अनाकापल्ले – सोलापूर साप्ताहिक विशेष: पूर्वी ११.०७.२०२६ पर्यंत चालणार होती. आता १८.०७.२०२६ ते २६.०९.२०२६ या कालावधीत धावणार (११ सेवा).
२. आठवड्यातून ५ दिवस धावणाऱ्या गाड्या (११० सेवा)
(सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार)
-
गाडी क्र. 01421 दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत धावणार होती, तिला आता १७.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ (५५ सेवा).
-
गाडी क्र. 01422 कलबुरगी – दौंड अनारक्षित विशेष: पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत धावणार होती, तिला आता १७.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ (५५ सेवा).
३. आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाड्या / द्वि-साप्ताहिक (४४ सेवा)
(गुरुवारी आणि रविवारी)
-
गाडी क्र. 01425 दौंड – कलबुरगी अनारक्षित विशेष: पूर्वी १२.०७.२०२६ पर्यंत धावणार होती. आता १६.०७.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत धावणार (२२ सेवा).
-
गाडी क्र. 01426 कलबुरगी – दौंड अनारक्षित विशेष: पूर्वी १२.०७.२०२६ पर्यंत धावणार होती. आता १६.०७.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत धावणार (२२ सेवा).
४. दैनिक विशेष गाड्या (७७० सेवा)
या सर्व दैनंदिन गाड्या पूर्वी १५.०७.२०२६ पर्यंत अधिसूचित होत्या, आता त्यांना १६.०७.२०२६ ते ३०.०९.२०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे (प्रत्येकी ७७ सेवा):
-
गाडी क्र. 01024 कोल्हापूर – पुणे आरक्षित दैनिक विशेष
-
गाडी क्र. 01023 पुणे – कोल्हापूर आरक्षित दैनिक विशेष
-
गाडी क्र. 01487 हडपसर – हरंगुळ आरक्षित दैनिक विशेष
-
गाडी क्र. 01488 हरंगुळ – हडपसर आरक्षित दैनिक विशेष
-
गाडी क्र. 01461 सोलापूर – दौंड अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
-
गाडी क्र. 01462 दौंड – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
-
गाडी क्र. 01465 सोलापूर – कलबुरगी अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
-
गाडी क्र. 01466 कलबुरगी – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
-
गाडी क्र. 01211 बडनेरा – नाशिक अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
-
गाडी क्र. 01212 नाशिक – बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष (डेम्यू)
बुकिंग आणि आरक्षणाची माहिती:
या विशेष गाड्यांचे (गाडी क्र. ०१४३५, ०१४३६, ०१४७७, ०१४७८, ०१०२४, ११०२३, ०१४८७ आणि ०१४८८) आरक्षण ५ जुलै २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू होणार आहे.
तसेच सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग प्रवासी ‘युटीएएस’ (UTS) प्रणालीद्वारे करू शकतात. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रकासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES / ‘रेल वन’ (Rail One) ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


