कोकण रेल्वेमार्गावर शुक्रवारी धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News 04/01/2023 : कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने दक्षिण रेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर अहमदाबाद ते मंगुळुरु दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.  Train No. 06072 Ahmedabad Jn – Mangaluru Jn. Special  हि विशेष गाडी अहमदाबाद जंक्शन येथून शुक्रवारी दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ०४:०० वाजता सुटेल ती मंगुळुरु जंक्शन येथे दुसऱ्यादिवशी संध्याकाळी १८:३० वाजता पोहोचेल.
.
ह्या गाडीचे थांबे 
वडोदरा,सुरत,वापी,वसई रोड, पनवेल, रोहा (RN), खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल
डब्यांची रचना
एकूण २२ डबे = ३ टायर एसी – ०५ + स्लीपर – १२ + सेकंड सीटिंग – ३ + एसलआर – ०२
या गाडीच्या अधिक माहितीसाठी www.enquiry indianrail.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन कोकणरेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी ‘स्वाक्षरी’ मोहीम… मुंबई आणि आजूबाजूच्या ‘ह्या’ शहरांत होणार आयोजन..

मुंबई :मागील 14 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश ध्येयपूर्ती समिती स्वाक्षरी मोहीम राबवत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या समस्त कोकणी बांधवाना ह्या स्वाक्षरी मोहिमेत सामील होण्याचे आवाहन जनआक्रोश समितीने केले आहे.

ह्या मोहिमेची ठिकाणे आणि वार पुढीलप्रमाणे राहतील. 

शुक्रवार  दि ०६/०१/२०२३ 
   ठिकाण – भांडुप स्टेशन (पश्चिम)
   वेळ – सायंकाळी ५ ते ९
   संपर्क – प्रसाद भोगले ९९६७८१४९१०
शनिवार दि ०७/०१/२०२३
१) ठिकाण-सांताक्रूझ पुर्व रेल्वे स्टेशन जवळ
     संपर्क –  1)प्रशांत परब  ८९७६५६७७२२
                   2)संजय सावंत ९८९२७०३६७६
२) ठिकाण – परेल, KEM  हॉस्पिटल समोर
     वेळ – सकाळी ८.३० वाजता
     संपर्क – सुदाम गवळी – ७९७७०९३८१५
रविवार दि.  ८/१/२०२३
1) ठिकाण – बोरीवली रेल्वे स्टेशन (पूर्व)
     वेळ – सकाळी ९ ते १२
     संपर्क – राजेश मुलुख ८४५१०९७१३६
2) ठिकाण – नालासोपारा,डम्पिंग ग्राऊंड
     वेळ – सकाळी ८ ते ११
     संपर्क -नितीन खानविलकर ८१०८४०७४७२
3) ठिकाण – विरार स्टेशन (पूर्व)
     वेळ – सकाळी ८ ते ११
     संपर्क– दिनेश दुर्गवले – ९८६७३८४१४०
4) ठिकाण –चारकोप गोराई,चारकोप मार्केट सूरगंगा बिल्डिंग नोबल केमिस्ट्र जवळ कांदिवली पश्चिम मुंबई 67
     वेळ –  ते सकाळी १० ते १

     संपर्क – शामसुंदर मालवणकर  – ९१३७४५३२७५

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी येथे ५ ते ८ जानेवारीदरम्यान लोककला दशावतार महोत्सव…..

सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक राजवाड्यात ५ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत दशावतार लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आहे. लोककलांना राजाश्रय देणाऱ्या पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तसेच श्रीमंत शिवरामराजे यांचा युवराज लखमराजे सावंत-भोंसले पुढे नेत असून युवराजांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

(Also Read>खाजगी बस मालकांच्या लुटमारीवर अंकुश लागणार..मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस नियमित धावणार…)

या महोत्सवात जिल्ह्यातील सात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचे नाट्यप्रयोग होणार आहेत,त्याची माहिती पुढीलप्रमाणे

दिनांकवेळनाटक कंपनी नाटकाचे नाव
गुरुवार ५ ६.३० ते ८चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण गौरी स्वयंवर
८.३० ते १०वालावलकर दशावतार नाट्यमंडळ,ओसरगाव वेध राहुचे ग्रहण चंद्र सूर्याची
शुक्रवार ६६.३० ते ८कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुरकर्ण पिशाच्च अर्थात अर्धसत्य
८.३० ते १०खानोलकर दशावतार नाट्य मंडळ (खानोली) पालीचा बल्लाळेश्वर
शनिवार ७६.३० ते ८दत माऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्गशेषात्मज गणेश
८.३० ते १०महापुरुष दशावतार नाट्यमंडळप्रलंयकारी गणेश
रविवार ८६.३० ते ८नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाडबहुवर्मा पुत्रप्राप्ती

त्यानंतर महोत्सवाचा समारोप होणार आहे. कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या पारंपरिक दशावतार कलेचे जतन व्हावे ही कला वृद्धींगतद्धीं व्हाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा, या उद्देशानं सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या माध्यमातून व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत-भोंसभों ले यांच्या संकल्पनेतून या दशावतार लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कलाप्रेमींनी मीं उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. भारमल यांनी केले

(Also Read>पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)

Loading

Facebook Comments Box

खाजगी बस मालकांच्या लुटमारीवर अंकुश लागणार..मुंबई गोवा महामार्गावर शिवशाही बस नियमित धावणार…

मुंबई :वर्षअखेर आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी गोवा आणि कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या MSRTC वतीने मुंबई ते पणजी दरम्यान शिवशाही बस  सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. ह्या सेवेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही सेवा कायमस्वरूपी करण्याची मागणी करण्यात येत होती, त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणारी ही बस सेवा कायमस्वरूपी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

(हेही वाचा >कोकणातील भाविकांना खुशखबर…शेगावला जाण्यासाठी रेल्वेचा नवा पर्याय…)

भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ह्या गाडीच्या फेऱ्यांमध्ये पण वाढ केली जाईल असे महामंडळाने म्हंटले आहे. महामंडळाच्या ह्या निर्णयाचे कोकण वासियां कडून स्वागत करण्यात आले आहे. भविष्यात कदंबा व्हॉल्वो बस प्रमाणे शिवशाहीची व्हॉल्वो बस ह्या मार्गावर चालविण्यात यावी अशी मागणी पण होत आहे. त्याचप्रमाणे कल्याण, विरार तसेच ईतर उपनगरीय स्थानकावरून अशा बस सोडण्यात याव्यात अशीही मागणी होत आहे.

खाजगी बस मालकांच्या लूटमारीवर अंकुश लागणार. 

कोकणमार्गे जाणार्‍या खाजगी बस मालकांकडून हंगामात अतिरिक्त प्रवासभाडे वसूल करण्यात आल्याचा अनेक तक्रारी येत असतात. शिवशाही बससेवेमुळे त्यावर आता चांगल्या प्रमाणात अंकुश लावता येणार आहे. पण त्यासाठी हंगामात शिवशाही बसेस च्या जास्त फेर्‍या चालवल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात शिवशाही बस च्या फेर्‍या वाढल्या तर ही लूटमार पूर्णपणे बंद होईल अशी प्रवाशांना आशा आहे.

मुंबई – पणजी शिवशाही बसचे आपल्या स्थानकापर्यंतचे भाडे आणि अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून त्यासंबधीत बातमी वाचा..

उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बस सेवा… जाणून घ्या आपल्या स्थानकापर्यंतचे प्रवासभाडे

 

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग:  जिल्ह्यातील तरुण पिढीसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील तरुणांना रोजगार देण्यासाठी ‘ॲडमिशन’, ‘व्हॅरेनियम क्लाउड’ आणि ‘सिक्योर क्रेडेंशियल्स’ या कंपन्यांनी संयुक्तरित्या गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा सावंतवाडीतील जिमखाना मैदान येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल. या रोजगार मेळाव्यात ‘आजच मुलाखत; आजच निवड’ या संकल्पनेनुसार एकाच दिवसात तब्बल ७०० हून अधिक जणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच यावेळी त्वरित जॉइनिंग लेटरही देण्यात येईल.

या रोजगार मेळाव्यात पुणे, गोवा आणि कोल्हापूर येथील खालील कंपन्या सहभागी होणार आहेत.

एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या आहेत.

(हेही वाचा >पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)

या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या ससंधी उपलब्ध होतील. त्यामुळे सिंधुदुर्गातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

अबब! राज्यातील तळीरामांनी 9 महिन्यात रिचवले 58 कोटी लिटर मद्य…

मुंबई :एप्रिल 2022 पासून पुढील 9 महिन्यात राज्यातील मद्य विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. खासकरून विदेशी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. ह्या विक्री वाढीमुळे सरकारच्या महसुलात 30% वाढ झाली आहे. मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर ही वाढ दिसून आली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.

(Also Read >उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र)

कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे. तर विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.

Loading

Facebook Comments Box

उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई :नुकताच चित्र वाघ यांनी ट्वीट करत उर्फी जावेदला कपड्यांवरुन सुनावले होते. आता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहित उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने अनेकवेळा कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण उर्फी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. आता उर्फीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण चित्रा यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली.

चित्रा वाघ मुंबईतील महिलांवर होणारा अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणित ते नेहमी परखड मत मांडताना दिसतात. सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना त्यांनी सोशल मीडियावर रिविलिंग ड्रेसमधील व्हिडीओ शेअर करत असल्याने संताप व्यक्त केला आहे.

त्यांनी आपल्या पत्रात असे म्हंटले आहे…

‘उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही’ 

पुढे पत्रात त्यांनी, ‘मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे’

 

 

Loading

Facebook Comments Box

रेल्वेचा महाराष्ट्रातील कोकणमार्गावरील प्रवाशांवर पुन्हा अन्याय…

Konkan Railway News :मुंबई कन्याकुमारी नव्या गाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रावर अन्यायाची रेल्वेची परंपरा कायम, महाराष्ट्रीय प्रवाशांच्या जखमेवर मीठ

गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोंकण विकास समितीला हल्लीच दिले होते. परंतु त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.

(Also Read>आजपासून ऑगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारी राहणार बंद…मच्छीमारांच्या चिंतेत वाढ

कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५% तर गोवा आणि केरळ राज्य शासन प्रत्येकी ६% इतका आर्थिक सहभाग आहे. परंतु गाडीचे दक्षिणेकडील शेवटचे स्थानक विचारात घेतल्यास महाराष्ट्राला ३, गोवा, कर्नाटक आणि केरळला प्रत्येकी ५ ते ६ आणि तामिळनाडूला १ इतक्या सरासरी प्रतिदिन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातून महाराष्ट्रातील प्रवासी कसे प्रवास करत असतील आणि कोकण रेल्वेच्या निमित्ताने महाराष्ट्राला काय मिळाले याची कल्पना येते.

सावंतवाडीच्या पुढे गोव्याला जाणाऱ्या नियमित किंवा विशेष गाड्या महाड, लांजा तालुक्यात न थांबता तर मडगावच्या पुढे जाणाऱ्या गाड्या माणगाव, महाड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यांना वगळून पुढे जातात. मंगळुरूच्या पुढे जाताना तर प्रत्येक जिल्ह्यात एकच थांबा मिळतो. एक एक टप्पा सोडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी महाराष्ट्रातील थांब्यांचा बळी दिला जातो. सध्या चालणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, मंगळुरु विशेष गाड्यांचे थांबे बघितल्यास त्याचीच प्रचिती येते.

नवीन गाड्या मिळणे दूरच आहेत त्या गाड्यांना महाराष्ट्रात वाढीव थांबे मिळणेही कठीणच आहे. प्रवाशांनी आंदोलन केल्याशिवाय कोणताही वाढीव थांबा मिळालेला नाही. सध्या जनशताब्दी, मंगला, लोकमान्य टिळक करमळी, कोचुवेली एक्सप्रेसला खेड, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला वैभववाडी, तेजस एक्सप्रेसला कणकवली, मुंबई मंगळुरु आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठीही मागणी, निवेदन, आंदोलनाचं सत्र सुरूच आहे.

(Also Read :पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजूगर बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा)

महाराष्ट्रात गाड्यांची कमतरता असतानाही त्यावर कहर म्हणून गोव्यातून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वेने रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडे केवळ १८-२०% आरक्षण कोटा दिलेला आहे. उर्वरित ८०% जागा रत्नागिरीच्या दक्षिणेकडच्या स्थानकांनाच उपलब्ध होतात. हे वाटपही समान ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेशा गाड्या नाहीतच परंतु ज्या आहेत त्यात आरक्षण कोटाही देणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे.

कोरोना संकटाचा फायदा घेऊन रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाड्यांचे थांबे कमी करून एक्सप्रेसमध्ये रूपांतर केले. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरची वाट दिव्यापर्यंतच अडवली खरी परंतु त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरेल. सप्टेंबर २०२१ पासून ५०१०३ दिवा रत्नागिरी पॅसेंजर तर जानेवारी २०२२ पासून ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेल्या नाहीत. मध्य रेल्वेवर ५-१० थांबे कमी करूनही रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा गाड्यांच्या प्रवास वेळेत अपेक्षित घट झालेली नाही. रत्नागिरी दादरची रत्नागिरी दिवा केल्यावर त्याच वेळेत दादरवरून बलिया/गोरखपूर गाडी सुरू झालेली आहे. यावरून रत्नागिरी दादर दिव्याला का ठेवली याची कल्पना येते.

इतके गंभीर प्रश्न असतानाही आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी चालवण्यात येत आहे. तिला सुपरफास्ट म्हटले आहे परंतु थांबे पाहिल्यास ती केवळ कोकण रेल्वेवरच सुपरफास्ट असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील दोन थांब्यांमधील सरासरी अंतर ५५ किलोमीटर तर कोकण रेल्वेच्या बाहेर सरासरी ४० किलोमीटरवर थांबे आहेत. रोहा ते चिपळूण १२८ किलोमीटर आणि रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटरमध्ये एकही थांबा नाही. खेडसारख्या महत्वाच्या स्थानकावर सध्या धावणाऱ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी असताना या नव्या गाडीलाही खेड येथे थांबा दिलेला नाही. रविवारी रत्नागिरी किंवा चिपळूणमधून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीची नितांत गरज असताना त्याच दिवशी ही कन्याकुमारी गाडी परत येणार आहे. म्हणजे पुन्हा स्थानिक प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे कारण गाडी असली तरी तिला पुरेसा कोटा मिळणार नाही, तिला महाराष्ट्रात मोजके तीन चार थांबे आहेत आणि इतक्या लांबून येणाऱ्या गाडीत चढायला मिळणे अशक्यप्राय गोष्ट असेल.

पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे.

तरी, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने इतर राज्यातील प्रवाशांची सोय करण्याआधी स्वतःच्या हद्दीतील विभागातील प्रवाशांचा उद्रेक होण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण, ते तुमचंच उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रवासी आपल्या मागण्या घेऊन दक्षिण रेल्वेकडे जाऊ शकत नाहीत. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच एकत्र येऊन याचा विरोध करावा.

अक्षय मधुकर महापदी

Loading

Facebook Comments Box

आजपासून ऑगस्टपर्यंत पर्ससीन मासेमारी राहणार बंद…मच्छीमारांच्या चिंतेत वाढ


रत्नागिरी: शासनाने 5 फेब्रुवारी 2016 च्या अधिसुचनेनुसार 1 जानेवारी पासून पर्ससीन मासेमारी बंद केली आहे. त्यामुळे आजपासून हि मासेमारी ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र सागरी अधिनियमन 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषंगाने शासनाने 5 फेब्रुवारी 2016 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतुदनुसार परवानाधारक पर्ससीन नौकांना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहित जाळ्यांच्या आकाराचा वापर करून मासेमारी करता येईल.

1 जानेवारी ते 31 ऑगस्टया कालावधीत नौका पर्ससीन जाळ्या ने मासेमारी करताना आढळल्यास मत्स्यव्यवसाय विभागामार्फत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 (3) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेश 2021 मधील कलम 17 पो टकलम [5] जो कोणी पर्ससीन किंवा रिंगरिंसीन किंवा मोठ्या आसाचे ट्रॉल जाळे यांच्या विनियमनाशी संबंधित असणा ऱ्या आदेशा चे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी 1 लाख रुपयांचा दंड, दुसऱ्या वेळी सापडल्यास 3 लाख रुपये दंड आणि तिसऱ्या वेळी मासेमारी करताना सापडल्या स 6 ला ख रुपये दंड आकारला जाणार आहे.तसेच संबधीत नौका मूळ बंदरात किंवा अंमलबजावणी अधिकारीविहित करतील अशा बंदरात जप्तकरून ठेवण्यात येईल व अभिनिर्णय अधिकाऱ्यां कडे दावा दाखल करण्यात येईल.

ह्या बंदीचा मोठा फटका मासेमारी व्यावसायिकांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर स्थानिक लोकांवर बसतो. उर्वरित ८ महिने नौका किनाऱ्यावर न वापरता ठेवल्याने खूप मोठा आर्थिक फटका मासेमारी व्यावसायिकांना बसत आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकणातील भाविकांना खुशखबर…शेंगावला जाण्यासाठी रेल्वेचा नवा पर्याय…

Konkan Railway News : कोकणमधील गजानन महाराजांच्या भक्तांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीला आता शेगाव ह्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. . कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे.

01139/01140 हे नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक 4 जानेवारी 2023 पासून थांबा मंजूर केला आहे.

(हेही वाचा>वर्षाच्या सुरवातीला कोकणरेल्वे मार्गावर सहा विशेष फेऱ्या…)

गाडी क्रमांक 01140 ह्या गाडीची वेळ कुडाळ स्थानकावर रात्री 10:10 आहे ती दुसर्‍या दिवशी दुपारी 3:35 वाजता शेगावला पोहोचते आणि पुढे नागपूरला जाते.

गाडी क्रमांक 01139 ह्या गाडीची वेळ शेगाव स्थानकावर संध्याकाळी 07:23 आहे ती दुसर्‍या दिवशी दुपारी 12:36 वाजता कुडाळ स्थानकावर पोहोचते आणि पुढे मडगावला जाते.

ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात आलेली होती आणि दोन वेळा वाढिव कालावधी पण देण्यात आला होता. आता ह्या गाडीचा कालावधी फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या ही गाडी कायमस्वरूपी करावी अशी मागणी होत आहे.

(हेही वाचा>नागपूर-मडगाव गाडीच्या वाढिव फेर्‍यांचे आरक्षण उद्यापासून…. …)

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search