




Specials Trains for Ganesha Festival : यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वे आणि मध्य रेल्वे गणेशोत्सवादरम्यान अजून काही विशेष फेऱ्या चालविणारआहे, त्यामुळे ज्या चाकरमान्यांना याआधी जाहीर केलेल्या गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना तिकिटे मिळवण्याची एक अजून संधी मिळणार आहे. या विशेष फेऱ्या खालीलप्रमाणे असतील.
१) गाडी क्र. ०९००९ / ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाडे:
गाडी क्रमांक ०९००९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने मुंबई सेंट्रल येथून सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार १४/०९/२०२३ ते १८/०९/२०२३ आणि २०/०९/२०२३ ते ३०/०९/२०२३ पर्यंत दुपारी १२.०० वाजता सुटेल. गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ०३.०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल (आठवड्यातील ६ दिवस) विशेष भाड्याने सावंतवाडी रोडवरून मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार १५/०९/२०२३ ते १९/०९/२०२३ आणि २१/०९/२०२३ ते ०१/१०/२०२३ पर्यंत सकाळी ०५.०० वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल
थांबे : बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
डब्यांची रचना : एकूण २४ कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०४ डबे, SLR – ०२.
२) गाडी क्रमांक ०९०१८/ ०९०१७ उधना – मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर विशेष:
गाडी क्र. ०९०१८ उधना – मडगाव जं. (साप्ताहिक) विशेष भाड्यावर उधना येथून शुक्रवार, 15/09/2023, 22/09/2023 आणि 29/09/2023 रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०१७ मडगाव जं. – उधना (साप्ताहिक) विशेष भाड्यावर शनिवार, 16/09/2023, 23/09/2023 आणि 30/09/2023 रोजी सकाळी १०:२० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल ती दुसऱ्या दिवशी उधना येथे सकाळी ०५:०० वाजता पोहोचेल.
थांबे : नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
३) ट्रेन क्र. ०९१५० / ०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष भाड्यावर :
गाडी क्र. ०९१५० विश्वामित्री – कुडाळ साप्ताहिक विशेष भाड्यावर सोमवार, 18/09/2023 आणि 25/09/2023 रोजी सकाळी 10 वाजता विश्वामित्री येथून सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:१० वाजता कुडाळला पोहोचेल.
गाडी क्र. ०९१४९ कुडाळ – विश्वामित्री साप्ताहिक विशेष भाड्यावर कुडाळ येथून मंगळवार, १९/०९/२०२३ आणि २६/०९/२०२३ रोजी सकाळी ०६:३० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री ०१:०० वाजता विश्वामित्रीला पोहोचेल.
थांबे : भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग
आरक्षण
या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख अजून रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर केली गेली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

रत्नागिरी :कोकणात पावसाचं थैमान सुरूच आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परशुराम घाटात चार वेळा दरडी कोसळलेल्या आहेत.अशात घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे वीज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय, जेसीबी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवली आहे.
बुधवारी परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्या आधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्या पाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबवण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणीमार्गाने वाहतूक वळवली होती; मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे. जेणेकरून रात्री -अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे, असे नियोजन केले आहे. त्याशिवाय दरड हटवण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून, घाटातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे.

रायगड: जिल्ह्यातील पोलादपुर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे पोलादपुर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. प्रतापगड फाट्यापासून जवळच डोंगरानी छोट्या मोठ्या दगडी रस्त्यावर कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

मुंबई : वरीष्ठ नागरिकांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवासाची सुविधा आता दिव्यांगांना पण दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळातर्फे एका परिपत्रकाद्वारे दिव्यांगांना देखील आता एसटी ने मोफत प्रवास करता येणार असल्याचे जाहीर केले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना सरसकट अर्धे तिकीट हे दोन निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले होते, त्यानंतर दिव्यांगांना देखील राज्यभर मोफत प्रवास करता येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांगत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात काही प्रकारासाठी सातत्याने उपचार करावे लागतात. त्यामध्ये सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया यासारख्या प्रकारांचा समावेश होतो. राज्यातील अशा रुग्णांना विविध आरोग्य सेवा आणि उपचारासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस मार्फत मोफत प्रवासाची योजना लागू केली आहे.

रत्नागिरी |राज्यात होणार्या अतिवृष्टीचा परिणाम कोकण रेल्वेवर पण झाला आहे. कुडाळ आणि झाराप या स्थानकांदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणुन या मार्गावरील काही गाड्या आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सुटणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार खालील गाड्यां आज दिनांक 20 जुलै रोजी आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सोडण्यात येणार आहेत.
1.संध्याकाळी 7 वाजता सुटणारी 01140 मडगाव नागपूर विशेष गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 10 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
2.संध्याकाळी 6 वाजता सुटणारी 20112 मडगाव – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 9 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
3.संध्याकाळी 5:55 सुटणारी 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 8:55 वाजता सावंतवाडी स्थानकावरून सुटणार आहे.

रायगड : हवामान खात्याने IMD दिलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यामुळे तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे, धरणांतून मोठ्या प्रमाणावर नदीत पाणी सोडले जात असल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले असून, काही गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील 24 तासांतही शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
IMD ने आज दिनांक 19 जुलै रोजी पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट तर ठाणे, मुंबई, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.

Kokan Railway | रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या LHB डब्यांच्या संरचनेत काही बदल केले आहेत. या दोन्ही गाड्यांचे प्रत्येकी एक जनरल डबा कमी करण्यात आले असून इतरही काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे
1) 22113/22114 Lokmanya Tilak (T) - Kochuveli - Lokmanya Tilak (T) Bi-Weekly Express
श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त ) 01 - डबा कमी केला
टू टियर एसी 01 01 बदल नाही
थ्री टायर एसी 05 07 २ डबे वाढवले
स्लीपर 09 09 बदल नाही
जनरल 04 03 १ डबा कमी केला
जनरेटर कार 02 02 बदल नाही
एकूण 22 22
दिनांक ०४/११/२०२३ पासून Train no. 22113 ex. Lokmanya Tilak (T) ही गाडी तर दिनांक 06/11/2023Train no. 22114 ex. Kochuveli ही गाडी या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
2) 11099 / 11100 Lokmanya Tilak (T) - Madgaon Jn. - Lokmanya Tilak (T) Express
श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त ) 01 01 बदल नाही
फर्स्ट एसी - - -
टू टियर एसी 01 02 १ डबा वाढवला
थ्री टायर एसी 08 06 २ डबे कमी केले
स्लीपर 06 08 २ डबे वाढवले
जनरल 03 02 १ डबा कमी केला
एसएलआर - 01 १ डबा वाढवला
पेन्ट्री कार 01 01
जनरेटर कार 02 01 १ डबा कमी केला
एकूण 22 22
दिनांक 10/11/2023 पासून या दोन्ही गाड्या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.

चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.
मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.

या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.
Content Protected! Please Share it instead.