
मुंबई : कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे.
सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय आस्थापनेस कळवावे, जेणेकरून शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये माहिती मिळेल असा शासन आदेश संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांनी काढला आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढून उद्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली आहे
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे ग...
कोकण
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
कोकण
गावी जाण्यासाठी तिकिटे मिळाली नाहीत? चिंता नको; कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून धावणार विशेष अनारक्ष...
कोकण