Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114 Konkan Blog - Page 24 of 172 - KokanaiSkip to content
कोकणातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवणारे डिजिटल बातमीपत्र - Kokanai Live News
Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.
सिंधुदुर्ग, दि. २९ जुलै: कोकणात समस्त कोकणकरांचे हक्काचे रेल्वे टर्मिनस असावे असे स्वप्न असणार्या कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनस संबधी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रत्नसिंधू योजनेतून ४ कोटी तर जल जीवन मिशन अंतर्गत १.५ कोटी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच त्यांच्याकडून टर्मिनस बिल्डिंग आणि पर्यटन हॉटेल साठी निधीची तरतूद केली गेली आहे.
सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला यश मिळण्यास सुरवात
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले होते. दीपक केसरकर यांच्या या घोषणेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीकडेच संघटनेतर्फे राबवलेल्या सावंतवाडीच्या ईमेल मोहिमेला आणि ईतर स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरवात झाली असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेत.
Konkan Railway Merging: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे ही मागणी अलीकडे जोर धरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील खासदार सुनील तटकरे यांनी ही मागणी संसदेत केली होती. आता उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचे निवदेन त्यांना दिले आहे.
उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
कोकण विभागातील रेल्वे रुळांची सुधारणा, रेक बदलणे आणि रेल्वे स्थानके सुधारण्यासाठी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. मागे मंगळुरूच्या दौऱ्यात पुजारी इतर दोन खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा आणि विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी रेल्वेमंत्री राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांना या संदर्भातील निवेदन दिले होते.
याबरोबरच त्यांनी या भेटीत मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी ट्रेनसाठी नवीन एलएचबी कोचची गरज असल्याचे रेल्वेमंत्र्यांना सांगून लवकरात लवकर हा बदल करावा अशीही विनंती केली आहे. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये कारवार ते बेंगळुरू दरम्यान पडिल मार्गे नवीन ट्रेन जी उडुपी, कुंदापुरा आणि कारवारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रभर ट्रेन सेवेची गरज भागवेल तसेच कुंदापुरा येथे एर्नाकुलम-निजामुद्दीन ट्रेनला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश आहे.
श्री. वैष्णव यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आणि विलीनीकरणाबाबत कर्नाटक सरकारकडून अहवाल मागणार असल्याचे श्री. पुजारी यांनी सांगितले.
रायगड: काल दिनांक-२८ जुलै २०२४ रोजी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने मुंबई गोवा महामार्ग पूर्णतःवासाठी विधित महायज्ञ माणगाव येथे ११ महंत आणि समस्त कोकणकरांच्या उपस्थितीत पार पडला.
मागील १७ वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधीना,शासनाला आणि प्रशासनाला सुद्बुद्धी देवो असे यावेळी समस्त कोकणकरांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आले. तसेच महामार्गांवर गेलेल्या हजारो लोकांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या महायज्ञास कोकणातील अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.
काल येथे जमलेल्या कोकणकरांनी शांततेत गणरायाचे पूजन करून, साकडे घालून शासनाला विनंती करण्यात आली मात्र या १५ दिवसात कामाला गती न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमरण उपोषणात तीव्र संताप व्यक्त करण्यात येईल व वेळ आल्यास माणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून पर्यंत स्वतः मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेण्यात असल्याची माहिती समितीचे सचिव श्री. रुपेश दर्गे यांनी दिली आहे.
रत्नागिरी दि. २७ जुलै :रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथील एका हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने छापा टाकला. गर्भपात केंद्राची कोणतीही परवानगी नसताना या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या, साहित्य सापडले. या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे महिलांना दिल्या जात असल्याचे उघड झाले. हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. त्यांना नोटीस देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आल्या होत्या. सत्य प्रकार जाणण्यासाठी त्यांनी या हॉस्पिटलमध्ये बनावट रुग्ण करून पाठवला. त्यावेळी गर्भपात केंद्राची कोणताही परवानगी नसताना या रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे आढळून आले. गर्भपाताचे साहित्यही मिळाले. त्यामुळे भास्कर जगताप यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी डॉक्टरविरोधात ‘वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१’चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलचे मालक डॉ. अनंत नारायण शिगवण (वय ६७, रा. एमआयडीसी प्लॉट नं. २०, टीआरपी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
सिंधुदुर्ग, २७ जुलै: सध्या संपूर्ण जग आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत असून त्याद्वारे विकासाचे पुढच्या टप्प्यात जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI च्या जगात कित्येक क्षेत्रात मोठे बदल अनुभवण्यास येत आहेत. मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही समाज विघातक प्रवृत्त्या वापरकर्त्यांची फसवणूक करून आपला फायदा करून घेत असल्याच्या कित्येक घटना समोर येत आहेत.
अलीकडे रत्नागिरी जिल्हय़ात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल अॅप च्या माध्यामातून फसवणूक करण्याचे प्रयत्न झाल्याची घटना काल कोकणकरांनी अनुभवली. एका अपरिचित नंबरवरून ‘ सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk’ हे मोबाईल ऍप्लिकेशन ईंन्स्टॉल करा असा व्हाट्सएप्प मेसेज कित्येक जणांना यायला सुरवात झाली. खरेतर असे कोणते ऍप्लिकेशनच नाही आहे. ही गोष्ट निदर्शनास येताच कोकण प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील गैरप्रकार टाळण्यासाठी कंबर कसली. ज्या नंबर वरून हे मेसेज येत होते त्या नंबरवर कॉल करुन नक्की प्रकार काय आहे तो जाणून घेतला. आपला नंबर हॅक झाला असून कोणीतरी दुसराच आपले व्हाट्सएप्प कंट्रोल करत असून हे मेसेज पाठवत असल्याचे त्या नंबरधारकाने कबूल केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबद्दल समाज माध्यमातून जनजागृती केली. ‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ नावाचे कोणतेही मोबाईल ऍप्लिकेशन आपण बनवले नसून त्यासंबंधी असे मेसेज आल्यास त्यावर दुर्लक्ष करावेत आणि तो नंबर ब्लॉक करावा असे आवाहन करणारे मेसेज व्हायरल करण्यात आलेत.
‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ हेच नाव का?
हॅकर्सने सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk हेच नाव का निवडले असेल याबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. साधारणपणे हॅकर्स हे एखाद्या भागातील युजर्सना टार्गेट करण्याआधी त्या भागाचा अभ्यास करतात. त्या भागात सध्या समाज माध्यमांवर कोणता विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात किंवा लोकप्रिय आहे हे हेरतात आणि युजर्सना शंका येणार नाही अशा प्रकारे त्यासंबधित मेसेज पाठवतात. सध्या ‘सावंतवाडीत टर्मिनस व्हावे’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे हॅकर्सने तोच विषय निवडला असल्याची शक्यता आहे.
पुरेशी काळजी घेणे आवश्यक
आपली फसवणूक होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. बनावट अॅप्सवरून आपल्या मोबाइलमधील डाटा ‘हॅक’ केला जाऊ शकतो. त्यामुळे ‘अॅप्स’ घेताना पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Konkan ExpressWay: कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तळकोकणातील इको सेन्सिटिव्ह झोन मूळे बळवली-पत्रादेवी या बहुप्रतिक्षित ग्रीनफिल्ड महामार्गाचे संरेखनात बदल करण्यात आला आहे. आवश्यक सुधारणांनंतर या महामार्गाचे अंतिम संरेख मंजूर करण्यात आले आहे. कोकणात होणार हा एक मोठा प्रकल्प असून त्यात मोठ्या संख्येने पूल आणि बोगदे असतील. आता मंजूर केलेल्या संरेखननुसार ५१ – वायडक्ट्स, ४१ टनेल , २१ मोठे पूल:, ४९ लहान पूल, ३ ROB:, १४ इंटरचेंज, ८ वेससाइड सुविधा या मार्गावर असतील
एक्सप्रेसवे संरेखन ४ पॅकेजमध्ये विभागले गेले आहे आणि पेणजवळ आगामी विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरपासून सुरू होईल आणि गोवा सीमेवर पत्रादेवी येथे समाप्त होईल.
1) एकूण ३८८.४५ किमी लांबीच्या या महामार्गाचे चार टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा पेण, बळवली गाव (शहाबाज) ते रायगड जिल्ह्यातील म्हासळा तालुक्यातील विचारेवाडी असा ९६.०८ किमीचा असणार आहे.
2) या महामार्गाचा दुसरा टप्पा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पडवे गाव ते गुहागर तालुक्यातील पाट पन्हाळे असा ६८.६२ किमीचा असेल.
3) तिसऱ्या टप्प्यात गुहागर तालुक्यातील पाट पन्हाळे ते राजापूर तालुक्यातील सागवे असा १२२.८१ किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे.
4) शेवटचा म्हणजे चौथा टप्पा हा १००.८४ किमीचा असणार असून तो राजापूर तालुक्यातील वाडकर पोई ते सावंतवाडी तालुक्यातील क्षेत्रपळ (महाराष्ट्र आणि गोवा सीमा) असा असणार आहे.
Konkan Railway Merger: कोंकण रेल्वे महामंडळाचे KRCL चे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी काल रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली. काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना त्यांनी ही मागणी केली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक स्वायत्त संस्था असून तिची स्थापना कोकण मार्गाचे बांधकाम कारण्याच्या हेतूने झाली होती. कोकण रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर तो भारतीय रेल्वेच्या एखाद्या विभागाला हस्तांतरण करणे गरजेचे होते. मात्र २५ वर्षे झाली तरीही तो हस्तांतरित झाला नाही. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गाच्या विकासावर झाला. कोकण रेल्वेचे स्थापना होवून 25 वर्षे झाली तरीही पाहिजे तसा विकास तिचा झाला नाही. KRCL आपल्या पूर्ण क्षमतेने विकास करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यावर निधीअभावी मर्यादा येत आहेत. गेल्या २५ वर्षात प्रवासी संख्या कितीतरी पटीने वाढूनही त्या प्रमाणात गाड्या आणि सुविधा वाढल्या नाहीत. मुख्य म्हणजे कोकण गाड्या वाढविण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे खूप गरजेचे असूनही निधी मिळत नसल्याने अजूनही झाले नाही. अर्थसंकल्पातही कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद होत नाही. यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागली होती.
दिलासादायक गोष्ट म्हणजे आता रेल्वे संघटनेनंसोबत आता लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवायला सुरवात केली आहे. हल्लीच दक्षिणेकडील राज्यातील लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची मागणी केली होती. आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहचवून सुरवात केली असून लवकरच प्रवाशांना कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन झाल्याची गोड बातमी मिळेल अशी खात्री आहे.
WR Ganpati Specials Trains:मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने कोकणकर आता पश्चिम रेल्वेतर्फे विशेष गाड्या जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा संपली असून रेल्वे प्रशासनाने या गाड्या जाहीर केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, आणि दक्षिण रेल्वेकडे या मार्गावर चविण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाड्यांची यादी मंजुरीसाठी पाठवली होती. या यादीमध्ये गाड्यांच्या वेळेत, थांब्यात काहीसा बदल करून कोकण रेल्वे प्रशासनाने अंतिम घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण दिनांक २८ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर तसेच अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.
खालील सहा गाड्या पश्चिम रेल्वे तर्फे चालविण्यात येणार आहेत.
१) ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००१ विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवार दिनांक ०३,१० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.५० वाजता ठोकूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९००२ विशेष ठोकूर येथून बुधवार दिनांक ०४,११ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – १७.४०)
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
२) ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल (आठवड्याचे ६ दिवस) विशेष (एकूण २६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००९ विशेष मुंबई सेंट्रल येथून दिनांक ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० विशेष सावंतवाडी येथून दिनांक ०३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे ०४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेन्ट्रल येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
३) ०९०१५ /०९०१६ वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९०१५ विशेष वांद्रे टर्मिनस Bandra येथून गुरुवार दिनांक ०५ ,१२ आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१६ विशेष कुडाळ येथून शुक्रवार दिनांक ०६,१३ आणि २० सप्टेंबर रोजी पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: सेकंड सीटिंग – १६, जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
४) ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७.२०)
गाडी क्रमांक ०९४११ विशेष कुडाळ येथून बुधवार दिनांक ०४,११,१८ सप्टेंबर रोजी पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
५) ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९१५० विशेष विश्वामित्री येथून सोमवार दिनांक ०२,०९,१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७:५०)
गाडी क्रमांक ०९१४९ विशेष कुडाळ येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल.
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
६) ०९४२४/०९४२३ अहमदाबाद – मंगुळुरु -अहमदाबाद साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४२४ विशेष अहमदाबाद येथून शुक्रवार दिनांक ०६,१३,२० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९.४५ वाजता मंगुळुरु येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – ००:४५)
गाडी क्रमांक ०९४२३ विशेष मंगुळुरु येथून शनिवार दिनांक ०७,१४,२१ सप्टेंबर रोजी रात्री २२.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – पहाटे ०६.००)
थांबे: गुजराथ राज्यातील थांबे, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि दक्षिणेकडील राज्यातील थांबे.
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
Konkan Railway News:कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म लांबीच्या विस्ताराच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर मर्यादित ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.