कोकण रेल्वेने आज गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष फेर्या चालवण्याचे आज जाहीर केले आहे.
मागच्या आठवड्यात जाहीर केलेल्या विशेष गाडय़ांची बूकिंग फूल झाली त्यामुळे ह्या गाड्यांच्या स्वरुपात प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध होईल.
LTT THOKUR EXPRESS (01153)
दिनांक १३.०८.२०२२ ते ११.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी रात्री २२.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई वरून निघेल ती ठोकूर, मंगलोरला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता पोहोचेल.
डब्यांची स्थिती 1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे
THOKUR LTT EXPRESS (01154)
दिनांक १४.०८.२०२२ ते १२.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी संध्याकाळी ठोकूर, मंगलोरवरून ७.३० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी दुपारी १.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचेल.
डब्यांची स्थिती 1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR = एकूण २४ डबे
ह्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्णा रोड,कुमता,मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
आरक्षण आणि इतर माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.