आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 15:54:02 पर्यंत
- नक्षत्र-अश्विनी – 11:13:20 पर्यंत
- करण-वणिज – 15:54:02 पर्यंत, विष्टि – 26:04:59 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-सौभाग्य – 11:05:56 पर्यंत
- वार-रविवार
- सूर्योदय-06:04
- सूर्यास्त-19:08
- चन्द्र राशि-मेष
- चंद्रोदय-28:52:59
- चंद्रास्त-17:22:00
- ऋतु-ग्रीष्म
- 1666 : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
- 1953 : अमेरिकेच्या पहिल्या सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनने अधिकृत पृष्ठे प्रसारित करण्यास सुरुवात केली.
- 1955 : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर ब्रिटिश गिर्यारोहक जो ब्राउन आणि जॉर्ज बँड यांनी सर केले.
- 1961 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
- 1963 : आफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापना अदिस अबाबा, इथियोपिया येथे झाली.
- 1977 : चिनी सरकारने विल्यम शेक्सपियरच्या कलाकृतींवरील बंदी उठवली. ही बंदी सुमारे 10 वर्षे लागू होती.
- 1981 : सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
- 1985 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
- 1992 : प्रख्यात बंगाली लेखक सुभाष मुखोपाध्याय यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1991 जाहीर.
- 1999 : पंढरपूरला सुमारे 100 वर्षे लाखो भाविक आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या पंढरपूर-कुर्डूवाडी नॅरोगेज रेल्वेचा निरोप देण्यात आला.
- 2010 : भारतीय वंशाच्या 59 वर्षीय कमला प्रसाद बिसेसर यांची त्रिनिदाद आणि टोबॅगोचे माजी पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांचा पराभव करून प्रथम महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली.
- 2012 : SpaceX ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह यशस्वीरित्या डॉक करणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
- 2014 : मालवथ पूर्णा ही जगातील सर्वात कमी वयात (13 वर्षे) एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली.
- 803 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1882)
- 1831 : ‘सर जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 मार्च 1908)
- 1886 : ‘रास बिहारी घोष’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1945)
- 1895 : ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ – इतिहासकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1963)
- 1899 : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1976)
- 1927 : ‘नझरुल इस्लाम’ – अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 2001)
- 1936 : ‘रुसी सुरती’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 जानेवारी 2013)
- 1954 : ‘मुरली’ – भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2009)
- 1972 : ‘करण जोहर’ – भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .
ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,
ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.
ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.
कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
- हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
- कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
- मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
- हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
- घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
- या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
- कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
- या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
- हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 19:23:09 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 13:49:19 पर्यंत
- करण-कौलव – 09:00:56 पर्यंत, तैतुल – 19:23:09 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-आयुष्मान – 14:59:51 पर्यंत
- वार-शनिवार
- सूर्योदय-06:04
- सूर्यास्त-19:07
- चन्द्र राशि-मीन – 13:49:19 पर्यंत
- चंद्रोदय-28:03:59
- चंद्रास्त-16:17:00
- ऋतु-ग्रीष्म
- 1626 : पीटर मिनुएटने स्थानिकांकडून मॅनहॅटन बेट $24 मध्ये विकत घेतले.
- 1830 : युनायटेड स्टेट्समधील पहिली प्रवासी रोड रेल्वे सेवा सुरू झाली.
- 1844 : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी त्यांनी विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
- 1883 : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
- 1923 : आयरिश गृहयुद्ध संपले.
- 1940 : इगोर सिकोरसकी यांनी सिंगल-रोटर हेलिकॉप्टर यशस्वीपणे उडवले.
- 1976 : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू केली.
- 1991 : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
- 1993 : मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
- 1994 : 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या चार दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
- 2000 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेला Insat-3B हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
- 2001 : 18 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
- 2004 : उत्तर कोरियाने आपल्या देशात मोबाईल फोनवर बंदी घातली.
- 2010 : सात सिलिकॉन रेणूंच्या आकाराचे जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
- 1686 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1736)
- 1819 : ‘व्हिक्टोरिया’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1901)
- 1924 : ‘रघुवीर भोपळे’ ऊर्फ जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1984)
- 1933 : ‘हेमचंद्र तुकाराम’ तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1999)
- 1942 : ‘माधव गाडगीळ’ – पर्यावरणतज्ञ यांचा जन्म.
- 1955 : ‘राजेश रोशन’ – संगीतकार यांचा जन्म.
- 1973 : ‘शिरीष कुंदर’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.











