

आजचे पंचांग
सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.
Maharashtra Guardian Minister List : राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आले आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहरचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाकडे? वाचा यादी
क्र. जिल्हा – पालकमंत्रिपद
१ गडचिरोली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सह.आशिष जयस्वाल
२ ठाणे, मुंबई शहर -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
३ पुणे, बीड- उपमुख्यमंत्री अजित पवार
४ नागपूर, अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
५ अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
६ नाशिक – गिरीश महाजन
७ वाशिम – हसन मुश्रीफ
८ सांगली- चंद्रकांत पाटील
९ जळगाव – गुलाबराव पाटील
१० यवतमाळ – संजय राठोड
११ मुंबई उपनगर -आशिष शेलार व सह.मंगलप्रभात लोढा
१२ रत्नागिरी – उदय सामंत
१३ धुळे – जयकुमार रावल
१४ जालना – पंकजा मुंडे
१५ नांदेड – अतुल सावे
१६ चंद्रपूर – अशोक ऊईके
१७ सातारा – शंभुराजे देसाई
१८ रायगड – अदिती तटकरे
१९ सिंधुदुर्ग – नितेश राणे
२० लातूर – शिवेंद्रसिंहराजे भोसले
२१ नंदुरबार – माणिकराव कोकाटे
२२ सोलापूर – जयकुमार गोरे
२३ हिंगोली – नरहरी झिरवाळ
२४ भंडारा – संजय सावकारे
२५ छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
२६ धाराशीव – प्रताप सरनाईक
२७ बुलढाणा – मकरंद जाधव
२८ अकोला – आकाश फुंडकर
२९ गोंदिया – बाबासाहेब पाटील
३० कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह, माधुरी मिसाळ
३१ वर्धा – पंकज भोयर
३२ परभणी – मेघना बोर्डीकर
३३ पालघर – गणेश नाईक
मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. pic.twitter.com/vS41qTcot4
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 18, 2025
मुंबई: प्रशासन सुलभ होण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक विकासाला गती मिळण्यासाठी महाराष्ट्रातील सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांतून नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. येत्या २६ जानेवारी रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे अशा आशयाची बातमी समाज माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र ही बातमी खरी नसून अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
या बातमी नुसार राज्यात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मंडणगड हा स्वतंत्र जिल्हा घोषित होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्हय़ाचे विभाजन होऊन महाड हा जिल्हा अस्तित्वात येणार आहे. २६ जानेवारीला या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मात्र या बातमीला कोणताही आधार नसून जुन्या संदर्भाचा वापर करून ही फेक बातमी पसरविण्यात येत आहे.
Kokanai online : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 18 जानेवारी (शनिवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. पत्रकार परिषदेत तो उपस्थित होता. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.
भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासह स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी स्पर्धेत सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.
भारतीय संघ पुढीलप्रमाणे
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.
आजचे पंचांग
नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.
भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
४. मनू भाकर (शूटिंग)
यांना अर्जुन पुरस्कार मिळाला
1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
आजचे पंचांग
Content Protected! Please Share it instead.