Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Konkan Blog - Page 32 of 172 - Kokanai

Central Railway: मध्य रेल्वेची वेटिंग लिस्ट प्रवाशांना ‘नो एन्ट्री’

आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल. 

   Follow us on        

Waiting list passenger not allowed: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील Waiting List तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. प्रतीक्षायादीतील प्रवाशांमुळे होणार्‍या गर्दीच्या सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या व्हिडीओंची व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे.

तिकीट खिडक्यांवर काढलेले तिकीट रद्द प्रवाशांना रद्द करावे लागणार. 

ऑनलाईन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

प्रतीक्षायादीतील तिकीट असलेले प्रवासी आरक्षित डब्यांतून प्रवास करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांना पुढील स्टेशन आल्यावर त्या डब्यातून उतरविण्यात येत आहे. .‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिसूचना GR प्रसिद्ध केली नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई उपनगरीय स्थानकावर याबाबत अनॉसमेंट होत आहे.

वाचकांचा प्रतिसाद

अशी कारवाई करणे पूर्णपणे चुकीचे आहे. कित्येकदा आरक्षित तिकीट भेटत नसल्याने नाईलाजाने वेटिंग तिकीट काढून प्रवास करावा लागतो. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने त्या त्या गाडीच्या वेटिंग तिकिटांच्या संख्येवर मर्यादा घातल्या पाहिजेत.-प्राजक्ता परब, भांडुप

जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल. आपल्याकडे जनरल डब्यांची खूपच खराब आहे. डब्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट तिप्पट प्रवासी या डब्यांतून प्रवास करतात. हा त्रास काही प्रमाणात वाचविण्यासाठी प्रवासी प्रतीक्षा यादीतील तिकिटांवरुन प्रवास करतात. आता सुद्धा पर्याय नाहीसा झाल्याने प्रवाशांकडे जनरल कोचमधून प्रवास करण्याचा पर्याय राहिल्याने जनरल डब्यांची परिस्थिती अजून बिकट होईल.-राजेश धुरी, विरार 

 

 

Loading

Facebook Comments Box

अटल सेतूवर पडल्या भल्या मोठ्या भेगा; भ्रष्टाचार झाल्याचा नाना पाटोले यांचा आरोप

   Follow us on        

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर अटल सेतुची पाहणी करून रस्त्याला भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवडी न्हावा शेवा प्रकल्पावर राज्य सरकारने १८ हजार कोटी रुपये खर्च केला असून यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. हा काही विकास नाही तर भ्रष्टाचार असून सरकार स्वतःची घरे भरत आहे आणि जनतेच्या जीवाशी खेळत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या प्रकल्पाला दिले आहे, त्यांच्या नावाने भ्रष्टाचार करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटनाआधी त्यांनी या प्रकल्पाची व्यवस्थित पाहणी तरी करायला हवी होती. पण नरेंद्र मोदी हेच देशातील भ्रष्टाचाराचे सरदार आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपात घेऊन मंत्री बनवतात, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

भाजपाचे म्हणणे काय?

नाना पटोले यांच्या आरोपांना भाजपच्या वतीने देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून हा रस्ता अटल सेतू नसून त्याला जोडणारा मार्ग असल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच पडलेल्या भेगा या तांत्रिक त्रूटीमुळे पडलेल्या नसल्याचेही भाजपने म्हटले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी: कोकण रेल्वे मार्गावर ‘पॅच डबलिंग’ ची योजना

   Follow us on        

Konkan Railway News : दिवसेंदिवस वाढणारी प्रवासीसंख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाड्या चालविण्यात याव्यात यासाठी मोठी मागणी होत आहे. मात्र सिंगल रेल्वे रूळामुळे सध्या या मार्गावर गाड्या वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे याा मार्गाच्या दुहेेरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतू या मार्गावर नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पॅच डबलिंग म्हणजे काय? 

पॅच डबलिंग म्हणजे संपूर्ण मार्ग दुपदरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे त्या भागांत दुहेरीकरण करणे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यातून आणि पुलांवरून जात आहे. हे बोगदे आणि पुले सिंगल रूळांसाठी बांधण्यात आली आहेत. मार्गाचे दुपदरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे तिथे रुंदीकरण करावे लागेल. नवीन पुले उभारावी लागतील. या गोष्टी खर्चिक आहेत. सपाट भागात मार्गाला दर किमी मागे 15 ते 20 कोटी तर डोंगराळ भागात दर किमीला 80 ते 100 कोटी इतका दुपदरीकरणाचा खर्च आहे. भविष्यात या गोष्टी कराव्याच लागतील मात्र सध्या ‘पॅच डबलिंग’ करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होईल.

पॅचेसच्या स्वरुपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा 350 किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गाड्या वाढविण्यासाठी अनेक मागण्या होत आहेत. मात्र कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत असून नवीन गाडी चालवणे शक्य नसल्याचे असे रेल्वे कडून उत्तर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावरील बहुतेक गाड्या खासकरुन कमी पल्ल्याच्या गाड्या आपले वेळापत्रक पाळत नाही आहेत. पॅच डबलिंग या समस्या सुटणार आहेत. त्याचबरोबर नवीन गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी मुंबई – सावंतवाडी विशेष गाडी धावणार

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  ते सावंतवाडी दरम्यान एक विशेष गाडी  चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 01171 /01172 सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी ही स्पेशल गाडी येत्या शनिवारी चालविण्यात येणार आहे
01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवार दिनांक 22/06/2024 रोजी रात्री  00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून शनिवार दिनांक 22/06/2024 रोजी 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना: फर्स्ट क्लास एसी – 01, टू टियर एसी – 02, थ्री टियर एसी – 06, सेकंड स्लीपर – 01, जनरल- 06, एसएलआर – 02एकूण १८ कोच = फर्स्ट एसी – ०१ कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ डबे, ३ टायर एसी – ०६ डबे, जनरल – ०६, एसएलआर – ०२.

Loading

Facebook Comments Box

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान

   Follow us on        

रत्नागिरी : या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी  करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Loading

Facebook Comments Box

मोठी बातमी: नारायण राणे यांची खासदारकी अडचणीत

   Follow us on        

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.

निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.

निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.

 

 

Loading

Facebook Comments Box

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीचा यावर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती मात्र आता तिची सेवा २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५०  सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:१० वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५०   सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १४:४०  वाजता पोहोचेल.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती पण आता तिची सेवा दिनांक २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १५:१० सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १७:०५  वाजता  सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ट्रेन नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन येथे थांबेल. , नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु जं., कासारगोड, कन्नूर, वडकोडे, तिरूर, शोरानूर जं. आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 24 कोच = फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.

Loading

Facebook Comments Box

मोठी बातमी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून स्थगिती

Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.

Loading

Facebook Comments Box

Fact Check: भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत सुरु केल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        
Fact Check: सोशल मीडियावर सध्या एका बातमीचे कात्रण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कात्रणामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत पुन्हा सुरू केली आहे. या बातमीनुसार  60 वर्षांवरील पुरुषांसाठी 40 टक्के आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी 50 टक्के रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे.
मात्र खोलवर चौकशी केली असता असे आढळले की या बातमीत केलेला दावा खोटा असून असा कोणताही निर्णय भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेला नाही.
देशातील एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने रेल्वे मंत्रालयाचे एडीजी जनसंपर्क राजीव जैन यांच्याशी संपर्क साधला असता जैन यांनी या बातमीला “फेक न्यूज” म्हणत स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, “असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, 1 जुलैपासून सवलतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. फक्त सध्याच्या सवलती सुरू राहतील.”
या वर्षी 19 मे रोजी आयआयटी मद्रास येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते कि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पुन्हा सुरू करता येणार नाही कारण रेल्वे आधीच सवलतीच्या दराने कार्यरत आहे.
ही अफवा कोणी सुरू पसरवली ?
“रेल मेल” नावाच्या एका फेसबुक पेजने एका पोस्टमध्ये दावा केला आहे की भारतीय रेल्वे 1 जुलैपासून वृद्धांसाठी सवलत पुन्हा सुरू करणार आहे. तथापि, फेसबुक पेजने नंतर आपला दावा मागे घेतला आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र ही बातमीचे कात्रण अजूनही  सोशल मीडियावर मोठ्या  प्रमाणात व्हायरल होत असल्याने अफवा पसरत आहेत.
20 मार्च 2020 पासून कोरोना काळात रेल्वेने दिव्यांगजनांच्या केवळ चार श्रेणी, रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींचा अपवाद वगळता इतर सवलती अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बहाल करण्याची मंत्रालयाची कोणतीही योजना नाही.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search