Shaktipeeth Expressway: पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या दरम्यान बांधण्यात येणार्या राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाईसहित 18 तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी 20 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
कोणताही प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.
या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ आणि परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.
Revas Reddy Costal Highway: रेवस रेड्डी सागरी महामार्ग नियोजनामध्ये रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे साडेचार कि.मी. चे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी समुद्रकिनाऱ्यालगत जमिनीवरचा रस्ता व्हावा, यामुळे गावच्या पर्यटन उद्योगाला मोठी मदत मिळेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव झाला असून आता गमिस्थांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.
आतापर्यंत चारशेहून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती सरपंच तृप्ती पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मिऱ्या-काळबादेवी खाडीवील पूल प्रस्तावित आहे. या पुलाला जोडून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपूल बसणी साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी मिऱ्या-काळबादेवी पुलाला लागून समुद्रालगत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभने २० ऑगस्ट २०२४ रोजी केली
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 19:02:22 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 12:55:23 पर्यंत
- करण-विष्टि – 08:36:34 पर्यंत, शकुन – 19:02:22 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शूल – 09:35:33 पर्यंत, गण्ड – 30:00:14 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:02:19
- सूर्यास्त- 19:19:08
- चन्द्र-राशि-वृषभ – 23:46:52 पर्यंत
- चंद्रोदय- 29:32:00
- चंद्रास्त- 18:26:59
- ऋतु- वर्षा
- आंतरराष्ट्रीय परी दिन
- डिप्लोमेसीतील महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- 1441 : इटन कॉलेजची स्थापना.
- 1692 : किंग्स्टन शहराची स्थापना झाली.
- 1793 : फ्रान्समध्ये पहिले प्रजासत्ताक राज्यघटना स्वीकारली.
- 1812 : नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.
- 1880 : ओ कॅनडा हे प्रथम कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून गायले गेले.
- 1939 : सियामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
- 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्स आणि इटली यांच्यात युद्धविराम झाला.
- 1982 : कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये कन्नडचे शिक्षण अनिवार्य.
- 1996 : मायकेल जॉन्सनचा 200 मीटरचा 19.66 सेकंदांचा धावून विश्वविक्रम.
- 1998 : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2001 : भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आय. एन. एस. विराटने आधुनिकीकरणानंतर नौदलात पुन्हा प्रवेश केला.
- 2004 : न्यूयॉर्कमध्ये फाशीची शिक्षा असंवैधानिक ठरवण्यात आली.
- 2008 : नेपाळचे पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोईराला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- 2010 : जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या 27 व्या व पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
- 1862 : ‘श्रीधर बाळकृष्ण रानडे’ – रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1974)
- 1863 : ‘विश्वनाथ काशिनाथ राजवाडे’ – प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते यांचा जन्मदिन.
- 1870 : ‘दामोदर हरी चाफेकर’ – चार्ल्स रँड याची हत्या करणारे यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1898)
- 1892 : ‘श्रीधर बाळकृष्ण रानडे’ – रविकिरण मंडळाचे संस्थापक यांचा जन्म.(मृत्यू: 21 मार्च 1974)
- 1893 : ‘रॉय ओ. डिस्नी’ – द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1971)
- 1897 : ‘पंडीत औंकारनाथ ठाकूर’ – ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 डिसेंबर 1967)
- 1899 : ‘नानासाहेब फाटक’ – मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1974)
- 1908 : ‘गुरूगोपीनाथ’ – कथकली नर्तक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1987)
- 1927 : ‘कवियरासू कन्नडासन’ – तामिळ लेखक यांचा जन्म.
- 1928 : ‘मृणाल केशव गोरे’ – महाराष्ट्रातील लोकनेत्या यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 2012)
- 1937 : ‘अनिता मुजूमदार देसाई’ – ज्येष्ठ लेखिका यांचा जन्म.
- 1962 : ‘गौतम शांतीलाल अदानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
- 1987 : ‘लायोनेल आन्द्रेस मेस्सी’ – आर्जेन्टिना देशाचा फुटबॉल खेळाडू यांचा जन्म.
- 1881 : ‘पं. श्रद्धाराम शर्मा’ – लोकप्रिय आरती ओम जय जगदीश हरे निर्माता यांचे निधन.
- 1908 : ‘ग्रोव्हर क्लीव्हलँड’ – अमेरिकेचे 22वे आणि 24वे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1837)
- 1997 : ‘संयुक्ता पाणिग्रही’ – ओडिसी नर्तिका यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1944)
- 2013 : ‘एमिलियो कोलंबो’ – इटलीचे 40वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1920)
- 1980 : ‘वराहगिरी वेंकट गिरी’ – भारताचे चौथे राष्ट्रपति यांचे निधन.
आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 22:12:30 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 15:17:54 पर्यंत
- करण-गर – 11:48:58 पर्यंत, वणिज – 22:12:30 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-धृति – 13:17:03 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:02:06
- सूर्यास्त- 19:18:55
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 28:29:00
- चंद्रास्त- 17:18:00
- ऋतु- वर्षा
- जागतिक ऑलिंपिक दिन
- संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस
- आंतरराष्ट्रीय विधवा दिन
- 1757 : प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या 3000 सैन्याने सिराज उददौलाच्या 50000 सैन्याचा पराभव केला.
- 1868 : क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांना टाइपरायटरच्या शोधासाठी पेटंट देण्यात आले.
- 1894 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
- 1969 : आय.बी.एम. ने जानेवारी 1997 मध्ये सॉफ्टवेअर आणि इतर सेवांच्या किंमती वाढतील अशी घोषणा करण्यात आली, त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरू झाला.
- 1979 : इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
- 1985 : एअर इंडियाच्या कनिष्क बोईंग 747 विमानाचा दहशतवादी बॉम्बमुळे स्फोट झाला, 329 ठार.
- 1996 : ‘शेख हसीना वाजेद’ बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या.
- 1998 : दुसर्या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
- 2016 : युनायटेड किंग्डम ने 52% ते 48% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.
- 1763 : ‘जोसेफिन’ – फ्रान्सची सम्राज्ञी यांचा जन्म.
- 1877 : ‘नॉर्मन प्रिचर्ड’ – भारतीय-इंग्लिश अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1929)
- 1901 : ‘राजेन्द्र नाथ लाहिरी’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1927)
- 1906 : ‘वीर विक्रम शाह त्रिभुवन’ – नेपाळचे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1955)
- 1912 : ‘अॅलन ट्युरिंग’ – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 7 जून 1954)
- 1916 : ‘सर लिओनार्ड हटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 6 सप्टेंबर 1990)
- 1934 : ‘वीरभद्र सिंह’ – भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1935 : ‘राम कोलारकर’ – मराठी लेखक यांचा जन्म.
- 1936 : ‘कॉस्टास सिमिटिस’ – ग्रीक पंतप्रधान यांचा जन्म.
- 1942 : ‘जब्बार पटेल’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
- 1948 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 2014)
- 1952 : ‘राज बब्बर’ – भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते यांचा जन्म.
- 1972 : ‘झिनेदिन झिदान’ – फ्रेंच फुटबॉलपटू यांचा जन्म.
- 1980 : ‘रामनरेश सरवण’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 79 : 79ई.पुर्व : ‘व्हेस्पासियन’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 0009)
- 1761 : ‘बाळाजी बाजीराव पेशवे’ – यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1721)
- 1836 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1773)
- 1891 : ’ विल्यम एडवर्ड वेबर’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1914 : ‘भक्तिविनोद ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 2 सप्टेंबर 1838)
- 1939 : ‘गिजुभाई बधेका’ – आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1885)
- 1953 : ‘श्यामप्रसाद मुखर्जी’ – भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1901)
- 1975 : ‘प्राणनाथ थापर’ – भारतीय भूसेना प्रमुख जनरल यांचे निधन.
- 1980 : ‘व्ही. व्ही. गिरी’ – भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1894)
- 1980 : ‘संजय गांधी’ – इंदिरा गांधी यांचा मुलगा यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1946)
- 1982 : ‘हरिभाऊ देशपांडे’ – नामवंत कलाकार यांचे निधन.
- 1990 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – चरित्र अभिनेते यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1898)
- 1994 : ‘वसंतशांताराम देसाई’ – नाटककार, साहित्यिक यांचे निधन.
- 1995 : ‘डॉ. जोनस साॅक’ पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1996 : ‘रे लिंडवॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1921)
- 2005 : ‘डॉ. हे. वि. इनामदार’ – साहित्यिक यांचे निधन.
- 2015 : ‘निर्मला जोशी’ – भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1934)
- 2020 : ‘निलंबर देव शर्मा’ – पद्मश्री, डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक यांचे निधन.
Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.
मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 25:24:48 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 17:39:30 पर्यंत
- करण-कौलव – 14:58:56 पर्यंत, तैतुल – 25:24:48 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सुकर्मा – 16:57:03 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:01:51
- सूर्यास्त- 19:18:44
- चन्द्र-राशि-मेष – 23:04:42 पर्यंत
- चंद्रोदय- 27:32:00
- चंद्रास्त- 16:11:00
- ऋतु- वर्षा
- जागतिक पर्जन्यवन दिन
- 1633 : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले, सूर्य नव्हे.
- 1757 : प्लासीची लढाई सुरू झाली.
- 1897 : दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली.
- 1908 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा प्रवेश.
- 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीला शरणागती पत्करली.
- 1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
- 1976 : कॅनडाने फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली.
- 1978 : खगोलशास्त्रज्ञ जेम्स क्रिस्टीने ऍरिझोनामधील वेधशाळेतून प्लूटोचा चंद्र शेरॉन शोधला.
- 1984 : व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले.
- 1994 : महाराष्ट्र सरकारचे महिला धोरण जाहीर झाले. त्याद्वारे महिलांना सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण.
- 2007 : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.
- 2016 : भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला.
- 1805 : ‘जोसेफ मॅझिनी’ – इटालियन स्वातंत्र्यवीर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1872)
- 1887 : ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1975)
- 1896 : ‘बाबुराव पेंढारकर’ – नटश्रेष्ठ यांचा जन्म.
- 1899 : ‘रिचर्ड गिर्ली ड्र्यू’ – मास्किंग टेप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1980)
- 1908 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 1998)
- 1927 : ‘एन्थोनी लो’ – भारतीय-इंग्लिश इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2015)
- 1932 : ‘अमरीश पुरी’ – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार यांचा जन्म. (मृत्यू 12 जानेवारी 2005)
- 1974 : ‘विजय चंद्रशेखर’ – तमिळ चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
- 1955 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1923)
- 1993 : ‘विष्णूपंत जोग’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन.
- 1994 : ‘अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1908)
- 2014 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1949)
आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 07:21:31 पर्यंत, एकादशी – 28:30:21 पर्यंत
- नक्षत्र-अश्विनी – 19:51:16 पर्यंत
- करण-विष्टि – 07:21:31 पर्यंत, भाव – 17:58:09 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-अतिगंड – 20:28:41 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:01:38
- सूर्यास्त- 19:18:31
- चन्द्र-राशि-मेष
- चंद्रोदय- 26:41:59
- चंद्रास्त- 15:05:59
- ऋतु- ग्रीष्म
- उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,
- दक्षिण गोलार्धातील वर्षातला सर्वात छोटा दिवस.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस
- जागतिक जिराफ दिन
देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.
हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











