खेड: विक्रीसाठी आणलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्याने धुण्याचा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

   Follow us on        

खेड: खेड बसस्थानक ते तीनबत्ती नाका दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

ताडगोळे गटारात धूत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याबाबत पोलीस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी आलाउद्दीन कुवुस शेख (वय ६४, रा. बालुग्राम पश्चिमी, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले. या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

Facebook Comments Box

१८ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 17:10:23 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 08:21:32 पर्यंत
  • करण-तैतुल – 17:10:23 पर्यंत, गर – 29:51:45 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – 25:01:53 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:21
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 08:21:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:41:59
  • चंद्रास्त- 09:43:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय व्यायाम दिवस National Exercise Day
  • जागतिक सांस्कृतिक वारसा दिवस World Heritage Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1336 : हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
  • 1703 : औरंगजेबाने सिंहगड काबीज केला.
  • 1720 : शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
  • 1831 : अलाबामा विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1853 : मुंबई ते ठाणे नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
  • 1898 : जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
  • 1912 : टायटॅनिकमधील 705 वाचलेल्यांना घेऊन कार्पाथिया जहाज न्यूयॉर्कला पोहोचले.
  • 1923 : शिवजयंतीला पुण्यातील शिवाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील पहिला संगमरवरी अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला.
  • 1924 : सायमन आणि शुस्टर यांनी पहिले क्रॉसवर्ड पझल पुस्तक प्रकाशित केले.
  • 1930 : क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटला.
  • 1930 : आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
  • 1936 : पेशव्यांची राजधानी पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
  • 1950 : आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावात भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
  • 1954: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
  • 1971 : एअर इंडियाचे पहिले बोईंग 747 जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
  • 2001 : ग्राउंड सॅटेलाइट प्रक्षेपण वाहन GSLV-D1 चे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1774 : सवाई माधवराव पेशवा – यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1795)
  • 1858 : ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’ – स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962 – मुरुड)
  • 1916 : ‘ललिता पवार’ – हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1998)
  • 1958 : ‘माल्कम मार्शल’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1999)
  • 1962 : ‘पूनम धिल्लन’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1991 : ‘डॉ. वृषाली करी’ – यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1859 : स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.
  • 1898 :  महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी ‘दामोदर हरी चापेकर’यांना फाशीची शिक्षा. (जन्म: 24 जून 1869)
  • 1945 : ‘जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग’ – व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1849)
  • 1955 : ‘अल्बर्ट आइनस्टाइन’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1966 : ‘जगन्नाथ गणेश गुणे’ तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1883)
  • 1972 : ‘डॉ. पांडुरंग वामन काणे’ – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
  • 1995 : धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित यांचे निधन.
  • 1999 : ‘रघुवीर सिंह’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1942)
  • 2002 : ‘शरद दिघे’ – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष यांचे निधन.
  • 2002 : नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

चित्रपट अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर

 

   Follow us on        

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Facebook Comments Box

Volvo Bus On Fire: पुणे-सातारा महामार्गावर वॉल्वो बस पेटली

   Follow us on        

Volvo Bus On Fire: पुण्यात बसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खेडशिवापूर जवळ ही घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या खाजगी बसला आग लागली असून, आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. चालकाच्या चातुर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीची ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एसी व्हॉल्वो बसमध्ये साधारणतः 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी काही जण किरकोळ जखमी आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. गाडीचा भडका आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तसेच यामुळे बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती.

गाडीतून धूर येऊ लागताच, चालकाने सावध राहून बस थांबवली आणि प्रवाशांना ताबडतोब खाली उतरवले. राजगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण बसने आग लावली, परंतु कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.” प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

Facebook Comments Box

Konkan Railway: वास्को स्थानकावर सापडली तब्बल १६ किलोची चांदीची छत्री

   Follow us on        
Konkan Railway : मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्यान वास्को रेल्वे पोलिस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान रेल्वे फलाटावर गस्त घालीत असताना त्यांना एक लाल रंगाची बॅग बेवारस स्थितीत मिळाली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेली पांढऱ्या धातूची एक वस्तू दिसून आली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक सोनाराला पाचारण करून त्याच्यामार्फत त्या वस्तूची तपासणी केली. पडताळणीअंती ती वस्तू चांदीची छत्री (छत) असल्याचे सिध्द झाले. तिचे वजन १६.४ किलोग्रॅम होते. ८७.५० टक्के शुध्दता असलेल्या त्या छत्रीची किंमत अंदाजे ५ लाख ३७ हजार ६०० रुपये होते.
वास्को रेल्वे स्थानकावर मंगळवारी (ता.१५) सायंकाळी सापडलेली चांदीची छत्री ही कारवार येथील साईबाबा मंदिरातून संशयितांनी चोरल्याचे उघडकीस आले. कारवार पोलिसांनी बुधवारी (ता.१६) वास्कोला येऊन ती छत्री कायदेशीर सोपस्कारानंतर ताब्यात घेतली, असे वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
ही चांदीची छत्री (छत्र) कारवार येथील साईबाबा मंदिरात चोरी झालेल्या मुद्देमालापैकी एक असल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी त्या मंदिरातील सोळा किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या. त्यानंतर कदाचित ते वास्कोला आले असावेत. वास्को रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त त्याची चांदीची छत्री असलेली बॅग फलाटावर सोडून तेथून पळ काढला असावा , अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे .
Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार मंगळुरू – हजरत निजामुद्दीन विशेष एक्सपेस

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे..

१) गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल :

गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल १८/०४/२०२५, शुक्रवारी दुपारी ४:०० वाजता मंगळुरू सेंट्रल येथून निघेल आणि  तिसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता हजरत  निजामुद्दीन येथे पोहोचेल.
ही गाडी उडुपी, कुंदापारा, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जं., रतलाम, नागदा जं., कोटा जं., सवाईमाधोपूर जं. आणि मथुरा जं या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची  रचना : एकूण २२ कोच = स्लीपर – २० कोच, एसएलआर – ०२.
Facebook Comments Box

१७ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 15:26:27 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-बालव – 15:26:27 पर्यंत, कौलव – 28:21:40 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वरियान – 24:48:48 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:22
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 22:48:00
  • चंद्रास्त- 08:54:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • विश्व हीमोफीलिया दिवस
  • आंतरराष्ट्रीय वटवाघुळ दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1941 : दुसरे महायुद्ध – युगोस्लाव्हियाने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1946 : सीरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1950 : बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
  • 1952 : पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
  • 1970 : अपोलो प्रोग्राम: खराब झालेले अपोलो 13 अंतराळयान सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
  • 1971 : द पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशची स्थापना झाली.
  • 1975: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह ताब्यात घेतली
  • 1983: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपण वाहन (रॉकेट) ‘SLV3’ प्रक्षेपित केले.
  • 2001 : अफवांच्या अर्थशास्त्राचा सिद्धांत मांडणारे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजीमधील अर्थशास्त्रज्ञ प्रा. अभिजित बॅनर्जी यांना पहिला माल्कम – आदिशेषय्या पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • 2014 : नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने दुसऱ्या ताऱ्याच्या राहण्यायोग्य क्षेत्रामध्ये पृथ्वीच्या आकाराचा पहिला ग्रह शोधल्याची पुष्टी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1478 : ‘आचार्य संत सूरदास’ – हिंदी कवी, थोर कृष्णभक्त व कीर्तनभक्तीचे यांचा जन्म.
  • 1820 : ‘अलेक्झांडर कार्टराईट’ – बेसबॉल चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 जुलै 1892)
  • 1837 : ‘जे. पी. मॉर्गन’ – अमेरिकन सावकार यांचा जन्म. (मृत्यू: 31 मार्च 1913)
  • 1891 : कोशकार यशवंत रामकृष्ण दाते – यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1973)
  • 1897 : ‘निसर्गदत्त महाराज’ – अद्वैत तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1981)
  • 1916 : ‘सिरिमाओ बंदरनायके’ – जगातील पहिल्या महिला पंतप्रधान तर श्रीलंकेच्या 6 व्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2000)
  • 1951 : ‘बिंदू’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1961 : ‘गीत सेठी’ – बिलियर्डसपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘मुथय्या मुरलीधरन’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1977 : ‘दिनेश मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1790 : ‘बेंजामिन फ्रँकलिन’ – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1706)
  • 1882 : ‘जॉर्ज जेनिंग्स’ – फ्लश टॉयलेट चे शोधक यांचे निधन. (जन्म: 10 नोव्हेंबर 1810)
  • 1946 : ‘व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री’ – भारत सेवक समाजाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1869)
  • 1975 : ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ – भारताचे दुसरे राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1888)
  • 1997 : ‘बिजू पटनायक’ – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘विजय सिप्पी’ – चित्रपट निर्माते यांचा मृत्यू.
  • 2001 : ‘डॉ. वा. द. वर्तक’ – वनस्पतिशास्त्रज्ञ तसेच देवराई अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 19 ऑक्टोबर 1925)
  • 2004 : ‘सौंदर्या’ – कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1972)
  • 2011 : ‘वि.आ. बुवा’ – विनोदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै 1926)
  • 2012 : ‘नित्यानंद महापात्रा’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 17 जुन 1912)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

प्रवाशांना चांगली सुविधा न देणाऱ्या हॉटेल -मोटेल थांबे रद्द करा ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी प्रशासनाला निर्देश

   Follow us on        

मुंबईः (१६ एप्रिल, २०२५)-लांब पल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस थांबत असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्यावर प्रवाशांना आरोग्यदायी आणि किफायतशीर सुविधा मिळत नसतील तर असे थांबे रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात सध्या सुरु असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना केल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बसेस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो. परंतु अनेक हॉटेलमधील थांब्या बाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एस टी प्रवासांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी उद्भभवत आहेत.

या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच सध्या संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या हॉटेल-मोटेल थांब्याचे नव्याने सर्वेक्षण करून तेथील प्रवासी सुविधांची चाचपणी करावी. जे थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी व नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसात आपल्याला सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

 

Facebook Comments Box

दोडामार्ग: झाड तोडताना वुड कटरने मांडीची शीर कापली गेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

दोडामार्ग: झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला वुड कटर लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा. साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.

नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्‍यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो वुड कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता नागेश याचा अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नागेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Facebook Comments Box

ATM in Railway: धावत्या रेल्वेमध्ये देशातील पहिली एटीएम सेवा सुरू

   Follow us on        

Atm in Railway : मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असून, अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search