०५ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 19:29:29 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 29:33:06 पर्यंत
  • करण-विष्टि – 07:47:11 पर्यंत, भाव – 19:29:29 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-अतिगंड – 20:02:52 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:31
  • सूर्यास्त- 18:52
  • चन्द्र-राशि-मिथुन – 23:26:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 12:24:00
  • चंद्रास्त- 26:11:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • समता दिवस
  • राष्ट्रीय समुद्री दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1663 : शिवाजी महाराजांनी 200 घोडेस्वारांसह मुघल सुभेदार शाहिस्तेखानवर दहा हजार सैन्यासह पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून अचानक हल्ला केला. शाहिस्तेखान खिडकीतून फरार; मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली.
  • 1679 : जुल्फिकारखानने राजारामाला पकडण्यासाठी रायगडाला वेढा घातला तेव्हा राजाराम रायगडावरून प्रतापगडावर गेला. पुढे प्रतापगडाला शत्रूंनी वेढा दिला तेव्हा राजारामाला पन्हाळगडावर जावे लागले.
  • 1930: महात्मा गांधींनी 241 मैलांचा प्रवास करून दांडी यात्रा पूर्ण केली.
  • 1949 : भारत स्काउट – गाईडची स्थापना झाली.
  • 1957 : भारतात प्रथमच केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक जिंकली आणि एम.एस. नंबुद्रीपाद केरळचे मुख्यमंत्री झाले.
  • 1964 : राष्ट्रीय समुद्री दिवस
  • 1999 : भारताच्या मालकीचं पहिलं जहाज एस.एस. लॉयल्टी लंडनला रवाना झालं.
  • 2000 : जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे उद्घाटन.
  • 2000 : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. –10 या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
  • 2010 : नक्षलवाद्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण हल्ल्यात, दंतेवाडा, छत्तीसगड येथे 73 CRPF जवान शहीद झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1827 : ‘सर जोसेफ लिस्टर’ – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1912)
  • 1856 : ‘बुकर टी. वॉशिंग्टन’ – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1915)
  • 1908 : ‘बाबू जगजीवनराम’ – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1986)
  • 1909 : ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली’ – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 1996)
  • 1916 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 2003)
  • 1920 : ‘डॉ. रफिक झकारिया’ – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुलै 2005)
  • 1920 : ‘आर्थर हॅले’ – इंग्लिश कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 2004)
  • 1961 : ‘प्रशांत दामले’ – मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
  • 1966 : ‘आसिफ मांडवी’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते आसिफ मांडवी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1917 : ‘शंकरराव निकम’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन.
  • 1922 : ‘पंडिता रमाबाई’ – आर्य महिला समाजच्या संस्थापिका यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1858)
  • 1940 : ‘चार्लस फ्रिअरी’ तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1871)
  • 1964 : ‘गोपाळ विनायक भोंडे’ – नकलाकार यांचे निधन.
  • 1993 : ‘दिव्या भारती’ – हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 25 फेब्रुवारी 1974)
  • 1996 : ऑर्गनवादक भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे यांचे निधन.
  • 1998 : ‘रुही बेर्डे’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल :

गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ०७/०४/२०२५ ते ०२/०६/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.

ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Facebook Comments Box

Shaktipeeth Expressway: ”…. तर कुणाल कामराज चे गाणे वाजवून करणार शिंदेंना विरोध”

शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर 5 एप्रिल ला एकनाथ शिंदेंना अडवणार: गिरीश फोंडे यांचा इशारा

1 मे महाराष्ट्र दिन रोजी देखील कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही असाइशारा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: कोल्हापुरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिले ‌. पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे. या पार्श्वभूमी वरती आज सर्किट हाऊस मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले,” एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २९०० शेतकरी दररोज आठ आत्महत्या केलेल्या असताना विजय मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.12 मार्च च्या मुंबई मोर्चा रोजी देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामरा चे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल”

उभाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,” महाराष्ट्र युती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांच्या वरती दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भिक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे.”गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले,”निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू नये.”

शिवाजी कांबळे म्हणाले,” सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंट ना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे.

कृष्णात पाटील म्हणाले,” एकनाथ शिंदे चे कोल्हापुरातील आमदार हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना चितावणी देत आहेत. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.”

इंडिया आघाडीने देखील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता सर्किट हाऊस येथे मीटिंग बोलवली आहे. त्यामुळे आंदोलनाची व्यापकता वाढणार आहे.

यावेळी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार सरवडे येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विजय मेळाव्याच्या शेजारी म्हणजे मुदाळ तिट्टा जवळ शेतकऱ्यांची एक टीम जमेल. दुसऱ्या व तिसऱ्या टीमचा निर्णय वेळप्रसंगी घेऊ.

यावेळी शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुरेश बन्ने,किसान सभेचे नामदेव पाटील ,दिनकर सूर्यवंशी, प्रकाश पाटील,वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय एन पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook Comments Box

०४ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 20:15:39 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 29:21:33 पर्यंत
  • करण-गर – 08:54:48 पर्यंत, वणिज – 20:15:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 21:44:53 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:32
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 11:22:00
  • चंद्रास्त- 25:19:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस
  • आंतरराष्ट्रीय गाजर दिवस
  • व्हिटॅमिन सी दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1882 : ब्रिटनची पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये उघडली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने बुखारेस्ट, रोमानियावर बॉम्ब टाकला आणि 3,000 नागरिक ठार झाले.
  • 1949 : 11 पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेसह 12 देशांनी नाटो (NATO) ची स्थापना केली.
  • 1968 : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
  • 1968 : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
  • 1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1823 : ‘सर कार्ल विल्हेम सीमेन्स’ – जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता यांचा जन्म. (मृत्यू: 19 नोव्हेंबर 1883)
  • 1842 : ‘एडवर्ड लुकास’ – फ्रेंच गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1891)
  • 1893 : ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1985)
  • 1906 : ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
  • 1902 : ‘पं नारायणराव व्यास’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1984)
  • 1932 : ‘जयंती पटनायक’ – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा( (मृत्यू: 28 सप्टेंबर 2022)
  • 1933 : ‘बापू नाडकर्णी’ – डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1938 : ‘आनंद मोहन चक्रबर्ती’ – भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीव वैज्ञानिक (मृत्यू: 10 जुलै 2020)
  • 1973 : ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1617 : ‘जॉन नेपिअर’ – स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक यांचे निधन.
  • 1892 : ‘जोस मारिया कास्त्रो मैड्रिज़’ – कोस्टा रिका चे पहले आणि पाचवे राष्ट्रपति (जन्म: 1 सप्टेंबर १८१८)
  • 1923 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1834)
  • 1929 : ‘कार्ल बेन्झ’ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1844)
  • 1931 : ‘आंद्रे मिचेलिन’ – फ्रेन्च उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1853)
  • 1968 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ (ज्युनियर) – नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या झाली. (जन्म: 15 जानेवारी 1929)
  • 1979 : ‘झुल्फिकार अली भत्तो’ – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1928)
  • 1987 : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1911)
  • 1996 : ‘आनंद साधले’ – संस्कृत आणि मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1920)
  • 2000 : ‘वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
  • 2016 : ‘पी. ए. संगमा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1947)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार इरोड – बारमेर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway: उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उन्हाळी हंगाम – २०२५ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०६०९७ / ०६०९८ इरोड जंक्शन – बारमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष:
गाडी क्रमांक ०६०९७ इरोड जंक्शन – बारमेर साप्ताहिक विशेष ही गाडी दर मंगळवारी, ०८/०४/२०२५ ते १०/०६/२०२५ पर्यंत इरोड जंक्शन येथून सकाळी ०६:२० वाजता सुटेल आणि गाडी तिसऱ्या दिवशी ०४:३० वाजता बारमेरला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०६०९८ बाडमेर – इरोड जंक्शन साप्ताहिक विशेष ही गाडी दर शुक्रवारी, ११/०४/२०२५ ते १३/०६/२०२५ पर्यंत बाडमेरहून रात्री २२:५० वाजता सुटेल आणि इरोड जंक्शन येथे तिसऱ्या दिवशी २०:१५ वाजता पोहोचेल.
ही गाडी तिरुपूर,पोदनूर जंक्शन, पलक्कड, शोरानूर जं., तिरूर. कोझिकोड, कन्नूर, कासारगोड, मंगळुरु जं., उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बयंदूर (एच), भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, अंकोला, कारवार, मडगाव जं., करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली , वैभववाडी रोड, राजापूर रोड. रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरुच जं., वडोदरा जं., नडियाद जं., साबरमती, भिलडी जं., राणीवरा, मारवाड भीनमाळ, मोदरण, जालोर, मोक्लधारी, जं. आणि बायतु स्टेशनला थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : थ्री टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १४ कोच, जनरल – ०४ कोच, एसएलआर – ०२.
Facebook Comments Box

०३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 21:44:19 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 07:03:22 पर्यंत, मृगशिरा – 29:52:11 पर्यंत
  • करण-कौलव – 10:43:46 पर्यंत, तैतुल – 21:44:19 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 24:00:59 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:33
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-वृषभ – 18:22:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 10:20:59
  • चंद्रास्त- 24:21:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • जागतिक जलचर प्राणी दिवस World Aquatic Animal Day
  • राष्ट्रीय चालण्याचा दिवस National Walking Day
  • जागतिक पार्टी दिवस World Party Day
  • राष्ट्रीय बायोमेकॅनिक्स दिवस National Biomechanics Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1948: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1973: मोटोरोलाचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
  • 1975 : बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्हविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर अनातोली कार्पोव्ह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनला.
  • 1984 : राकेश शर्मा, पहिले भारतीय अंतराळवीर, यांनी सोयुझ टी-11 अंतराळयानातून उड्डाण केले. ते 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अंतराळात होते.
  • 2000 : आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
  • 2010: ऍपल कंपनीने आयपॅड टॅबलेट संगणकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 2016: पनामा पेपर्स या कायदेशीर दस्तऐवजाने सुमारे 2,14,488 कंपन्यांची गोपनीय माहिती उघड केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1781 : ‘स्वामीनारायण’ – हिंदू धर्माच्या स्वामीनारायण संप्रदाय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1830)
  • 1882 : ‘नाथमाधव’ – सामाजिक ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1928)
  • 1898 : ‘हेन्री लुस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 फेब्रुवारी 1967)
  • 1903 : ‘कमलादेवी चट्टोपाध्याय’ – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑक्टोबर 1988)
  • 1904: ‘रामनाथ गोएंका’ – इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑक्टोबर 1991)
  • 1914 : ‘सॅम माणेकशा’ – फील्ड मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 27 जून 2008)
  • 1930 : ‘हेल्मुट कोल्ह’ – जर्मन चॅन्सेलर यांचा जन्म.
  • 1934 : ‘जेन गुडॉल’ – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1942 : ‘आदि गोदरेज’ – भारतातील प्रसिद्ध उद्योगपति आणि प्रसिद्ध औद्योगिक घराने गोदरेज समूह उद्योगाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1949 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक व निर्माते यांचा जन्म.
  • 1955 : ‘हरिहरन’ – सुप्रसिद्ध गायक यांचा जन्म.
  • 1962 : ‘जयाप्रदा’ – चित्रपट अभिनेत्री आणि संसद सदस्य यांचा जन्म.
  • 1965 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००)
  • 1973 : ‘निलेश कुलकर्णी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1680 : छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1630)
  • 1891 : ‘एडवर्ड लूकास’ – फ्रेन्च गणिती यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1842)
  • 1981 : ‘जुआन त्रिप्प’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एरलाईन्स चे स्थापक यांचे निधन.(जन्म: 27 जून 1899)
  • 1985 : ‘डॉ. वासुदेव विष्णू मिराशी’ – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक यांचे निधन. (जन्म: 13 मार्च 1893)
  • 1998 : ‘मेरी कार्टराइट’ – इंग्लिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1900)
  • 1998 : ‘हरकिसन मेहता’ – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार यांचे निधन.
  • 2012 : ‘गोविंद नारायण’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 5 मे 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

०२ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 23:52:35 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 08:50:45 पर्यंत
  • करण-भाव – 13:10:01 पर्यंत, बालव – 23:52:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 26:49:28 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:34
  • सूर्यास्त- 18:51
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 09:24:00
  • चंद्रास्त- 23:15:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस World Autism Awareness Day
  • बालचित्र पुस्तक दिन Children’s Picture Book Day
  • नॅशनल फेरेट डे National Ferret Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1870: ‘गणेश वासुदेव जोशी’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची ( पब्लिक असेंब्लीची) स्थापना झाली.
  • 1982: फॉकलंड युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे ताब्यात घेतली.
  • 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
  • 1989 : तणावग्रस्त संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हवाना, क्युबा येथे आले.
  • 1990 : भारतीय लघु उद्योग विकास बैंक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) स्थापना झाली.
  • 1998 : निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वेवर धावू लागली.
  • 2011: भारताने 28 वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1618 : ‘फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1805 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचा जन्म.
  • 1875 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1940)
  • 1898 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1990)
  • 1902 : पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 1968)
  • 1926 : कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1979)
  • 1942 : भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
  • 1969 : हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
  • 1972 : भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
  • 1981 : भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1872 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1933 : महाराजा के. एस. रणजितसिंह – क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1992: आगाजान बेग ऊर्फ आगा – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन. (जन्म: 18 मे 1920)
  • 2009 : गजाननराव वाटवे – गायक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म: 8 जून 1917)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

सीमावर्ती भागातील मराठी जनतेवर कोकण रेल्वेचा अन्याय

   Follow us on        

Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर  या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.

कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.

या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.

 

 

Facebook Comments Box

०१ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 26:35:13 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 11:07:41 पर्यंत
  • करण-वणिज – 16:07:15 पर्यंत, विष्टि – 26:35:13 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 09:47:34 पर्यंत, प्रीति – 30:06:45 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:32
  • सूर्यास्त- 18:50
  • चन्द्र-राशि-मेष – 16:31:07 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:31:00
  • चंद्रास्त- 22:08:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • एप्रिल फूल डे April Fools Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1887 : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना.
  • 1895 : भारतीय सैन्याची स्थापना.
  • 1924 : रॉयल कॅनेडियन हवाई दलाची स्थापना झाली.
  • 1928 : पुणे वेधशाळेचे काम सुरू झाले.
  • 1933 : कराची येथे भारतीय वायुसेनेचे पहिले उड्डाण.
  • 1935 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) स्थापना.
  • 1936 : ओरिसा राज्याची स्थापना.
  • 1937 : रॉयल न्यूझीलंड हवाई दलाची स्थापना.
  • 1955 : गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
  • 1957 : भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
  • 1973 : कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर प्रकल्प सुरू करण्यात आला.
  • 1976 : ऍपल इंक. (Apple Inc.) कंपनी ची स्थापना झाली.
  • 1990 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.
  • 2004 : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1578 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1657)
  • 1621 : ‘गुरू तेग बहादूर’ – शिखांचे नववे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 24 नोव्हेंबर 1675)
  • 1815 : जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1898)
  • 1889 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1940)
  • 1907 : भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.
  • 1912 : हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1988)
  • 1936 : आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.
  • 1941 : भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1984 : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: 4 एप्रिल 1902)
  • 1989 : समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1904)
  • 1999 : भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.
  • 2000 : कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1916)
  • 2003 : गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.
  • 2006 : बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1925)
  • 2012 : भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: 18 मार्च 1921)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

सावंतवाडी – सांगेली येथे अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

   Follow us on        

सावंतवाडी  : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search