Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार

   Follow us on        

गोवा: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

रेल्वेने आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही!

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. मात्र यावेळीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

Facebook Comments Box

MSRTC Updates: आगाऊ आरक्षण केल्यास १५ टक्के सूट! एसटीच्या नवीन सवलतीची आजपासून अंबलबजावणी

   Follow us on        

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभघ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत उद्यापासून (१जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on         Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २८/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ३०/०६/२०२५ ते २५/०८/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. ०३/०७/२०२५ ते २८/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

 

Facebook Comments Box

०१ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 10:23:06 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 08:54:46 पर्यंत
  • करण-तैतुल – 10:23:06 पर्यंत, गर – 23:07:20 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-व्यतापता – 17:18:19 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-सिंह – 15:24:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:28:00
  • चंद्रास्त- 23:51:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय विनोद दिन
  • कृषी दिन
  • राष्ट्रीय डाक कर्मचारी दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1693 : संभाजी राजांच्या मृत्यूनंतर, मुघलांच्या ताब्यात गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी स्वराज्यात परत आणला.
  • 1837 : इंग्लंडमध्ये जन्म, मृत्यू आणि विवाह यांची अधिकृत नोंदणी सुरू झाली.
  • 1874 : पहिले व्यावसायिक टाइपरायटर विक्री सुरु झाली.
  • 1881 : जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
  • 1903 : पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू झाली.
  • 1908 : SOS हे आंतरराष्ट्रीय आपत्कालीन चिन्ह म्हणून स्वीकारले गेले.
  • 1909 : कर्नल विल्यम कर्झन वायली यांची क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने गोळ्या घालून हत्या केली.
  • 1919 : कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्र सुरू केले.
  • 1921 : चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना.
  • 1933 : नाट्यमन्वंतर नाटकाची शाळा अंधांसाठी प्रथम रंगली.
  • 1931 : युनायटेड एअरलाइन्स सुरू झाली.
  • 1934 : मानवी शरीराचे पहिले छायाचित्र काढण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
  • 1947 : फिलीपीन हवाई दलाची स्थापना झाली.
  • 1948 : बाजारातील व्यापाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी पूना मर्चंट्स चेंबरची स्थापना करण्यात आली.
  • 1948 : कायद-ए-आझम मुहम्मद अली जिना यांनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे उद्घाटन केले.
  • 1949 : त्रावणकोर आणि कोचीनचे विलीनीकरण करून तिरुकोचीची स्थापना झाली.
  • 1955 : स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. पूर्वी बँकेचे नाव इम्पीरियल बँक होते.
  • 1960 : रवांडा आणि बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
  • 1961 : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1962 : सोमालिया आणि घाना स्वतंत्र देश झाले.
  • 1963 : यूएस पत्रव्यवहारात पिन कोड वापरण्यास सुरुवात झाली.
  • 1964 : न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
  • 1966 : कॅनडातील पहिले रंगीत टेलिव्हिजन प्रसारण टोरोंटो येथे सुरू झाले.
  • 1979 : सोनी कंपनी ने वॉकमन प्रकाशित केला.
  • 1980 : ओ कॅनडा अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रगीत बनले.
  • 1991 : वॉर्सा कराराने सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि पूर्व जर्मनी या विद्यमान कम्युनिस्ट राष्ट्रांचा अंत केला.
  • 1997 : भारताच्या कुंजराणी देवीने सर्वोत्तम वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळवले.
  • 2001 : फेरारीच्या मायकेल शूमाकरने फॉर्म्युला वन वर्ल्ड सीरिजमध्ये फ्रेंच ग्रांप्री जिंकली. पूर्व. त्याने ही शर्यत जिंकली आणि फॉर्म्युला वन मालिकेतील आपले 50 वे विजेतेपद मिळवले.
  • 2002 : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना.
  • 2007 : इंग्लंडमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यात आली.
  • 2015 : डिजिटल इंडिया प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • 2017 : वस्तू आणि सेवा कर (GST) हा अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून भारतात लागू करण्यात आला.
  • 2020 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो च्या मार्स ऑर्बिटर मिशनने मंगळाच्या सर्वात जवळचा आणि सर्वात मोठा चंद्र असलेल्या फोबोसचे छायाचित्र घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1887 : ‘एकनाथ पांडुरंग रेंदाळकर’ – कविवर्य यांचा जन्म.
  • 1882 : ‘डॉ. बिधनचंद्र रॉय’ – भारतरत्न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुलै 1962)
  • 1913 : ‘वसंतराव नाईक’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1979)
  • 1938 : ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया’ – प्रख्यात बासरीवादक यांचा जन्म.
  • 1949 : ‘वेंकय्या नायडू’ – भारताचे 13 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1961 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 2003)
  • 1966 : ‘उस्ताद राशिद खान’ – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म.
  • 1975 : ‘कर्नाम मल्लेश्वरी’ -पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, भारतीय वेटलिफ्टर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1860 : ‘चार्ल्स गुडईयर’ – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1800)
  • 1938 : ‘दादासाहेब खापर्डे’ – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1854)
  • 1941 : ‘सर सी. वाय. चिंतामणी’ – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री याचं निधन. (जन्म : 10 एप्रिल 1880 – विजयनगरम, आंध्र प्रदेश)
  • 1962 : ‘पुरुषोत्तमदास टंडन’ – अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन.
  • 1962 : ‘डॉ. बिधनचंद्र रॉय’ – भारतरत्‍न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य यांचे निधन. (जन्म : 1 जुलै 1882)
  • 1969 : ‘मुरलीधरबुवा निजामपूरकर’ – कीर्तनकार यांचे निधन.
  • 1989 : ‘प्राचार्य ग. ह. पाटील’ – कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1994 : ‘राजाभाऊ नातू’ – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक यांचे निधन.
  • 1999 : ‘फॉरेस्ट मार्स सीनियर’ – एम अँड एम चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 मार्च 1904)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Banda: एसटी बस दुसर्‍या बसवर आदळली आणि १०० फूट फरफटत नेले; बांद्याजवळ २ एसटी बसमध्ये मोठा अपघात

   Follow us on        

Banda: बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही पण दोन्ही बस मधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. “बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत.” अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली

Facebook Comments Box

Railway Updates:रेल्वे तिकीट आरक्षण नियमात मोठे बदल; उद्यापासून अंमलबजावणी

   Follow us on        

Railway Updates:भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.

या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

 

Facebook Comments Box

३० जून पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 09:26:35 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 07:21:52 पर्यंत
  • करण-बालव – 09:26:35 पर्यंत, कौलव – 21:49:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्वि – 17:20:31 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 10:37:59
  • चंद्रास्त- 23:18:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस
  • सोशल मीडिया दिवस
  • आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1859 : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा पार केला.
  • 1868 : क्रिस्टोफर श्लेसने टाइपरायटरचे पेटंट अधिकार मिळवले.
  • 1937 : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
  • 1944 : प्रभातचा रामशास्त्री सिनेमा, सेंट्रल मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1960 : काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1965 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कच्छचा करार झाला.
  • 1966 : कोकसुब्बा राव भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले.
  • 1966 : नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन, अमेरिकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संघटना स्थापन झाली.
  • 1971 : रशियन सोयुझ-11 अंतराळयानामध्ये बिघाड होऊन तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • 1978 : यूएस राज्यघटनेतील 26 वी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली, मतदानाचे वय 18 वर नेण्यात आले.
  • 1986 : केंद्र सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यातील कराराद्वारे मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • 1997 : ब्रिटनने चीन कडून 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट चीनला परत दिले.
  • 2002 : ब्राझीलने फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2019 : डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले
  • 2022 : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1470 : ‘चार्ल्स-आठवा’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1498)
  • 1919 : ‘एड यॉस्ट’ – हॉट एअर बलूनचे निर्माते यांचा जन्म: (मृत्यू: 27 मे 2007)
  • 1928 : ‘कल्याणजी वीरजी शहा’ – कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑगस्ट 2000)
  • 1934 : ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1943 : ‘सईद मिर्झा’ – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म.
  • 1954 : ‘पिएर चार्ल्स’ – डॉमिनिकाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1959 : ‘संदीप वर्मा’ – भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘माइक टायसन’ – अमेरिकन मुष्टीयोद्धा यांचा जन्म.
  • 1969 : ‘सनत जयसूर्या’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1973 : ‘दोड्डा गणेश’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1917 : ‘दादाभाई नौरोजी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1825)
  • 1919 : ‘जॉनविल्यम स्टूट रॅले’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे’ – साहित्यिक, वक्ते समीक्षक यांचे निधन.
  • 1994 : ‘बाळ कोल्हटकर’ – नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1926)
  • 1997 : ‘राजाभाऊ साठे’ – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक यांचे निधन.
  • 1999 : ‘कृष्णा बळवंत निकुंब’ – मराठी काव्यसृष्टीतील कवी यांचे निधन.
  • 2007 : ‘साहिबसिंह वर्मा’ – दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री यांचे निधन. ( जन्म: 15 मार्च 1943)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

मराठी भाषा वाचली! पहिलीपासून तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर रद्द

   Follow us on        

मुंबई: तमाम मराठी भाषा प्रेमींसाठी खुशखबर आहे. तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः ५ जुलै रोजी ठाकरे बंधूकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.

आज महायुतीच्या मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यानंतर सरकारी स्तरावर जीआर रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री सुमारे १५ मिनिटे याबाबत चर्चा झाली होती.

Facebook Comments Box

२९ जून पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 09:17:20 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 06:35:27 पर्यंत
  • करण-विष्टि – 09:17:20 पर्यंत, भाव – 21:15:50 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 17:58:36 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:06
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-कर्क – 06:35:27 पर्यंत
  • चंद्रोदय- 09:43:59
  • चंद्रास्त- 22:45:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय चिखल दिवस
  • आंतरराष्ट्रीय मच्छिमार दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1871 : ब्रिटिश संसदेने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा संमत केला.
  • 1974 : इसाबेल पेरिन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • 1975 : स्टीव्ह वोझ्नियाकने ऍपल -1 संगणकाच्या पहिल्या प्रोटोटाइपची चाचणी केली.
  • 1952 : पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि फिनलंडच्या आर्मी कुसेलाने विजेतेपद पटकावले.
  • 1976 : सेशेल्सला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986: अर्जेंटिनाने 1986 चा फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2001 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • 2001 : पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • 2007 : ऍपलने आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला.
  • 2018 : मध्य प्रदेशला प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.
  • 2022 : उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • 2024 : भारतीय संघाने टी20 विश्वकप जिंकला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1793 : ‘जोसेफ रोसेल’ – प्रोपेलर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1857)
  • 1864 : ‘आशुतोष मुखर्जी’ – शिक्षणतज्ज्ञ व वकिल यांचा जन्म.
  • 1871 : ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’ – मराठी नाटककार, विनोदकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1934)
  • 1893 : ‘प्रसंत चंद्र महालनोबिस’ – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1972)
  • 1908 : ‘प्रतापसिंग गायकवाड’ – बडोद्याचे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1968)
  • 1934 : ‘कमलाकर सारंग’ – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 1998)
  • 1936 : ‘बुद्धदेव गुहा’ – बंगाली भाषेतील प्रसिद्ध कथाकार यांचा जन्म.
  • 1945 : ‘चंद्रिका कुमारतुंगा’ – श्रीलंकेच्या 5व्या राष्ट्राध्यक्षा यांचा जन्म.
  • 1946 : ‘अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस’ – पनामाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1956 : ‘पेद्रोसंताना लोपेस’ – पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1975 : उपासना सिंग – भारतीय अभिनेत्री आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1873 : ‘मायकेल मधुसूदन दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1824)
  • 1895 : ‘थॉमस हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 4 मे 1825)
  • 1966 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1907)
  • 1981 : ‘दि.बा. मोकाशी’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1915)
  • 1992 : ‘मोहंमद बुदियाफ’ – अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1992 : ‘शिवाजीराव भावे’ – सर्वोदयी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 1993 : ‘विष्णुपंत जोग’ – चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते यांचे निधन.
  • 2000 : ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1911)
  • 2003 : ‘कॅथरिन हेपबर्न’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 12 मे 1907)
  • 2010 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1927)
  • 2011 : ‘के. डी. सेठना’ – भारतीय कवि आणि विद्वान लेखक यांचे निधन.(जन्म: 26 नोव्हेंबर 1904)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे गरजेचे

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सुरु आहे. पळस्पे – इंदापूर विभाग, चिपळूण – आरवली – संगमेश्वर – हातखंबा अशा कित्येक भागातील रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळस्पे – इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होतोच.

काही पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होऊन वाहने घासून नुकसान होते. तर मुख्य मार्गावर काही भागांत चांगला रस्ता असला तरी अचानक मध्ये खड्डे येतात. काही ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे चिखल मातीतून वाहनचालकांना गाडी हाकावी लागते. या सर्वांत गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडतात. यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे. एकूणच, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य व जीवघेणे आव्हान आहे. मुळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग न म्हणता महाराष्ट्रातील दुर्लक्षित व भारतातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून घोषित केले पाहिजे.

ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांसारख्या चांगल्या व सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून टोल घेतला जातो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई गोवा मार्गावरून (पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला काही विशिष्ट रक्कम द्यावी (टोल द्यावा). तसेच, अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा. अशी मागणी कोकण विकास समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.

वाहनांची नोंदणी करण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच बांधून तयार असलेल्या टोल नाक्यांचा उपयोग करता येईल असेही त्यांनी या निवेदनात सुचवले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search