Category Archives: अपघात

Indian Railway: वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पाचारण

   Follow us on        
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या  आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.

धक्कादायक! गणपतीपुळ्याच्या समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविण्यात यश

   Follow us on        
रत्नागिरी, दि. २९ सप्टें: गणपतीपुळे येथे समुद्रात आज रविवारी (दि.29) सायंकाळी 5.15 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्‍यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. प्रदीप कुमार (30,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद युसूफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टचे तीन कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु, यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जयगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र या तिघांपैकी दोघांचा या दरम्यान मृत्यू झाला.

आचरा समुद्रात नौका बुडाली; तिघांचा मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्‍यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.

रेल्वे पुन्हा घसरली; साबरमती एक्सप्रेसला अपघात

   Follow us on        

Train Derailment: मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.

19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही

कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.

इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.

 

 

 

Breaking: हावडा-मुंबई एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

 

Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेसचा अपघात होता होता टळला; लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेचे कौतुक

   Follow us on        
Konkan Railway News: पावसाळ्यात संपूर्ण कोकण मार्ग धोकादायक बनतो; धोक्याच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या धोका असतोच शिवाय अन्य विपरीत गोष्टी घडण्याची भीतीही जास्त असते. अशा वेळी या मार्गावरील चालणाऱ्या गाड्यांच्या चालकांना नेहमीच सावध आणि तत्पर राहावे लागते. लोको पायलटने दाखवलेल्या सावधानतेमुळे  असाच एक अपघत होता होता टळला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मोठा अपघात लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे टळला. बारकुर आणि उडुपी विभागादरम्यान येत असताना, या गाडीचे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने ट्रॅकवर पडलेले एक मोठे झाड पहिले आणि तत्परतेने आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी थांबवून हा अपघात टाळला.
यावेळी लोको पायलट म्हणून श्री पुरुषोत्तम आणि सहाय्यक लोको पायलट श्री मंजुनाथ नाईक कर्तव्यावर होते. त्यांच्या सतर्कतेची आणि समयसूचकतेची दखल घेऊनकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी प्रत्येक चालक दलातील (Crew) सदस्यांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये रोख बक्षीस जाहीर करून त्यांचा सन्मान केला.

धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदारचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

रायगड: इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल संबंधित पोस्टसाठी प्रसिद्ध असलेल्या रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईजवळ रायगडमध्ये एका धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदार यांचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती. तिने आपल्या या आवडीला करियर बनवले होते. प्रारंभिक तपासात समोर आले आहे की रायगडमध्ये कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करण्याच्या प्रयत्नात अन्वीचा हा अपघात झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अन्वी कामदार यांच्या इंस्टाग्रामवर दोन लाख ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डिलॉइट या कंपनीत नोकरीही केली होती. मुंबईत राहणाऱ्या अन्वी कामदार मान्सूनमध्ये कुंभे धबधब्याची शूटिंग करण्यासाठी पोहोचल्या होत्या.

३०० फुट खोल दरीत पडल्याने मृत्यू

अधिकार्यांनी सांगितले की, अन्वी कामदार एक रील शूट करत असताना ३०० फुट खोल्या दरीत पडल्या. हा अपघात रायगडजवळ कुंभे धबधब्यावर घडला. अन्वी १६ जुलै रोजी सात मित्रांसह धबधब्याच्या सैर करायला गेल्या होत्या. आज सकाळी सुमारे १०.३० वाजता हा प्रवास दुर्दैवी वाटेवर गेला. जेव्हा अन्वी व्हिडिओ शूट करत असताना एका खोल दरीत पडल्या. स्थानिक अधिकार्यांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आणि एक बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तटरक्षक दलांच्या सोबत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचार्यांची अतिरिक्त मदत मागवण्यात आली पण अन्वीला वाचवता आले नाही. अन्वीने इंस्टाग्रामवर आपल्या बायोमध्ये स्वत:चा परिचय देताना “यात्रा जासूस” असे लिहिले आहे. अन्वीला प्रवासाच्या सोबत चांगल्या स्थळांची माहिती देण्याचीही आवड होती.

 

रायगड: अलिबाग – पनवेल एसटी बस उलटली; ४ प्रवासी जखमी

 

   Follow us on        

रायगड दि. १५ जुलै : अलिबागहून पनवेलला जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस उलटली. बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. या अपघातात ४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, लोकांना बाहेर काढण्यात आले.

पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत कार्लेखिंड येथे अलिबाग ते पनवेल जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. एसटी बसचा एस्केल तुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

कांचनजंगा एक्सप्रेसला अपघात, एक्स्प्रेसची मालगाडीला धडक

   Follow us on        

Kanchenjunga Express accident: पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले.

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

 

 

 

 

 

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू; तिघांना वाचविण्यात यश

   Follow us on        
रत्नागिरी, दि. २ जून : सोलापूर येथून गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनाला आलेल्या एकाचासमुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अजित धनाजी वाडेकर (वय २५, रा. इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोलापूर जिल्ह्यातील इसबावी येथून अजित वाडेकर, अजय बबन शिंदे (वय २३), सार्थ दत्तात्रय माने (वय २४) व आकाश प्रकाश पाटील (वय २५) असे चार तरुण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी व पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे येथे समुद्रात अंघोळ करण्याचा मोह टाळता आला नाही. प्रथम देवदर्शन न करता ते समुद्रात अंघोळीसाठी उतरले. पोहता पोहता खोल पाण्यात जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी अजित वाडेकर हा खोल समुद्राच्या पाण्यात प्रवाहात अडकला. अजितला पाण्याबाहेर येता येत नसल्याचे लक्षात येताच त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांनी व इतर पर्यटकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. किनाऱ्यावर असलेल्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप साळवी, हवालदार कुणाल चव्हाण यांनी किनाऱ्याकडे धाव घेतली. जीवरक्षक अक्षय माने, महेश देवरुखकर, अंजिक्य रामाणी, विशाल निंबरे आदींसह किनाऱ्यावरील येथील व्यावसायिक राकेश शिवलकर यांनी पाण्यात उड्या घेतल्या. समुद्राच्या खोल पाण्यात अडकलेल्या तीन तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या अजित वाडेकर या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तो बेशुद्ध झाल्याने गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्रातून देण्यात आली. या घटनेचा अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search