Category Archives: गोवा वार्ता

“फ्लाय९१” ची मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर; सिंधुदुर्ग-पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही लागू

   Follow us on        
सिंधुदुर्ग: गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी “फ्लाय९१” ने मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत कंपनीच्या २० मार्गावर तिकिटांवर ₹ ३०० पर्यंत सवलत दिली जाईल. या सवलतीमध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्ग समाविष्ट आहेत. तसेच सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही ही सवलत लागू असेल, ज्यामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल.
ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ ने ही खास सवलतीची योजना जाहीर केली आहे. या सवलतीमध्ये गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुणे-सिंधुदुर्ग, बेंगळूरु-सिंधुदुर्ग, हैदराबाद-सिंधुदुर्ग, जळगाव-हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा-सोलापूर या मार्गावर देखील ही ऑफर लागू होईल.
फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले की, पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे. फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.

फक्त १९९१ रुपयामंध्ये विमान प्रवास! फ्लाय-९१ कंपनीची गोवा, हैद्राबाद, बेंगळुरु आणि सिंधुदुर्ग प्रवासासाठी खास ऑफर

   Follow us on        
Fly-91 Offer: मूळची गोव्याची असणाऱ्या Fly91 या विमान कंपनीने सोमवारी चार शहरांतून उड्डाणासह व्यावसायिक ऑपरेशन्सला सुरूवात केली आहे. कंपनीने गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणे सुरू केली आहेत. Fly91 एप्रिलमध्ये आगती, जळगाव आणि पुणे येथे उड्डाणे सुरू करणार आहे. यावेळी कंपनीने 1,991 रुपये विमान भाडे या विशेष ऑफर देखील लॉन्च केली आहे
Fly91 एअरलाइनच्या विमानाने गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण घेतले. एअरलाइनने बेंगळुरू ते सिंधुदुर्ग हे पहिले उड्डाणही चालवले आहे. गोवा आणि बेंगळुरू दरम्यान सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी उड्डाणे कार्यरत करण्याची कंपनीची योजना आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंपनीचे व्यावसायिक उड्डाण सुरू करणे एअरलाइनच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. कंपनीने लॉन्च केलेली 1,991 रुपये विमान भाड्याची विशेष ऑफर सर्व ठिकाणांसाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विमान कंपनी सोमवार, शुक्रवार आणि शनिवारी गोवा आणि बेंगळुरू दरम्यान उड्डाणे चालवेल. त्याचप्रमाणे, बेंगळुरू आणि सिंधुदुर्ग दरम्यान दर आठवड्याला समान संख्येने उड्डाणे चालविली जातील. याशिवाय गोवा ते हैदराबाद आणि सिंधुदुर्ग ते हैदराबाद दरम्यान आठवड्यातून दोनदा विमानसेवा चालणार आहे, असे चाको म्हणाले.
लक्षद्वीप आणि गोवा सारख्या लोकप्रिय स्थळांशी प्रवाशांना जोडणे हा Fly91 चा उद्देश आहे. भारतातील टियर आणि शहरांशी हवाई संपर्क वाढवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे, असे चाको म्हणाले.

Konkan Railway: वास्को स्थानकावर सापडली तब्बल १६ किलोची चांदीची छत्री

   Follow us on        
Konkan Railway : मंगळवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वा.च्या दरम्यान वास्को रेल्वे पोलिस व रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान रेल्वे फलाटावर गस्त घालीत असताना त्यांना एक लाल रंगाची बॅग बेवारस स्थितीत मिळाली. त्यांनी ती ताब्यात घेऊन तपासणी केली असता आतमध्ये चादरीमध्ये गुंडाळलेली पांढऱ्या धातूची एक वस्तू दिसून आली. याप्रकरणी त्यांनी स्थानिक सोनाराला पाचारण करून त्याच्यामार्फत त्या वस्तूची तपासणी केली. पडताळणीअंती ती वस्तू चांदीची छत्री (छत) असल्याचे सिध्द झाले. तिचे वजन १६.४ किलोग्रॅम होते. ८७.५० टक्के शुध्दता असलेल्या त्या छत्रीची किंमत अंदाजे ५ लाख ३७ हजार ६०० रुपये होते.
वास्को रेल्वे स्थानकावर मंगळवारी (ता.१५) सायंकाळी सापडलेली चांदीची छत्री ही कारवार येथील साईबाबा मंदिरातून संशयितांनी चोरल्याचे उघडकीस आले. कारवार पोलिसांनी बुधवारी (ता.१६) वास्कोला येऊन ती छत्री कायदेशीर सोपस्कारानंतर ताब्यात घेतली, असे वास्को रेल्वे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
ही चांदीची छत्री (छत्र) कारवार येथील साईबाबा मंदिरात चोरी झालेल्या मुद्देमालापैकी एक असल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी त्या मंदिरातील सोळा किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू चोरल्या होत्या. त्यानंतर कदाचित ते वास्कोला आले असावेत. वास्को रेल्वे स्थानकावर पोलीस गस्त त्याची चांदीची छत्री असलेली बॅग फलाटावर सोडून तेथून पळ काढला असावा , अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे .

मुंबई गोवा मार्ग पुढील ६ महिन्यात पूर्ण होणार; प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

   Follow us on        
Mumbai Goa Highway:
संपूर्ण गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग-६६ चे चौपदरीकरण पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या मार्गाचे जवळजवळ ४६३ किमी लांबीचे काम आधीच पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि गोवादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. तथापि, विविध समायोजन आणि व्याप्ती बदलांमुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक फायदे मिळतील आणि गोवा आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एकूण प्रवास अनुभव वाढेल अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणालेत.

विशेष गाडीतून महाकुंभमेळ्यासाठी जाणारे गोव्यातील १०० प्रवासी रत्नागिरीहून माघारी फिरले; कारण काय?

   Follow us on        

रत्नागिरी: गोवा सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी चालविलेल्या विशेष गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला असून गाडीच्या एकूण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने या गाडीला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने आपला प्रवास अर्धवट सोडून परत माघारी फिरावे लागले असल्याची बातमी समोर आली आहे.

गोवा सरकारने गोव्यातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी विशेष सवलत देवून या मार्गावर गाड्या चालविल्या आहेत. प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि इतर सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रवासाकरिता सरकारने पास वितरित केले होते. मात्र पासधारकां व्यतिरिक्त किमान ४०० अतिरिक्त प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते. या अतिरिक्त प्रवाशांमुळे गोवा सरकारने देवू केलेल्या सवलतींवर म्हणजे जेवण आणि इतर गोष्टींवर परिणाम झाला. कारण या गोष्टी फक्त पास धारकांपुरत्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावर ताण आला.

दुसरी गोष्ट म्हणजे पास धारक आणि बिनापासधारक प्रवाशांमध्ये जागेसाठी खटके उडू लागले. रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.

 

 

गोवा सरकार चालविणार ‘महाकुंभमेळा विशेष रेल्वे’ सेवा; भाविकांना मिळणार विशेष सोयी

   Follow us on        
पणजी : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार असून गरज भासेल त्याप्रमाणे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. येत्या ४ दिवसांत या गाड्यांचा मार्ग, वेळापत्रक आणि आरक्षण इत्यादी जाहीर करण्यात येणार आहे.
याशिवाय या प्रवासाला गोवा सरकारतर्फे सवलतीचे तिकीटदर आकारण्यात येणार आहे. तसेच प्रवासात सरकारतर्फे मार्गदर्शक (गाईड्स) नेमण्यात येणार आहेत. तसेच भाविकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी ईतर सुविधा देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या महा कुंभमेळ्याला यावर्षी लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत आहेत. 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणारा हा भव्य सोहळा 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे.

धक्कादायक! कोकण रेल्वेतून होत आहे ‘गोवा दारू’ ची तस्करी

   Follow us on        
मडगावः इतर राज्यातील तुलनेत गोवा राज्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे गोव्यातून आजूबाजूच्या राज्यात तस्करी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र आता तर गोव्यातून मद्याची तस्करी करताना रेल्वेचा वापर करत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यात मद्याची तस्करी केली जात असतानाच आता गुजरातमध्ये कोकण रेल्वेमार्गे दारू नेली जात असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे पोलीस दारू पकडतात. मात्र त्याचे प्रमाण नगण्य असते. मद्यमाफिया व पोलीस यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने हा धंदा बिनधास्त सुरू आहे.
अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त आहे. गुजरातमध्ये तर दारूबंदी आहे. गोव्यातून दुसऱ्या राज्यात अनेक वर्षांपासून मद्य चोरट्यामार्गे नेले जात आहे. हल्लीच गुजरात राज्यातील अबकारी अधिकारी मडगावात चौकशीसाठी आले होते. सुरत येथे मद्यसाठा पकडला होत. तो मडगावातून नेण्यात आला होता, असे तपासात उघड झाले होते.
पकडण्यात आलेल्या संशयितांनी मडगावातील एका दारू होलसेलवाल्याचे नाव सांगितल्याने पुढील तपासासाठी अधिकारी मडगावात आले होते. नंतर त्यांनी याबाबत फातोर्डा पोलिसांना त्याबाबत कल्पना दिली होती. दरम्यान, मागच्या वर्षी कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची एकूण ७ प्रकरणे नोंद करून दहाजणांना पकडले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना सांगितले, या मद्य तस्करीत बडी धेंडे गुंतलेली असतात. त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे अनेकदा माहिती असूनही कारवाई करता येत नाही.

Goa News: पॅराग्लायडिंग करताना दोरी तुटल्यामुळे अपघात होऊन पुण्यातील युवतीसह पायलटचा मृत्यू

गोवा वार्ता: केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली.
पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी मांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
spacer height=”20px”]
शिवानी ही मित्रासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आली होती. पर्यटनाचा एक भाग म्हणून पॅराग्लायडिंग करावे, या हेतूने ती डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेली. त्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने पॅराग्लायडरची एक दोरी मध्येच तुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेचा पंचनामा मांद्रे पोलिसांनी केला.
spacer height=”20px”]
 बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय
हा पॅराग्लायडर शेखर रायजादा नामक व्यक्तीचा होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. हरमल तसेच केरी भागात बेकायदेशीररित्या पॅराग्लायडिंगचा व्यवसाय केला जात असल्याचे सांगण्यात आले. येथील काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पॅराग्लायडिंगला आमचा विरोध असून तशा प्रकारचा ठराव मंजूर करूनही सरकारने अशा पॅराग्लायडिंग व्यवसायिकांना परवाने का दिले? कुणाला परवाने दिले? याची सविस्तर माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
spacer height=”20px”]

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राला ५ हजार कोटींचे साकडे

   Follow us on        

पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.

Loading

Video: गोव्यात लक्झरी पर्यटनासाठी पहिल्यांदाच ‘सुपर यॉट’ ची सेवा सुरु

   Follow us on        
Goa News: आता गोव्यात घेता येणार ‘लक्झरी’ पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते अलीकडेच गोव्यातील पहिल्या सुपर यॉट ‘RA11’ चे उद्घाटन पार पडले. भारताच्या प्रमुख सागरी क्लस्टरचा एक भाग म्हणून विकसित, ‘RA11’ लाँच केल्याने गोवा  राज्य आता लक्झरी आणि नॉटिकल पर्यटन क्षेत्रात उत्तम सेवा पर्यटकांना देईल अशी अपेक्षा आपल्याला आहे असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी  केली आहे.
गोवा MSME विजय मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे तयार केलेल्या RA 11 सुपर यॉटचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले, हे भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी यॉट मेक इन इंडिया, मेक इन गोवा या संकल्पनेला मूर्त रूप देत असल्याचे त्यांचे मत आहे.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search