Category Archives: गोवा वार्ता

वांद्रे – मडगाव दरम्यान उद्या धावणार शुभारंभ विशेष एक्सप्रेस; आरक्षण आजपासून सुरू

   Follow us on        

मुंबई: वांद्रे – मडगाव दरम्यान धावणाऱ्या नवीन गाडीचा शुभारंभ उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणार आहे. त्यासाठी शुभारंभ Inaurgual विशेष गाडीला दुपारी १.२५ वाजता बोरिवली येथे हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. या सोहळ्याला कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर मुंबई भाजप पक्षातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं ०९१६७ असून त्याचे आरक्षण बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पीआरएस आणि आरक्षण खिडक्यांवर सुरु होणार आहे.

ही गाडी टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०२, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०१, स्लीपर – ०६, जनरल – ०३, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण १५ एलएचबी डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.

शुभारंभ विशेष गाडीचे वेळापत्रक 

  • बोरिवली – १३.२५ (गुरुवार)
  • वसई – १४.१०
  • भिवंडी – १५.०५
  • पनवेल – १६.०७
  • रोहा – १७.३०
  • वीर – १८.००
  • चिपळूण – १९.२५
  • रत्नागिरी – २१.३५
  • कणकवली – ००.०१ (शुक्रवार)
  • सिंधुदुर्ग – ००.२०
  • सावंतवाडी – ०१.००
  • थिवी – २.००
  • करमाळी – २.३०
  • मडगाव – ०४.००

हीच गाडी वेगळ्या वेळापत्रकावर आणि २० डब्यांच्या संरचनेसह पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार वान्द्रे – मडगाव (गाडी नं १०११५) एक्सप्रेस आणि दर मंगळवार व गुरुवार मडगाव – वान्द्रे एक्सप्रेस (गाडी नं १०११६) एक्सप्रेस अशी चालविण्यात येणार आहे.

 

 

 

गोव्यातील रूळ दुहेरीकरणाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांना; गाड्या ३ ते ४ तास उशिराने

   Follow us on        
पणजी: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या उशिराने धावत असल्याची अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​(KRCL) उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा Majorda आणि कासावली Cansualim स्थानकांदरम्यानच्या मार्गाचा दुहेरी ट्रॅकच्याकामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या किमान तीन ते चार तास उशिराने धावत असून मंगळवार दिनांक ११ जून पर्यंत ही वाहतूक सूरळीत होणार आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपत असल्याने चाकरमानी वर्ग मुंबईला परतीचा प्रवासाला लागला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यात बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Konkan Railway | ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी हंगामाचे आरक्षण अखेर सुरु; मात्र फेऱ्यांमध्ये कपात

   Follow us on        

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील तीन नियमित गाडया रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत १० जून नंतर रद्द (Train  Cancelled )दाखवत होत्या. रेल्वेने या संदर्भात कोणतेही प्रसिद्ध जाहीर केले नसल्याने असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. एलटीटी मडगाव एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत रद्द दाखवत गेल्या होत्या. काही दिवसानंतरच गणेश चतुर्थीचे आरक्षण सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या गाड्या आरक्षण प्रणालीत ऍक्टिव्ह दाखवाव्यात अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे आरक्षण या प्रणालीत दाखवले आहे. मात्र पावसाळी हंगामात या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.

अधिक तपशील खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे. 
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे. 
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती 

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज: प्रागैतिहासिक काळातील रहस्ये उलगडणारी गोव्यातील कातळशिल्पे

   Follow us on        

गोवा पर्यटन :गोवा म्हंटले तर डोळ्यासमोर येतात येथील सागरी किनारे, जुनी मंदिरे आणि देशातील ईतर भागांपेक्षा येथे निर्माण झालेली एक वेगळी संस्कृती. या गोष्टींमुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र याव्यतिरिक्त गोव्यात अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे येथील पर्यटनात भर पडत आहे.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज Usgalimal Rock Engravings म्हणजे गोव्याच्या हिरव्यागार जंगलात एक लपलेले रत्न जणूच जे प्राचीन भूतकाळातील रहस्ये उलगडत आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस मुसळधार पावसाने कुशावती नदीच्या उत्तरेकडील किनारी भागाच्या जमिनीचा वरील स्तर मोकळा होऊन लॅटराइट-स्टोन ग्राउंडच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या शंभर कातळशिल्पांचा शोध लागला. ही कातळशिल्पे जवळ जवळ 20,000 ते 30,000 जुनी असल्याचे बोलले जाते. या कातळशिल्पांच्या अभ्यासाअंती प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. अशी ही दगडावर कोरलेली रहस्यमय कातळशिल्पे केवळ आपल्या पूर्वजांच्या कलात्मक क्षमतेचाच पुरावा नाही तर त्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही देतात. तुमचा जर गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा बेत असेल तर ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे स्थळ समाविष्ट करायला विसरू नका.

उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज 20,000 वर्षे जुनी आहेत आणि भारतातील सर्वात जुनी रॉक कला आहे, जी प्रागैतिहासिक काळापासून आहे. ते प्राणी, मानव, चिन्हे आणि नमुने दर्शवितात, बहुधा सुरुवातीच्या शिकारी-संकलक समुदायांनी तयार केले होते. ज्याचा उपयोग विधी आणि कथाकथनासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. साइटचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखक थेमिस्टोक्ल्स डिसिल्व्हा यांच्या म्हणण्यानुसार, कोरीव काम करण्यासाठी दगडी अवजारांचा वापर करण्यात आला होता. कोरीव काम समुदायासाठी महत्त्वपूर्ण होते, जे त्यांचे जग आणि त्यांच्या सभोवतालचे ज्ञान प्रतिबिंबित करते. दगड आणि खडकांवर अनुभवांची नोंद करण्याची ही प्रथा पूर्व-साक्षर काळात मानवी पूर्वजांमध्ये प्रचलित होती.हे कोरीवकाम ज्यांनी निर्माण केले त्या लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाबद्दल ते प्रकट करतात. प्रत्येक कोरीवकाम दीर्घकाळ गेलेल्या युगाची झलक देते, जे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या जीवनावर आणि त्यांच्या नैसर्गिक जगाशी असलेल्या खोल संबंधांवर विचार करण्यास भाग पाडत आहे. डिसिल्व्हा यांनी एका वैज्ञानिक पेपरच्या स्वरूपात केलेल्या दस्तऐवजीकरणानुसार, उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज हे कोरलेल्या प्रतिमांचे वर्गीकरण आहे ज्यात साप, बैल, कुत्रे, शेळ्या, हरीण, मोर, गरुड, मासे आणि पृथ्वी माता यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मानवी आकृत्या प्रामुख्याने पूर्वेकडे वसलेल्या आहेत. अनेक लहान प्राणी, मुख्यतः कॅप्रिड्स, खडकाळ प्लॅटफॉर्मवर विखुरलेले आहेत.

कशी भेट द्याल? 

पत्ता: 44CM+86P, Rivona VP, Goa 403704

वेळ: 24 तास उघडे

विशेष सुचना:कोरीव कामांची तोडफोड आणि इतर हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात नाही. तथापि, त्यांचे अन्वेषण करण्यास उत्सुक असलेले अभ्यागत स्थानिक पुरातत्व अधिकारी किंवा हेरिटेज संस्थांद्वारे मार्गदर्शित टूरची व्यवस्था करू शकतात. हे टूर सामान्यत: अभ्यागतांना विशिष्ट साइटवर घेऊन जातात जेथे ते प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खडकातील कोरीवकाम पाहू शकतात जे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देतात.

 

 

मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसची तिकिटे मिळता मिळेनात; डबे वाढविण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.

या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.

अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.

एसी डब्यांच्या जागी जनरल आणि स्लीपर डबे; गोवा एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल

   Follow us on        

गोवा: रेल्वे प्रशासन एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि जनरल डब्यांच्या संख्येत कपात करून त्याजागी एसी डबे जोडून सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक त्रासदायक बनवत आहे असा आरोप केला जात आहे. मात्र एका गाडीच्या एसी डब्यांत कपात करून त्या जागी सामान्य आणि सेकंड स्लीपर डबे जोडून मार्गावर प्रवास करणार्‍या सामान्य प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. गाडी क्रमांक 12779 / 12780 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत हा बदल करण्यात आला आहे. एक दोन नाही तर एसीच्या एकूण सहा डब्यांचे रूपांतर सेकंड स्लीपरच्या चार आणि सामान्य श्रेणी General च्या एकूण दोन डब्यांत कायमस्वरूपा साठी करण्यात आले आहे.

दिनांक 16 जून 2024 पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.

आताची संरचना 

फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 02 + थ्री टायर एसी – 04 + ईको. थ्री टायर एसी – 04 + स्लीपर – 02 + सामान्य – 02  + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार  – 02 असे मिळून एकूण LHB 20 डबे

 

सुधारित संरचना 

फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 01 + ईको. थ्री टायर एसी – 02 + स्लीपर – 06 + सामान्य – 04  + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार – 01 + एसलआर  –  01असे मिळून एकूण LHB 20 डबे

 

 

 

 

 

 

दुर्मिळ नाणी, जुनी भांडी आणि मौल्यवान दागिने; गोव्यात सापडला जुना खजिना

पणजी : गोव्यात एका जुन्या वास्तूतील एका तिजोरीत चक्क ५ हजार दुर्मिळ नाण्यांचा खजिना सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. पणजी येथील लेखा संचालनालयाच्या वास्तूत हा खजिना सापडला आहे. किंग व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची चित्रे असलेल्या ३३ दुर्मिळ नोटांसह मौल्यवान दागदागिनेही त्यात आढळून आले आहेत.

जुन्या सचिवालयामागील ‘फझेंडा’ इमारतीत (Fazenda building) पूर्वी लेखा संचालनालयाचे कार्यालय होते. याच ठिकाणी एका तिजोरीत दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या होता. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९९२ साली ही तिजोरी उघडण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ती उघडण्यात आली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या तिजोरीत १०० किलोपेक्षा अधिक वजनाची एकूण ५ हजार दुर्मिळ नाणी सापडली असून ही नाणी वेगवेगळ्या कालखंडातील आहे. याशिवाय ३३ दुर्मिळ नोटा आणि २.२३४ किलो सोन्याच्या वस्तू व एका पिशवीत मौल्यवान अलंकार सापडले आहेत. याशिवाय जुन्या काळात घरांत वापरले जाणारे साहित्यही सापडले आहे. यात आरतीचे ताट, पणत्या अशा अतिशय जुन्या पूजा साहित्याचाही त्यात समावेश आहे. हे साहित्य सर्व लोकांना पाहण्यासाठी गोव्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

तिजोरीत सापडल्या ‘या’ दुर्मिळ वस्तू

* ५,००० दुर्मिळ नाणी

* ३०७ तांब्याची नाणी (३.१०५ किलो)

* अरेबिक कलाकुसर असलेली ८१४ नाणी (४.७ किलो)

* १,७४६ अरेबिक नाणी (२० किलो)

* ७८७ तांब्याची नाणी (१५ किलो)

* १,०२६ तांब्याची नाणी (३८ किलो)

* १,६९५ नाणी (२२ किलो)

* क्वीन व्हिक्टोरिया आणि किंग विल्यम यांची छाप असलेली ३२० दुर्मिळ नाणी (३.४७७ किलो)

* दुर्मिळ चलनी नोटा ( ३३ नग)

* सोन्याचे तुकडे (२.२३४ किलो)

* दुर्मिळ सुवर्णालंकार (कांकण, पेंडेन्ट, सोनसाखळी, कर्णफुले, लॉकेट, ब्रेसलेटचे इत्यादींचे गाठोडे)

* घरातील दुर्मिळ भांडी आणि इतर वस्तू

कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकावर लुटमारीचा प्रकार

गोवा वार्ता : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ४ अज्ञात युवकांकडून मारहाण करत एका युवकाला लुटण्याचा प्रकार घडला. त्यानंतर एटीएममधूनही पैसे काढायला भाग पाडून त्यांना लुटले. तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात. याचाच त्रास आता प्रवाशांना होत असून प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळेला लुटमारीचा प्रकार घडला आहे. वरीर चोरीची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हे मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होम या ठिकाणी जात होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जात असताना फलाटावर कुणीही नसल्याची संधी साधून चार २० ते ३० वयोगटांतील युवकांनी त्यांना अडवले. त्यांनी मिथुन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्याने हाताच्या बुक्क्यांनी व थापटांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे ईमरजन्सी पास जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मिथुनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावत त्या पैशांसह पाठीवरील पिशवी व त्य‍ातील ६५० रुपये काढून घेतले.
वरील प्रकारानंतर मिथुन राज के. के. यांनी तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

अवघ्या सव्वा मिनिटांत दहा किलो काजू बोंडूपासून वेगळ्या; बाजारात आलेले हे नवीन यंत्र तुम्ही पहिले का?

Krishi News: बोंडू Cashew Fruit  पासून काजू वेगळे करणे तसे कंटाळवाणे काम. शेतकऱ्यांचा बराच वेळ या कामात वाया जातो. मात्र आता यावर सुद्धा उपाय आला आहे. बोंडूपासून काजू वेगळे करणारे एक यंत्र बाजारात आले आहे. या यंत्राने अवघ्या सव्वा मिनिटांत १० किलो काजू बोंडूपासून वेगळा होतो असा दावा करण्यात येत आहे. या दावा खराही आहे; कारण तसे प्रात्यक्षिक गोव्यातील वितरकाने एका व्हिडिओद्वारे दाखवले आहे.
चाके असल्याने हे यंत्र कोठेही नेता येते. हे यंत्र केरोसीन किंवा पेट्रोल या इंधने कार्यन्वित होते. नुसते काजू बोंडूपासून वेगळे होत नाही तर बोंडूपासून उप उत्पादन सुद्धा याद्वारे घेता येते.
फोंड्यातील राजेश देसाई या वितरकाने हा विडिओ बनवला आहे. आमच्या त्यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता या यंत्राची किंमत २ लाख रुपये असल्याचे समजले.  किंमत ऐकून निराश होऊ नका; कारण याच वर्षी शेतकऱ्यांना परवडणारे लहान यंत्र बाजारात येणार असलयाचे त्यांनी सांगितले.

कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल; स्लीपर डब्यांमध्ये कपात. येत्या गुरुवारपासून अंमलबजावणी

Konkan Railway News: कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची आणि गोवेकरांची पहिली पसंद असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. या गाड्यांचे २ स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत. हा बदल कायमस्वरूपासाठी करण्यात येणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १०१०४/१०१०३ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “मांडवी” एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. २०११२ /२०१११ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांत हा बदल दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवारपासून पासून अमलांत आणला जाणार आहे.

श्रेणी सध्याची संरचना सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त ) 01 01 बदल नाही
टू टियर एसी 01 01 बदल नाही
थ्री टायर एसी 04 04 बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी 00 02 02 डबे वाढवले
स्लीपर 09 07 02 डबे कमी केले
जनरल 04 04 बदल नाही
एसएलआर 01 01 बदल नाही
पेन्ट्री कार 01 01 बदल नाही
जनरेटर कार 01 01 बदल नाही
एकूण 22 LHB 22 LHB

 

कोकणातील प्रवाशांकडून नाराजीचे सूर 
या गाड्यांचे सेकंड स्लीपर डबे कमी केल्याने कोकणातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या आधी या गाडीला ११ स्लीपर डबे होते त्यानंतर ते ९ वर आणलेत. आता तर त्यातही कपात करून ७ वर आणले आहेत. याचा खूप मोठा तोटा कोकणातील सामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे. कारण त्यावरील श्रेणीचे तिकीट त्यांना परवडणारे नाही. आधीच तिकीट मिळणे खूप कठीण त्यात हे डबे कमी केल्याने अधिकच कठीण झाले आहे. 
गोवा आणि दक्षिणेकडील प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून असे बदल होत असतील तर कोकण रेल्वे नक्की कोणासाठी हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.  

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search