Category Archives: ताज्या घडामोडी

मोठी बातमी! ‘जात प्रवर्ग’ चा उल्लेख हटवून १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट मिळणार

मुंबई: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर आता महामंडळाने ही प्रवेशपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.
बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाचे म्हणणे काय होते? 
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे दिलेल्या वेळापत्रकावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्राचे नाव यासह प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख ही अयोग्य बाबा असल्याचे मन अनेकांनी नोंदवलं होतं. समाजमाध्यमांवरुनही अनेकांनी टीका केली होती.

दुःखद बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही. रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंग यांना  8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, गृहखाते अखेर कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

   Follow us on        

नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

Loading

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे शिवसेनेची पहिली यादी जाहीर.

   Follow us on        

Shivsena first list declared:शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी असून त्यात 45 उमेदवारांची नावे आहेत. उदय सामंत यांना रत्नागिरी, किरण सामंत यांना राजापूर तर दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहिल्या यादीतील उमेदवारांची नावे. 
एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी
मंजुळाताई गावित,साक्री
चंद्रकांत सोनवणे,चोपडा
गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
अमोल पाटील, एरंडोल
किशोर पाटील, पाचोरा
चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर
संजय गायकवाड, बुलढाणा
संजय रायमुलकर, मेहकर
अभिजित अडसूळ, दर्यापूर
आशिष जैस्वाल, रामटेक
नरेंद्र भोंडेकर, भंडारा
संजय राठोड, दिग्रस
बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
संतोष बांगर, कळमनुरी
अर्जुन खोतकर, जालना
अब्दुल सत्तार, सिल्लोड
प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य
संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम
विलास संदिपान भूमरे, पैठण
रमेश बोरनारे, वैजापूर
दादा भुसे, मालेगाव बाह्य
प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा
प्रकाश सुर्वे, मागाठाणे
मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व
दिलीप लांडे, चांदिवली
मंगेश कुडाळकर, कुर्ला
सदा सरवणकर, माहीम
यामिनी जाधव, भायखळा
महेंद्र थोरवे, कर्जत
महेंद्र दळवी, अलिबाग
भरतशेठ गोगावले, महाड
ज्ञानराज चौगुले, उमरगा
तानाजी सावंत, परांडा
शहाजीबापू पाटील, सांगोला
महेश शिंदे, कोरेगाव
योगेश कदम, दापोली
शंभूराज देसाई, पाटण
उदय सामंत, रत्नागिरी
किरण सामंत, राजापूर
दीपक केसरकर, सावंतवाडी
प्रकाश आबिटकर, राधानगरी
चंद्रदीप नरके, करवीर
सुहास बाबर, खानापूर

Loading

Loksabha Election 2024: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शिंदेंकडून जाहीर

Loksabha Election 2024:लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहे.

जाहीर केलेले उमेदवार

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापूर – संजय मंडलिक

शिर्डी – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

रामटेक – राजू पारवे

हातकणंगले – धैर्यशील माने

मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

 

Loading

Breaking | ओसरगाव टोलनाक्यावरील ‘वसुली’ स्थगित

सिंधुदुर्ग | मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे अखेर कोरल असोसिएट, राजस्थान या कंपनीकडून सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र ही टोल वसुली काही तांत्रिक अडचणींमुळे थांबविण्यात येत आहे अशी माहिती कोरल असोसिएट कडून देण्यात आली.

टोल वसुली करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळेच ही टोल वसुली बंद करण्यात येत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापक रोहन डांगे यांनी दिली. काही दिवसानंतर ही टोल वसुली पुन्हा सुरु करण्यात येईल. सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल मुक्ती द्यावी याबाबत कोणतीही सूचना आलेली नाही. हा निर्णय झाल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल असेही कोरल असोसिएट कडून स्पष्ट करण्यात आले.

तांत्रिक अडचणी हे जरी कारण दिले असले तरी या टोल नाक्याला होणार्‍या विरोधामुळे ही टोल वसुली बंद करण्यात आली आहे हे स्पष्ट आहे.

Loading

दोन मोठे नेते एकाच दिवशी रत्नागिरी दौर्‍यावर; बारसूतील वातावरण पुन्हा तापणार?

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे. 

तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. 

या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

 

Loading

धक्कादायक! रिफायनरीसाठी बारसूची जागा ठाकरे सरकारनेच सुचविली होती..

रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे. 

यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading

खारघर घटनेतील बळींना प्रत्येकी २० लाखांची मदत जाहीर करा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पत्रातून मागणी…

मुंबई – खारघर येथील घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असून त्यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

पत्रात ते असे म्हणतात की खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या घटनेची चौकशी केली गेली पाहिजे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केलेली मदत अगदी तुटपुंजी असून किमान प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे असे ते या पत्रात म्हणाले आहेत.

Loading

इन्सुली घाटात पुणे-पणजी शिवशाही बसला अपघात.

सिंधुदुर्ग – इन्सुली घाटीत ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोने धडक दिल्याने पुणे-पणजी प्रवास करणार्‍या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र शिवशाही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

 

दरम्यान अपघात झाल्यावर टेम्पो चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला.याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. तशी तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search