Category Archives: देश

दिल्लीत खेलरत्न पुरस्कारांचे वितरण; कोण-कोणत्या खेळाडूंना भेटला सन्मान? यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.

भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)

 

यांना अर्जुन पुरस्कार मिळाला

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

6. सलीमा टेटे (हॉकी)

7. अभिषेक (हॉकी)

8. संजय (हॉकी)

9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)

10. सुखजित सिंग (हॉकी)

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)

13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)

14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)

15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)

16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)

17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)

18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)

19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)

20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)

21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)

22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)

23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)

24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)

25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

  • सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  • दीपाली देशपांडे (शूटिंग)
  • संदीप सांगवान (हॉकी)

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
  • अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

 

 

Viral News: ४० लाख रुपये कमावणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला आली जीएसटी नोटीस…

   Follow us on        

GST Notice to Panipuri Vendor:तमिळनाडूतील पाणीपुरी दुकानदाराने ऑनलाइन पेमेंटद्वारे एका वर्षात 40 लाख रुपये कमावल्याचं समोर आलं आहे. यानंतर या दुकानदाराला जीएसटीची नोटीस मिळाली आहे. हीच नोटीस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही नोटीस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जीएसटी नियमानुसार, 40 लाख एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांने नोंदणी करणे आणि कर आकारणी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नोटीसचा फोटो अनेकांनी शेअर करत आपल्या पोस्ट केल्या आहेत. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. ही नोटीस ‘तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा’ आणि ‘केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम 70’ अंतर्गत जारी करण्यात आली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या तीन वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात मिळालेल्या मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही माहिती डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून गोळा करण्यात आली आहे. 40 लाख वार्षिक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न करता वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा मानला जातो, असेही या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

Vande Bharat Sleeper: १८० किमी प्रतितास वेग, एकूण ३ श्रेणी आणि ८२३ प्रवासी क्षमता…लवकरच सुरु होणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कशी असणार ?

   Follow us on        
Vande Bharat Sleeper: रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा उत्तम पर्याय मानला जातो. प्रवाशांच्या वाढत्या सोयीसाठी तसेच प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनची चाचणी सुरू असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
   Follow us on        
वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) हिरवा कंदील मिळताच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल. समोर आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 160 ते 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसेच एका रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली सेवा दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2025 अखेर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
   Follow us on        
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper Trains) एकूण 16 डबे असतील. यामध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच, आणि 1 फर्स्ट क्लास कोच समाविष्ट आहे. तसेच, ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवचिकतेसाठी 2 एसएलआर (स्लिपर) कोच असतील, जे लगेज आणि गार्डसाठी वापरले जातात. यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे , तसेच विविध विभागात प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करतो. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अत्याधुनिक सुविधा आणि सोयींच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
   Follow us on        
ट्रेनमध्ये (Train) एकावेळी 823 प्रवासी प्रवास करू शकतील. यात 3 टायर एसी कोचमध्ये 611 बर्थ, 2 टायर एसी कोचमध्ये 188 बर्थ, आणि फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 24 बर्थ उपलब्ध असतील. यामुळे विविध प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधांचा पुरवठा होईल. ट्रेनचे डिझाइन आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली गेली आहे. ही ट्रेन ऑस्ट्रेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवली आहे, जे अधिक मजबूती पुरवते. तसेच, क्रॅश बफर आणि कप्लर्स यांसारख्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबींवर लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे तयार करण्यात आली आहे. भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (BEML) नेही या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.
   Follow us on        

दुःखद बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही. रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंग यांना  8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

EPFO नवीन योजना; आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे

EPFO Updates: केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी (EPFO) संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा EPFO ​​३.० उपक्रमांतर्गत EPFO ​​सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्डसारखे एटीएम (ATM card) कार्ड जारी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील. ही योजना मे-जून २०२५ पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.

सध्या EPF सदस्याला पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवस वाट पाहावी लागते. हा वेळ पीएफचे सर्व पैसे काढण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे EPFO ​​ला सादर केल्यानंतर लागतो. यात अधिक वेळ वाया जातो.

सध्या पगारदार कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.

Loading

“कोकण रेल्वेला २ वंदे भारत एक्सप्रेससह एकूण ७ नव्या गाड्या दिल्यात; मात्र विलिनीकरण करण्याचे काम…… ” – केंदीय रेल्वेमंत्री

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.

कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला दिला गेला आहे  असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत सात नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत त्यात दोन वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.

”अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.

Loading

‘गुगल मॅप’ ने चुकीचा रस्ता दाखवल्याने अपघात होऊन तिघांचा मृत्यू

   Follow us on        
नवीन ठिकाणी वाहनाने प्रवास करायचा असल्यास आपण सरार्स पणे गुगल मॅपचा वापर करतो. या आधुनिक सुविधेमुळे निश्चित स्थळी पोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग गुगल मॅप आपल्याला दाखवते आणि आपला प्रवास जलद आणि सोयीचा होतो. मात्र या आधुनिक सुविधेवर १००% विश्वास दाखवणेही जीवघातक ठरू शकते. असे केल्याने उत्तरप्रदेशातील बरेली येथे अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
उत्तरप्रदेशातील बरेली येथे तिघेजण एक लग्नसमारंभ आटोपून घरी जायला निघाले होते. मार्ग समजण्यासाठी त्यांनी गुगल मॅप सुरु केला होता. मात्र या मॅप च्या दिशादर्शकाने त्यांना खल्लपुर-दातागंज येथे एका पुलाकडे जाणारा रस्ता दाखवला. मात्र हा पूल निर्माणाधीन असल्याने अपुरा होता. गाडी वेगाने असल्याने अंतिम क्षणी तिला नियंत्रित करणे शक्य झाले आणि गाडी पुलावरून खाली पडून मोठा अपघात झाला ज्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Loading

सामान्य प्रवाशांना दिलासा! नोव्हेंबर अखेरपर्यंत जनरल डब्यांतून १ लाख प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेची तजवीज

Indian Raiwlays: रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्य जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन रेल्वेने काही निर्णय घेऊन त्यांची अंबलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे.  त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये साधारण श्रेणीचे (GS) सुमारे 600 नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. हे सर्व डबे नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. तर नोव्हेंबर 2024 अखेपर्यंत , सुमारे 370 नियमित गाड्यांमध्ये GS श्रेणीचे असे एक हजाराहून अधिक डबे जोडले जातील असे भारतीय रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन GS डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. याशिवाय येत्या दोन वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नॉन-एसी क्लासचे डबे समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे बोर्डाने सामान्य वर्गातील रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधांची सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे बोर्डचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रचार) श्री दिलीप कुमार म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवासी हे रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. भारतीय रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी विविध दिशेने काम करत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत एकूण 1000 नवीन GS डबे गाड्यांना जोडले जातील. तसेच, हे नव्याने बांधलेले डबे 370 नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. दररोज हजारो अतिरिक्त प्रवासी याचा लाभ घेत आहेत. या डब्यांच्या समावेशामुळे दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार आहे.
कार्यकारी संचालक (I&P) म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन नवीन GS कोच बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत अशा 10 हजारांहून अधिक नॉन-एसी जनरल क्लासचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात जोडले जातील. यातील सहा हजारांहून अधिक जीएस कोच असतील, तर उर्वरित डबे स्लीपर क्लासचे असतील. एवढ्या मोठ्या संख्येने नॉन एसी डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील. हे सर्व नव्याने बांधलेले नॉन एसी कोच एलएचबी प्रकारचे असतील. प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासोबतच तो सुरक्षित आणि जलद होण्यासही मदत होईल. पारंपारिक ICF रेल्वे कोचच्या तुलनेत, हे नवीन LHB डबे तुलनेने हलके आणि मजबूत आहेत. अपघात झाल्यास या डब्यांचे नुकसानही अत्यल्प असेल.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले की, CR 42 गाड्यांमध्ये अतिरिक्त 90 GS कोच जोडण्यासाठी सज्ज आहे ज्यामुळे दररोज 90,000 हून अधिक प्रवाशांना फायदा होईल. प्रवाशांची वाढती मागणी पाहता यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फरक पडेल.

Loading

Viral Video: रेल्वे पूल उपलब्ध असताना प्रवाशांचा जीवाशी खेळ

Viral Video: रेल्वे प्रशासन अपुऱ्या सोयी देते त्यामुळे अपघात होत असतात असे आरोप सर्रासपणे प्रशासनावर होताना दिसतात. मात्र ज्या सोयी दिल्या आहेत तिचा पूर्णपणे वापर न करता जुन्या सवयींमुळे एखादा अपघात झाला तर दोष कुणाचा?
सध्या सोशल मीडियावर एक विडिओ मोठ्याप्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना दिसत आहेत. रुळावर एक गाडी उभी आहे तिच्या खालून मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून रूळ ओलांडले जात आहे. हे खरोखर खुप धोकादायक आहे. रुळावर उभी असलेली गाडी कधीही चालू होऊ शकते आणि येथे मोठा अपघात होऊ शकतो.
जेथून रूळ ओलांडला जात आहे त्याच्या अगदी जवळच दोन्ही बाजुंना जाण्यासाठी एक पूल आहे. तरीपण प्रवासी त्याचा वापर न करता धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडत आहेत. हा विडिओ दक्षिणेकडील राज्यातील एका स्थानकावरील आहे. मात्र अशीच परिस्थिती देशातील अनेक स्थानकांवर दिसून येते. फक्त जरासा त्रास आणि वेळ वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.

Loading

जनरल आणि स्लीपर कोचेस डब्यांची कमतरता ठरत आहे धोकादायक

   Follow us on        

संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.

वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.

या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.

रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.

रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search