Category Archives: महाराष्ट्र
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे आणि त्यांचा सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता भाताण बोगद्या जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
सरकारच्या मराठा आरक्षण संबंधित आजच्या सभेच्या उपस्थितीसाठी ते मुंबई येथे येत असताना हा अपघात घडला आहे. त्यांचा मुलगा गाडी चालवत होता तो किरकोळ जखमी झाल्याचे समजते आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा पार पाडला आहे,त्यात शिंदे गटातील 9 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. पण ह्या वाटपावरून शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याचे पहावयास मिळाले. काहीजणांनी तर आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली तर काहीजणांनी ती आपल्या कृतीमधून दाखवून दिली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढविणारी एक घटना समोर आली आहे.
शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केली होती त्यामध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक विडिओ पोस्ट करून ‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब…’ असे ट्विट केले आहे.
त्यांच्या ह्यांच्या ट्विट मुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते पुन्हा शिवसेनेत जाणार आहेत अशा चर्चा होवू लागल्या आहेत.
दरम्यान, ह्यासंबधी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते त्यांनी सारवासारवीची उत्तरे दिल्याचेही समजते. आधी ते म्हणाले की माननीय उद्धव ठाकरे यांचे स्थान हे आमच्यासाठी कुटुंबप्रमुखाचेच आहे असे समजते. ह्या ट्विटचा वेगळा अर्थ घेवू नये असे ते म्हणाले. त्यानंतर काहीच वेळात त्यांनी ही ट्विट डिलीट केली आणि आपल्याकडून ही ट्विट चुकून पोस्ट झाली असे ते म्हणाले. आपला राजकारणातील 38 वर्षाचा अनुभव आणि मताधिक्य पाहता मला मंत्रिपद मिळायला हवे होते. तसा शब्दही दिला गेला होता असे बोलून त्यांनी आपली नाराजी स्पष्ट बोलून दाखवली.
कदाचित मी मंत्रिपदासाठी पात्र नसेन म्हणुन मला मंत्रिपद दिले नसेल, पुढे कधितरी त्यांना मी पात्र झाली असे वाटेल तेव्हा ते मला मंत्रिपदा देतील अशा शब्दात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना मंत्रिपद का दिले नाही ह्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाल्या आहेत. त्यांच्या ह्या वक्तव्यातून त्यांची नाराजी व्यक्त होत असून त्यासंबंधी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांना मुद्दाम डावलले जात आहे असे भाजपवर आरोप केले आहेत. एकंदर माजी भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जवळील नेत्यांना आताच्या भाजपा नेत्यांकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पंकजा मुंडे ह्या ओबीसी आहेत आणि त्यांना डावलून त्यांनी ओबीसी समाजावर पण अन्याय केला आहे असेही आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केलेत.
एकनाथ खडसे ह्यांच्या ह्या विधानावर प्रत्युत्तर देताना भाजपचे नवनिर्वाचित मंत्री गिरीश महाजन म्हणाले की भाजपने ओबीसी समजाला न्याय दिला आहे. मी स्वतः ओबीसी आहे तसेच जिल्हय़ाचे बघायचे तर मंत्रिपदाची शपथ घेतलेले गुलाबराव पाटील पण ओबीसी आहेत. पंकजा मुंडे संबंधी बोलायचे झाले तर त्यांना लवकरच एक मोठी जबाबदारी मिळणार असे सूचक विधान केले आहे.
सावंतवाडी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या मतदारसंघात जाहीर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ ह्याबद्दल त्यांनी आजून काही सांगितले नाही आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून चालत आलेल्या महाराष्ट्र राज्यातील सत्ता राज्य नाट्यामध्ये दीपक केसरकर यांचा रोल महत्वाचा राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ह्या गटाची एक महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आहे.
दीपक केसरकर हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा मतदारसंघात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही सभा किंवा शक्तिप्रदर्शन केले नव्हते. ह्याच दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा झाली होती. ह्या सर्व गोष्टींमुळे दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघातील शक्ति कमी झाल्याची विधाने त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणुन हा जाहीर मेळावा म्हणजे एक प्रकारचे शक्ति प्रदर्शन असेल असे बोलण्यात येत आहे.
शिंदेगट सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते. आता दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळाले आहे. ह्या सर्वाचा फायदा मतदारसंघात विकास कामांसाठी होईल अशी आशा आहे असे बोलले जात आहे.
Related news – सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभे राहणार – मुख्यमंत्री
ठाणे:भाजप मित्रपक्षांना कधी संपवण्याच्या प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रचे उदाहरण पाहता आमचे संख्याबळ जास्त असताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. कालच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांच्या 9/9 नेत्यांनी मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या. बिहारचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर आमचे संख्याबळ जास्त असताना JDU ह्या आमच्या मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद दिले. असे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ”भाजप मित्रपक्षांना संपवते” ह्या विधानावर उत्तर दिले आहे. लोकमत च्या ठाण्यातील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार असेही बोलले होते की आपण जेव्हा कॉंग्रेस सोडली आणि नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह घेतले, पण शिंदे गट ह्या विरुद्ध करत आहे.
ह्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली तेव्हा कायदे आज आहेत तसे नाही होते. पक्षांतरबंदी कायद्या मध्ये बदल करण्यात आला आहे, त्यामुळे शिवसेनेला ही कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. शरद पवारांनी ह्या दोन्ही घटनेचे एका तराजूत तुलना करू नये.
शरद पवारांचे दुखणे जरा वेगळे आहे ते सर्वाना माहीत आहे असा खोचक टोला पण त्यांनी मारला.











