Category Archives: महाराष्ट्र

मुंब्रा माफीनामा प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल

   Follow us on        

ठाणे: मराठीची मागणी केली म्हणून तेथील जमावाने मराठी मुलाला माफी मागायला लावली आणि हा माफीचा विडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. या प्रकरणाची मुंब्रा पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी दोषींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट 

मुंब्रा येथे घडलेल्या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काल शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देवून त्या जमावातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

मुंब्रा पोलिसांनी जाहीर केलेली प्रेसनोट

मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०२/०१/२०२५ रोजी रोजी १५:३० वा.सु कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोर कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे एक मराठी युवक फळ विक्रेताकडुन फळे विकत घेताना फळविक्रेता यास मराठीत बोलण्याची विनंती केली असता फळविकत्याने मराठी युवकासोबत हुज्जत घातली होती. सदरवेळी फळ विक्रेता याने एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली तसेब सदर जमलेल्या गर्दीतील लोकांनी मराठी युवकास घेराव करून त्यास कान पकडुन माफी मागण्यास सांगीतली व सदरवेळी त्याचा हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.

सदरचा हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने तसेच विविध न्युज चॅनेलवर प्रसारीत झाल्याने मराठी व हिंदी भाषीक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदरचा व्हिडीओ मुंब्रा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी नमुद प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेवुन सदर फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेब २० ते २५ अनोळखी इसम यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३)१३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३(२), ३५१ (२) (३), ३५२, १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपीत यांची ओळख पटवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द सदर गुन्हयावे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यावी तजविज ठेवण्यात आली आहे.

नमुद गुन्हयाच्या तपास मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर वव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि / लोंढे हे करीत आहेत.

MSRTC: आपली एसटी बस वेळेवर येणार की उशिरा? आता समजेल फक्त एका क्लिकवर..

   Follow us on        

पुणे: प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी आता अपग्रेड होत आहे. आता राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही यंत्रणा विकसित करण्यात आली असून, प्रणालीची यशस्वी चाचणीही नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे. या सुविधेमुळे ‘एसटी’चा ठावठिकाणा प्रवाशांना आता एका क्लिकवर पाहता येणार आहे

‘एसटी’महामंडळातर्फे प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर बसची माहिती सहज समजण्यासाठी समजण्यासाठी ऑनलाईन ‘व्हीटीएस’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सद्यास्थितीला एसटी महामंडळातील १६ हजारांहून अधिक नव्या-जुन्या बसमध्ये ‘व्हीटीएस’ ही आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेची विविध पातळ्यांवर चाचण्या करण्यात आल्या. यातून समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. अॅप विकसित करण्याचेही काम सुरू आहे

जशी रेल्वे प्रवाशांना नियोजित गाडी सध्या कुठे आहे, हे तातडीने कळते. त्याचप्रमाणे आता आरक्षण केलेल्या किंवा अपेक्षित बसची माहिती कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे किंवा नाही, किती विलंब होणार आहे, याची माहिती एका क्लिकवर समजणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात; तिघांचा मृत्यू

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. त्यांना महाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ जीप वीर स्थानकाजवळ बंद पडली होती. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते. यावेळी मागून आलेल्या भरधाव टोईंग व्हॅनने बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यात गाडी शेजारी असलेले सहा जण गंभीर जखमी झाले.

टोईंग व्हँनची धडक इतकी जोरात होती, की स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे, साहिल शेलार (वय वर्ष २५) आणि प्रसाद नातेकर (वय वर्ष२५) सर्व रहाणार कुंभार आळी, महाड यांचा मृत्यू झाला. तर समिप मिंडे (वय वर्ष ३५) रहाणार दासगाव, सुरज नलावडे (वय वर्ष ३४) रहाणार चांभार खिंड आणि शुभम माटल (वय वर्ष २६) शिरगाव हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, तसेच स्थानिक बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी जखमींना महाड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर एकाच वेळी २० हून अधिक वाहने पंक्चर; कारण काय?

   Follow us on        

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम येथे रविवारी २० हून अधिक वाहने टायर पंक्चर झाल्याने बंद पडली. काही समाजकंटक समृद्धी महामार्गावर खिळे टाकून वाहने पंक्चर करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने होत होता. मात्र, हा आरोप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) फेटाळून लावला आहे. समृद्धी महामार्गावर कोणीही खिळे टाकलेले नाही. समृद्धी महामार्गावर वाशिम येथे रविवारी रात्री एक अतिशय वजनदार पत्रा पडला होता. या लोखंडी पत्र्यावरून वाहने गेल्यामुळे टायर पंक्चर झाल्याचे उघडकीस आले आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर-इगतपुरी प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र, त्याच वेळी वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशिम येथे समृद्धी महामार्गावर रविवारी रात्री वाहने बंद पडण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच २० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याचे निदर्शनास आले. ही सर्व वाहने महामार्गाच्या एका बाजूला लावण्यात आली. यासंबंधीची माहिती मिळताच संंबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाशिममधील पॅकेज ५ मधील साखळी क्रमांक २२२/५२० येथे ही घटना घडली. येथून जाणाऱ्या एका ट्रकमधील वजनदार लोखंडी पत्रा येथे पडला होता. त्यावरून गेलेली वाहने पंक्चर झाल्याचे निष्षन्न झाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्तारोधक उभारून घटनास्थळाचा भाग वाहतुकीसाठी बंद केला. त्यानंतर मालेगाव पथकर नाक्यावरून क्रेन मागवून पत्रा हटविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली. टायर पंक्चर झालेल्या वाहनांचे वाहनचालक आणि प्रवाशांसाठी खाण्यापिण्याची सोय करून त्यांना सुरक्षित ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला बसविण्यात आले. तसेच, वाहनांची योग्य ती दुरुस्ती करून देण्यात आली.

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

Per Capita Income: राज्यात कोकणच ‘श्रीमंत’

   Follow us on        
Per Capita Income: दरडोई उत्पन्नात कोकण विभागाने नेहमीप्रमाणे आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. २०२३-२४ वर्षाच्या आर्थिक सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
कोकण प्रदेशात सर्वाधिक दरडोई उत्पन्न ३,६४,६६८ रुपये एवढे आहे, जे इतर प्रदेशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांच्या समावेशामुळे या भागात दरडोई उत्त्पन्न जास्त आहे.
तर पुणे २,७७,४५३ रुपये दरडोई उत्पनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नागपूर विभाग २,२५,७५५ रुपये दरडोई उत्पन्नासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही दोन्ही महाराष्ट्रातील प्रमुख नागरी आणि औद्योगिक केंद्रे आहेत.
महाराष्ट्रातील प्रदेशांमध्ये लक्षणीय आर्थिक असमानता आहे. पश्चिमी प्रदेश (कोकण, पुणे) साधारणपणे जास्त उत्पन्न दाखवतात नाशिकचे  दरडोई उत्पन्न १,९७,२२७ रुपये ईतके आहे तर अमरावती विभागातील दरडोई उत्पन्न  तुलनेने कमी म्हणजे १,४५,९१७ रुपये आहे. संभाजीनगर १,७३,५३३ रुपये उत्पन्नासह मध्यम श्रेणीत आहे.

कोकण विभागात जास्त दरडोई उत्पन्न दाखवत असले तरी येथेही जिल्ह्या जिल्ह्यांत मोठी असमानता आहे. मुंबई आणि मुंबईला चिटकून असलेले जिल्ह्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र जस जसे तळकोकणच्या दिशेने जायला लागलो तर हा विकास कमी कमी होत झालेला लक्षात येतो.

Ladki Bahin Yojana : खुशखबर ,लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात

   Follow us on        

Ladki Bahin Yojana Installment: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

किती महिलांना मिळणार लाभ मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.

नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनांचे आणि बंगल्यांचे वाटप.. कोणाला कुठला बंगला? यादी वाचा….

 

   Follow us on        

मुंबई : फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याबरोबर दालनांचे वाटपही लगोलग करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालने नेमून दिली आहेत.

फडणवीस सरकारचा १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्र्यांना खालीलप्रमाणे कार्यालयीन वाटप करण्यात आले आहे.

कुणाला कुठला बंगला

 

Loading

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर, गृहखाते अखेर कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी

   Follow us on        

नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह

अजित पवार – अर्थ

एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गणेश नाईक – वन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा

दादा भुसे – शालेय शिक्षण

गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

संजय राठोड – मृद व जलसंधारण

धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

माणिकराव कोकाटे – कृषी

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – कापड

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण

Loading

Mumbai Breaking News: मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी बोट समुद्रात उलटली!

   Follow us on        

Mumbai Boat Collapse Incident : मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथून एलिफंटा लेण्यांकडे निघालेली निलकमल बोट खोल समुद्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडलीय. नौदलाच्या स्पीड बोटीने नीलकमल बोटीला थेट धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. बोटीत एकूण 100 हून अधिक पर्यटक प्रवास करत होतो. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तर 101 जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. मृतांमध्ये तीन नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असून इतर 10 जण नीलकमल बोटीतील प्रवासी असल्याचं समजते. तर मृतांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून प्रवाशांनी भरगच्च भरलेली बोट एलिफंटाला निघाली होती. बोट एलिफंटाच्या दिशेनं जात असताना भारतीय नौदलाची एक स्पीड बोट समुद्रात सुसाट फेऱ्या मारत होती. ही बोट समुद्रातून वेगाने जात असताना पुन्हा यु टर्न घेऊन मागच्या दिशेने आली. त्याचदरम्यान समुद्रात प्रवास करत असलेल्या या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली आणि हे भयानक दृष्य कॅमेरात कैद झाले.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search