Category Archives: रत्नागिरी

रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा | जिल्ह्यातील शाळा आज दिनांक २६ जुलै रोजी बंद राहणार

रत्नागिरी : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यत वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना आज बुधवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आज दिनांक २६ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी आज २६ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बारसू येथील कातळशिल्पांचे संवर्धन की रिफायनरी? आता दोन्हीही शक्य; सरकारने काढला ‘हा’ तोडगा…

मुंबई :  बारसू येथे रिफायनरी झाल्यास येथील कातळशिल्पांचे अस्तित्व धोक्यात येईल हा मुद्दा धरून रिफायनरीला मोठा विरोध केला होता. मात्र सरकारने यावर तोडगा काढल्याचे दिसत आहे. या रिफायनरीकातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि मनिषा कायंदे यांनी लेखी प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. त्यावरून सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तर दिले आहे.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, “रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे.”बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाची आशा निर्माण झाली. मात्र, आता प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे बारसूच्या सड्यावरील अनेक कातळशिल्पे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, “रत्नागिरी जिल्ह्यातील ७, सिंधुदुर्गातील १ आणि गोव्यातील ९ ठिकाणची कातळशिल्पे यूनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये बारसूच्या ३ कातळशिल्पांचाही समावेश आहे.”
“पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाने बारसू येथील गावात केलेल्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणात ६२ कातळशिल्पांची बारसूच्या सड्यावर नोंद केलेली आहे. त्यामुळे या कातळशिल्पाच्या संवर्धनासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनातून बारसू येथील कातळशिल्पे असलेली जमीन वगळण्यात येणार आहे”, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. म्हणजेच, कातळशिल्पे असलेली जमीन वगळून उर्वरित जागांचे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.तसंच, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ ठिकाणच्या कातळशिल्पांचे जतन, संवर्धनाचे काम निविदास्तरावर असल्याचीही माहिती, सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Parshuram Ghat : एक लेन वाहतुकीसाठी खुली मात्र अपघाताचा धोका कायम

Mumbai Goa Highway News :परशुराम घाटातील एक लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या पावसातही हा घाट धोकादायक ठरण्याची चिन्ह पहिल्याच पावसात दिसू लागली आहेत.

रत्नागिरी जिल्हय़ात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला होता. मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे दगड महामार्गावर काल शनिवारी २४ जून रोजी खाली कोसळले होते. सुदैवाने एक गाडी याच्यातून बचावल्याची माहिती परशुराम घाट येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटातून गाडी चालवताना वाहकांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

या धोक्याबरोबरच या परिसरातील ६० ते ७० घरांना दरडीचा धोका कायम आहे. दरम्यान, या ठिकाणी चिपळूण पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शनिवारी घटनास्थळी परिसराला भेट दिली. यावेळी, घाटात सुरक्षेचा उपाय म्हणून सगळ्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सूचना सबंधित कंपनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Konkan Railway | बुधवारी रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान रेल्वेचा ब्लॉक; तुतारी सह ‘या’ गाड्यांवर परिणाम…

Konkan Railway News : पुढील दोन दिवसांत कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी दिनांक 21/06/2023 रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

या गाड्या खालीलप्रमाणे 

1) गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा 21/06/2023 रोजी सुरू होणारा प्रवास रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियंत्रित केला जाईल.

2) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल.

3) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा  एक्सप्रेस सावंतवाडी – कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल 

 

Barsu Refinery | आंदोलन पुन्हा पेटणार; आंदोलकांचा थेट विधानभवनावर मोर्चा काढण्याचा बेत

Barsu Refinery | बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीला होणारे  आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. येत्या  २० जुलैला विधान भवनावर मोर्चा काढण्याची योजना बारसू रिफायनरी विरोधी समितीने आखली आहे . यासंबंधी समितीचे एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली आहे. या समितीबरोबर राज्यातील आणि देशातील काही संघटना देखील या मोर्चात सामील होणार आहेत. या मोर्चाला १ लाखापेक्षा  जास्त विरोधक एकत्र जमवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असताना या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 
असा असणार हा मोर्चा
दिनांक २० जुलै रोजी राणीची बाग ते आझाद मैदान या दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर विधानभवनावर कूच करून सरकारला अल्टिमेटम देण्यात येणार आहे असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे. 
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला पर्यावरण घातक प्रकल्प म्हणून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हा विरोध झुगारून येथे माती परीक्षण करण्यात आले असून सरकारतर्फे आपली मनमानी करताना दिसत आहे, मात्र ‘एकाच जिद्द; रिफायनरी रद्द’ या घोषवाक्याखाली समितीने आंदोलन घडले असून जोपर्यत रिफायनरी रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील अशी समितीची भूमिका आहे. 

धक्कादायक | दापोली पालगडमध्ये 20 गावठी बॉम्ब सापडले..

रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे  20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. 

याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.

बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय? 

या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. 

मंडणगड पालवणी गोसावीवाडी येथिल नवनाथ मंदिरात भंडारा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

मंडणगड, प्रतिनीधी:-गणेश नवगरे | रविवार दिनांक ११.०६.२०२३ रोजी पालवणी गोसावीवाडी येथिल नवनाथ मंदिर मध्ये नवनाथांची पुजा आरथी व दरवर्षा प्रमाणे या वर्षिही भंडारा साजरा करण्यात आला. दरवर्षी मृग नक्षत्रात एका रविवारी भंडारा घालण्यात येतो. यासाठी गावातील नाथभक्तगण मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. ह्या भंडाऱ्याचे निमित्ताने तेंडुलकर कुटुंबियांनी नाथ महाराजांकडे इच्छा दर्शवली होती त्याची परतफेड म्हणुन चांदीची नाग मूर्ती नाथ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली. भंडाऱ्याचे निमित्ताने महाराजांना गोडाचे नैवेद्य दाखवले जाते.
त्याचप्रमाणे नाथांच्या भंडाऱ्या सोबत बाजूला असलेल्या काळकाईमाता मंदिर मध्ये देवीला राखण सुद्धा दिली जाते. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की भंडारा म्हणजे राखणं चे तिखट जेवण. पण असे नाही.

सदरील कार्यक्रमासाठी महिला पुरुष लहान मुले दरवर्षी उपस्थित राहतात. आपण सर्व सुखी समाधानी राहावे. सर्व संकटे दूर जाओ. यासाठी प्रार्थना म्हणून देवाला विनवणी यामाध्यमातून केली जाते.

आमचा आंबा पण ‘हापूसच’ | कर्नाटकातील आंबा उत्पादकांचा दावा; जीआय मानांकनासाठी अर्ज दाखल..

Alphanso GI Tag | कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसाठी २००८ मध्ये विविध पाच संस्थांनी ‘अलफॉन्सो’ (हापूस) या इंग्रजी नावाने भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविला आहे. त्यामुळे इतर भागातील आंबा हापूस किंवा अलफॉन्सो या नावाने विकण्याच्या प्रयत्न झाल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरणार आहे. मात्र आपल्या भागात पिकणाऱ्या आंब्यांना पण हापूस म्हणुन ओळख मिळावी म्हणुन काही भागातील आंबा उत्पादक पुढे आले आहेत.

कोकणातील हापूस आंब्याची महाराष्ट्राच्या विविध प्रांताबरोबरच देशाच्या आणि परदेशात व्यावसायिक लागवड करण्यात आली होती. त्यामुळे या लागवडीतून उत्पादित होणारा आंबा हापूस आहे असा दावा आता त्या त्या भागातील आंबा उत्पादकांकडून होऊ लागला आहे. यामध्ये कर्नाटक हापूस, पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील गावरान हापूस आणि जुन्नर हापूस तर दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात उत्पादित होणारा मालावी हापूस यांचा समावेश आहे. या भागातील उत्पादकांनी आपल्या भागातील आंबा हापूसच असल्याचा दावा केला आहे. तसेच ‘हापूस’ म्हणुन भौगोलिक निर्देशांक Geographical Indication मिळविण्यासाठी अर्ज पण केले गेले आहेत. 

जीआय मानांकनासाठी होणार्‍या दाव्या बद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केलीत. 

ॲड. गणेश हिंगमिरे, भौगोलिक निर्देशांक तज्ज्ञ म्हणतात की ज्या भागाच्या नावाने त्या भागातील पदार्थ, वस्तूची चव आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. जसे पुणेरी – पगडी, वाडा – कोलम, कोल्हापुरी – चप्पल आहे. प्रत्येक भागाच्या भौगोलिक आणि वातावरणानुसार त्या भागातील शेती उत्पादनांना चव, गंध, रंग आणि आकार असतो. त्यामुळे त्या त्या भागासाठी स्वतंत्र ‘जीआय’असू शकतो. त्यामुळे विविध भागात उत्पादित होणाऱ्या हापूस आंब्याला केवळ हापूस या नावाने जीआय मिळू शकतो. तसा प्रयत्न जुन्नरच्या शेतकऱ्यांनी सुरु केला आहे. या आंब्याचा इतिहास आणि वेगळेपण सिद्ध झाल्यास त्याची जीआय नोंद विचाराधीन होऊ शकते.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्री सहकारी संस्था, रत्नागिरी या संस्थेचे विवेक भिडे यांच्या मते एकदा एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील उत्पादनासाठी जीआय घेतले तर ते दुसऱ्या भागासाठी घेता येत नाही. कारण त्या भूभागावरील शेतकऱ्यांची मालकी त्या नावाची झाली आहे. यानुसार हापूस नाव आता कोकण वगळता इतर भागातील हापूस उत्पादनांना घेता येणार नाही. बासमती तांदळाच्या बाबतीतही हा वाद सुरु आहे. टेक्सास येथील बासमतीला टेक्समती असा जीआय घ्यावा लागला आहे.

  आता जीआय मानांकन नक्की कोणाकोणाला मिळणार की हापूस न्यायालयीन लढाईत अडकणार, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष आहे.

 

बारसू येथील कातळशिल्पांची नामांकित संशोधक व अभ्यासकांद्वारे आज पाहणी..

रत्नागिरी | प्रस्तावित रिफायनरी साठी होणार्‍या विरोधासाठी चर्चेत आलेल्या बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक आज दिनांक 13 जून ला पहाणी करणार आहेत. ही पाहणी आज सकाळी 10 वाजता होणार असून या संशोधकांमध्ये डॉ. पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, डॉ. प्रबिन सुकुमारन आणि अभ्यासकांमध्ये सुधीर रिसबुड, सतीश ललित आदींचा समावेश असेल.तसेच खासदार विनायक राऊत येथील स्थानिक ग्रामस्थांसोबत सहभागी होणार आहेत.

बारसूच्या सडय़ावर असलेली काही कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू ते देवाचे गोठणे येथील सडय़ावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभांनी तसे ठरावही केले आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी ग्रामस्थ करत आहेत.

गणपतीपुळे | अजूनही धोक्याची परिस्थिती कायम; पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर बंदी

रत्नागिरी |तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने समुद्रकिनाऱ्या वरील स्थानिक व्यावसायिकांना तसेच पर्यटकांना फटका बसला सुमारे १० ते १२ पर्यटक लाटेच्या जोरदार तडाख्याने किरकोळ जखमी झाले होते.

सोमवारी देखील समुद्राच्या उधाणाचा जोर कायम होता , त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन गणपतीपुळे आज सोमवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण मोठा दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्रावर जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच अजून दोन दिवस तरी समुद्रावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली जाणार आहे, असे गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलीस सांगण्यात आले आहे.

रविवारी समुद्राला मोठे उधाण येवून मोठ्या लाटा निर्माण होऊन येथील किनारपट्टीवर धडकल्याने येथील व्यावसायिकांचे पण नुकसान झाले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील नुकसानीची पाहणी करून 49 व्यावसायिकांना नुकसान भरपाई दिली जाईल असे जाहीर केले आहे. 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search