Category Archives: रत्नागिरी

Mumbai-Goa Highway | पावसाळ्यात परशूराम घाटातील वाहतुक धोकादायक बनण्याची शक्यता

खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही व्यक्त केली भीती


Mumbai-Goa Highway |परशुराम घाटातील चौपदरीकरण करण्यासाठी केले जात असलेले डोंगर कटाईचे काम अजून अपूर्ण आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी पावसाळ्यापूर्वी येथील काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या घाटातील वाहतूक पावसाळ्यात हे काम चालू असेपर्यंत धोकादायक बनून येथे दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनीही अशी भीती व्यक्त केली आहे.

डोंगर कटाईचे काम चालू असल्याने येथील काही भाग धोकादायक बनून पहिल्या पावसात केव्हाही दरड कोसळू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कंत्राटदार कंपनीस येथील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काम जलद गतीने होण्यासाठी मध्ये घाट काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र डोंगर कटाई करताना मध्येच कठीण कातळ लागले होते. पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीमुळे सुरक्षिततेच्या कारणाने या कातळ भागात सुरुंग लावण्याची परवानगी पण नाकारली गेली होती. यामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे दिलेल्या अवधीत हे काम पूर्ण झाले नाही.

पावसाळ्यात काम चालू असताना सावधानता म्हणुन कंत्राटदार कंपनीला योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात येतील. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यातही वाहनधारकांसह प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊनच घाटातून प्रवास करावा लागणार आहे असे दिसत आहे.

शेतमाल तारण योजना; काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी योजना

रत्नागिरी : ऐन हंगामात कोणतेही कृषी उत्पादन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात बाजारात आल्यास दर कोसळतात, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. पैशाची निकड असल्याने कमी बाजारभावात उत्पादन विकून त्याला मोठा होतो. यावर उपाय म्हणून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती Ratnagiri District Agricultural Produce Market Committee व महाराष्ट्र कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्तपणे दर वर्षी जिल्ह्यात काजू बी Cashew Nut Mortgage Scheme शेतमाल तारण योजना राबवित असते.

ज्या शेतकऱ्यांना पडलेल्या भावात काजू न विकता तारण ठेवायचे आहेत त्यांना हे काजू तारण ठेवून वार्षिक सहा टक्के व्याजदराने कर्ज बाजारभावाच्या कमाल ७५ टक्के रक्कम तारण कर्ज दिले जाते. यासाठी कालमर्यादा सहा महिने (१८० दिवस) एवढी आहे. शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पीक नोंदणीचा सातबारा, आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील जोडणे अनिवार्य आहे. तसेच काजू बीची आर्द्रता ५ टक्के असणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत १७.५ टन काजू बी तारण ठेवण्यात आला असून, १३ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.

सध्या ९० रुपये दर सुरू आहे. पावसाळा तोंडावर असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता आहे. अशावेळी शेतमाल तारण योजना फायदेशीर ठरते. हंगामाच्या प्रारंभी काजूला चांगला दर मिळतो; मात्र जसजशी आवक वाढते, तसेतसे भाव गडगडतात. आता तर हंगाम संपत आला आहे. त्यामुळे दरात घसरण सुरू झाली आहे. आधीच उत्पादन कमी आहे. त्यातच काजू कमी किमतीत विकणे परवडणारे नाही. त्याऐवजी तारण ठेवणे शक्यआहे

बारसू सडा पुन्हा गजबजला; घालण्यात आले सरकारच ‘तेरावं’; मुंडण करून पिंडदानही केले

रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.

ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.

सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे. 

NH-66 | परशुराम घाटातील तो अवघड ‘कातळ’ अडथळा अखेर पार

Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात कठीण कातळभाग लागल्याने या भागातील चौपदरीकरणाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र आता कठीण कातळाचा बहुतांश भाग फोडण्यात अखेर यश आले आहे. 
खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. या कठीण कातळभागामुळे मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा कातळभाग फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची परवानगी कंत्राटदार कंपनीने शासनाकडे मागितली होती. मात्र सुरक्षिततेच्या कारणाने त्याला परवानगी नाकारली होती.आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू केली जाणार असे आश्वासन देण्यात आले आहे. 

हापूस आंब्याची आवक वाढली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. 

वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. 

मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे. 

 

 

बारसू परिसरातील मातीचे नमुने घेण्याचे काम पूर्ण; प्रकल्प विरोधकांचे मनाई आदेश रद्द

राजापूर, ता. १५: रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश रद्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. 
बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.जमीन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते त्याला विरोध होऊ लागला होता. प्रशासकीय कार्यवाहीत आंदोलनकर्त्यांकडून अडथळे आणले जात होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये मनाई आदेश काढले होते. त्यामध्ये काही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. बारसू परिसरातील पाणी नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी ऊर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुंडू पाटील (रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्नील सीताराम सोगम (रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण (रा. राम आंनदनगर, हाउसिंग सोसायटी, दहिसर पूर्व-मुंबई) यांचा समावेश आहे. या संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

रत्नागिरी येथे उभारले जाणार कोल्ड स्टोरेज प्लांट

रत्नागिरी – महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला आहे . या कराराअंतर्गत कोकण रेल्वेच्या रत्नागिरीस्थित प्रस्तावित कोल्ड स्टोरेज प्लांटची (Cold Storage Plant) उभारणी करण्यासाठी तसेच इतर प्रकल्पांवरही संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. या कोल्ड स्टोरेज प्लांटमुळे कोकणात उत्पादित केल्या जाणार्‍या शीघ्र नाशवंत उत्पादनांची साठवणूक करता येईल तसेच त्यांची निर्यात करणे सोपे होईल अशी माहिती KRCL ने आपल्या ट्विटर अकाऊंट वर दिली आहे.

महाप्रितचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

रत्नागिरी शहरात होणार परप्रांतीय फेरीवाल्यांचा सर्व्हे

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी |  रत्नागिरी शहरात परप्रांतीय फेरीवाले आणि स्थानिकांत होणारे वाद वाढत चालले आहेत. या वादांनी गंभीर स्वरुप घेऊ नये यासाठी शहरातील परप्रांतीय फेरीवाल्यांचा प्रशासनातर्फे आता सर्व्हे केला जाणार आहे. शहरातील फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटनेमध्ये सुरू असलेली धुसफूस वाढवण्यापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वातावरण थंड करण्यासाठी  सर्व्हे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व्हे झाल्यावर आवश्यक ती माहिती हाती येईल आणि फेरीवाले विरुद्ध शहर व्यापारी संघटना यांच्यामध्ये समन्व्य साधता येईल असे ते म्हणाले. दरम्यान, पुढील निर्णय होईपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
शहरातील रामआळीमध्ये बसणाऱ्‍या फेरीवाल्यांच्या म्होरक्याकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार शहर व्यापारी संघटनेने पोलिस ठाण्यात दिली होती. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे अशी मागणी नगर पालिका व जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. त्यामुळे नगर पालिकेने फेरीवाले हटाव मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यातून फेरीवाले विरुद्ध व्यापारी असा संघर्ष उभा राहण्याचे चित्र निर्माण झाले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्‍यात शहर व्यापारी संघटना व फेरीवाले यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीत जोरदार खडाजंगीही झाली. रामआळीतील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे व त्यांना अन्यत्र जागा द्यावी अशी प्रमुख मागणी व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे फेरीवाले व्यावसायिक व लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते. अनेक फेरीवाले हे मतदार असून अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत, त्यामुळे त्यांना हटवू देणार नाही असा पवित्रा माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी घेतला. या वेळी विजय खेडेकर, किशोर मोरे, स्मितल पावसकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका मांडली. मात्र सामंत यांनी फेरीवाले व व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांची समजूत घातली.

शेतकर्‍यांचा नाद करायचा नाही; एकट्याने केले मुंबई गोवा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन..

चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.

चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला. 

रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर १२ किलो ब्राउन हेरॉईन जप्त; एकाला अटक

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राउन हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली, त्याच्याकडून 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून  आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रो लिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी .एस अ‍ॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search