Category Archives: अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचा गर्डर तुटला; दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ व्हायरल

बांधकामाच्या दर्जाविषयी प्रशचिन्ह उपस्थित
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

कणकवली: राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत ३ म्हशी ठार

कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

पनवेल जवळ मालगाडी रुळावरून घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत

Kokan Railway News:पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी आज दुपारी पनवेल – कळंबोली विभागात  रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. 
आज दुपारी पनवेल-कळंबोली विभागात 15.05 वाजता मालवाहू मालगाडी रुळावरून घसरली आहे.  या गाडीचे 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरल्याने या मार्गावरील खालील गाडयांना रोखून ठेवण्यात आले आहे. 
अ) डाउन गाड्या-
१) १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस- कळंबोली येथे
2) १२६१९ एलटीटी – मंगळुरु एक्स्प्रेस- ठाणे येथे
3) ०९००९  मुंबई सेंट्रल- सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा पंचानंद येथे
ब) अप गाड्या-
1) २०९३१  कोचुवेली- इंदूर एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे
2) १२६१७  एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस- सोमाठाणे येथे

Kankavali: टेम्पो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालक ठार

कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक आज पहाटे एका टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.

सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण समजले नसले तरी टेम्पो उलटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.

Guhagar: गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव टेम्पो शिरल्याने मोठा अपघात; २ ठार तर १५ जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रा यव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; १ ठार १९ जखमी

रायगड: गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एसटी बस मुंबई राजापूरकडे ( MH 14 BT 2664 ) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही . अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

मालवण: माकडामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार

मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.

पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

देवरुख आगाराच्या एसटी बसला बोरसूत अपघात; ‘त्या’ बस चालकाचा दावा खरा?

देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.

व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा?
गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.

तर मोठा अपघात झाला असता…
या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

लेहमध्ये सैन्याच्या ताफ्यातील ट्रकला अपघात; ९ जवानांचा मृत्यू

लडाख : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.

भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.

भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.

 

 

 

आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटी बसला अपघात; वाहकासह १२ प्रवासी जखमी

रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search