कणकवली : येथून गोव्या च्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस ची धडक बसून रेल्वे घेत जवळ स्टेशन च्या दिशेने जाणाऱ्या तीन म्हैशी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ९:४५ वा. च्या सुमारास कणकवली रेल्वे स्टेशन ते हळवल – वागदे रेल्वे ब्रिज दरम्यान घडली. यातील तीन जनावरांमध्ये एका दुभत्या म्हैशीचा समावेश आहे. तर साधारपणे एक तास राजधानी एक्सप्रेस वागदे रेल्वे बोगद्यात उभी होती.या घटनेमुळे आधीच विस्कटलेले रेल्वेचे रेल्वेच्या वेळापत्रकात एक ते दीड तासाने बदल झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच संदेश जाधव, भाई परब, संदीप जाधव, अंगुली कांबळे, रितेश कांबळे, विकास कासले यांनी धाव घेत रेल्वे ट्रॅकवरील ते म्हशींचे मृतदेह बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेचा ६ दिवसांचा ब्लॉक; कोकण रेल्वेच...
कोकण
KR Updates | कोकणकन्या आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस सावंतवाडी पर्यंतच, अजून काही गाड्या रद्द, यादी ईथे व...
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या डब्यांत कायमस्वरूपात वाढ
कोकण रेल्वे