Category Archives: देश




Covid-19 Updates: एकेकाळी संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण करणारा कोरोना पुन्हा येत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या काही आठवड्यात सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये #COVID19 च्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, ही प्रकरणे बहुतेक सौम्य आहेत, असामान्य तीव्रता किंवा मृत्युदराशी संबंधित नाहीत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य सेवा महासंचालक (DGHS) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), आपत्कालीन वैद्यकीय मदत (EMR) विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमधील तज्ञांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत असा निष्कर्ष काढण्यात आला की भारतातील सध्याची कोविड-१९ परिस्थिती नियंत्रणात आहे. १९ मे २०२५ पर्यंत, भारतात सक्रिय कोविड-१९ प्रकरणांची संख्या २५७ आहे, जी देशाच्या मोठ्या लोकसंख्येचा विचार करता खूपच कमी आहे. यापैकी जवळजवळ सर्व प्रकरणे सौम्य आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम (IDSP) आणि ICMR द्वारे कोविड-१९ सह श्वसन विषाणूजन्य आजारांवर देखरेख ठेवण्यासाठी एक मजबूत प्रणाली देशात अस्तित्वात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी सतर्क आणि सक्रिय आहे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करत आहे.




Pahalgam Terror Attack: पाकिस्तान ची गोची करण्यासाठी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द Airspace बंद केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात यापुर्वी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.
पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द
भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक ‘जंग’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.




Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.
यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.
देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.
यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.
” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.”
– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे
Some posts are circulating on Social Media channels mentioning about different timings for Tatkal and Premium Tatkal tickets.
No such change in timings is currently proposed in the Tatkal or Premium Tatkal booking timings for AC or Non-AC classes.
The permitted booking… pic.twitter.com/bTsgpMVFEZ
— IRCTC (@IRCTCofficial) April 11, 2025




नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.
संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.
खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.




New Traffic Rules Fine : बेदरकार वाहतूक करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसवण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. दिनांक 1 मार्च 2025 पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.
नियमभंग करुन वाहन चालवल्याबद्दलच्या दंडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला, अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, प्रथमच नियम मोडणारांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड वाढला आहे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. ज्यांच्या नियमभंग करुन वाहन चालवताना वारंवार पकडले जाणाऱ्यांसाठी, दंडाची रक्कम 15 हजारांपर्यंत वाढली आहे. तर दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ही होऊ शकतो.
असे असणार सुधारित आहे दंड
वैध परवाना किंवा विमा यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड आकारला जाईल.
याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो, त्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो
विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PoC) नसल्याबद्दलचा दंड 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. संभाव्यत: सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
ओव्हरलोडिंग वाहनचालकांकडून जर नियमभंग झाला तर पूर्वी 2 हजार रुपये दंड होता, परंतु आता तो 20 हजारांपर्यंत वाढला आहे.
अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे. त्यांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे
मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचा समावेश आहे.
हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबन
वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये झाली आहे.
वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास लायसन्स नसल्यास 5 हजार रुपये आणि विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड होऊ शकतो.




HSRP Number Plate Update: राज्यामध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट राज्य सरकारने अनिवार्य केली आहे. येत्या 30 एप्रिलपासून राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक असणार आहे. यानंतर तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक झाल्यामुळे अनेकांनी या नंबर प्लेट लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता यामध्येही अडथळे येत असल्याचं दिसतंय. सायबर गुन्हेगारांनी यामध्ये आपला डाव साधला आहे.
हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने एक वेबसाइट दिली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी येथेही अनेक बनावट वेबसाइट तयार केल्याचं आढळतंय. यावरुन ते सर्व सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे तुम्हीही ऑनलाइन एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करत असाल तर सावध व्हा.
तुम्ही जेव्हा तुमच्या वाहनांची नोंदणी करता तेव्हा ती वेबसाइट ही परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करा. कारण शुल्काच्या बहाण्याने वाहन चालकांची मोठी फसवणूक केली जातेय.
बनावट संकेतस्थळांची (वेबसाईट्स) नावे
1-https://bookmyhssp.in/maharashtra.html
2-https://bookedmyhsrp.com/registration
3- https://www.bookmehsrp.com
4- https://bookingmyhsrp.com
5- https://indnumberplate.com
6- https://hsrprto.in
अधिकृत संकेतस्थळांची नावे
- https://mhhsrp.com
- https://hsrpmhzone2.in
- https://maharashtrahsrp.com
टीप: ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून नागरिकांत जागरूकता आणावी.