Category Archives: देश

घाबरून जाऊ नका! अशा लाटेंविरुद्ध लढण्याचा आपल्याला ३ वर्षाचा अनुभव… केंदीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली :चीन, आणि इतर देशांमध्ये कोरोनाची वाढत्या पार्श्वभूमीवर. आजच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियायांनी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यासोबत एक बैठक घेतली आहे.

या बैठकीनंतर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून, आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये खास लक्ष देण्यास सांगितलं आहे.

राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये, टेस्टिंग, उपचार आणि ट्रेसिंग यांच्यावर अधिक जोर देण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यातील सर्व नागरीकांनी प्रिकॉशनरी म्हणजेच बूस्टर डोस घ्यावा, याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

ह्या बैठकीनंतर केंदीय आरोग्यमंत्र्यांनी एक ट्विट पोस्ट केले आहे. आपण सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्याकडे ३ वर्षाचा अशा लाटे विरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. केंद सरकारकडून ह्या लढ्याकरिता राज्यांना पूर्ण सहाय्यता केली जाईल. तसेच भविष्यातील परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेतले जातील.

कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचे भारतात 3 रुग्ण

BF7 Variant Threat :चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे व्हेरियंटचे 3 रुग्ण भारतात आढळल्याची बातमी NDTV वृत्तवाहिनीने PTI वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली.भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबद्दल एक बैठक घेतली आणि जगातील अनेक देशांमध्ये सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

   Follow us on        

मांडविया म्हणाले, काही देशांमध्ये कोव्हिड-19 च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला पाहाता आज तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोव्हिड अद्याप संपलेला नाही. या संदर्भातील सर्व घटकांना सतर्क राहून लक्ष ठेवण्याचे आदेश मी दिले आहेत. कोणतीही स्थिती हाताळण्यास आम्ही तयार आहोत

चलनी नोटेवर गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो- अरविंद केजरीवाल यांची मागणी; इंडोनेशियातील चलनी नोटेचे दिले उदाहरण

दिल्ली : चलनी नोटेवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा अशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारला विनंती केली आहे. केजरीवाल यांच्या या मागणीमुळे केजरीवाल यांच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आलेले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्शवभीमीवर केजरीवाल यांनी हि मागणी केल्याचे बोलले जात आहे .  
आपल्या मागणीचं समर्थन करताना केजरीवाल यांनी इंडोनेशियातल्या चलनी नोटेचे उदाहरण दिलं आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 85 टक्के मुस्लिम केवळ दोन टक्के हिंदू पण गणपतीची प्रतिमा नोटेवर- केजरीवाल इंडोनेशियाचे स्वातंत्र्य सेनानी Ki Hajar Dewantara यांच्या फोटो शेजारी हिंदू देवता गणपती चा फोटो आहे. 

काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा विजय

काँग्रेस अध्यक्ष निवडणूक :काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,385 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.

तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम  सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.

नाव सन
1 पट्टाभी सीतारामय्या 1948-1949
2 पुरुषोत्तम दास टंडन 1950
3 इंदिरा गांधी 1959, 1966-67, 1978-84
4 नीलम संजीव रेड्डी 1960-1963
5 के कामराज 1964-1967
6 एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा 1968-1969
7 जगजीवन राम 1970-1971
8 शंकरदयाल शर्मा 1972-1974
9 देवकांत बरुआ 1975-1977
10 पी.व्ही. नरसिंह राव 1992-96
11 सीताराम केसरी 1996-1998
12 सोनिया गांधी 1998-2017 आणि 2019
13 राहुल गांधी 2017-2019

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादी

दिलदार मालक… दिवाळी बोनस म्हणुन कर्मचाऱ्यांना चक्क बाइक आणि कार देणार

तामिळनाडू : दिवाळी आली की नोकरदार वर्गाला उत्सुकता असते ती बोनसची. दिवाळीत एक किंवा दीड अतिरिक्त पगार बहुतेक ठिकाणी दिला जातो. पण काही मालक एवढे दिलदार असतात की ते ह्यापुढे जाऊन आपल्या कर्मचार्‍यांना खुश करारात. अशाच एका मालकाने या वर्षाच्या दिवाळीला आपल्या कर्मचार्‍यांना चक्क कार आणि बाईक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडू येथील या जयंती लाल  चयांति  या ज्वेलरी शॉप मालकाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने 20 मोटर बाईक्स आणि 10 कार खरेदी केल्या आहेत. ह्या सर्वाचा खर्च 1 कोटी पेक्षा जास्त होणार आहे.

 

“ह्या सर्व कर्मचार्‍यांनी मला माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेत साथ दिली आहे. ह्या भेटीने त्यांना प्रोत्साहन भेटेल” असे जयंती यांचे म्हणने आहे. 

प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक पुरी’ 

आग्रा: प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अशीही क्लृप्ती. कॉलनीचे नाव बदलून चक्क ‘नरक नगरी’ 

वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने आग्रा येथील रहिवाशांनी निषेधासाठी एक आगळी वेगळी आणि जरा हटके शक्कल लढवली आहे. त्यांनी चक्क आपल्या परिसराचे नाव बदलून नवीन नाव ठेवले आहे. ही नवीन नावे पण अशी आहेत की ती वाचून सरकारला पण लाज वाटावी.

 

काय आहेत ही नवीन नावे?

नरक पुरी 

किचड नगर 

दुर्गंधी शील 

नाला सरोवर कॉलनी 

बदबू विहार 

 

जागोजागी घाणीचे साम्राज्य, खड्डेमय रस्ते अशा प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा आयडिया आपल्या परिसरात पण करण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटते?

Block "ad1" not found

 

 

 

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप चुकूनही लहान मुलांना देवू नका.. ठरू शकतात जीवघेणी.

मुंबई :भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड (Meden Pharmaceutical) या कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्दी-खोकला आणि तापावरील सिरपमुळे आतापर्यंत गांबिया नावाच्या देशात 66 कोवळ्या जिवांच्या मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने भारतात बनवल्या जाणाऱ्या या कफ सिरप बद्दल पुढील तपास करण्यासाठी अलर्ट जारी करत सगळ्यांना सतर्क करण्यात आलंय.

या सिरपमध्ये असलेले काही घटक हे लहान मुलांच्या शरीरासाठी घातक होते. या कफ सिरपमुळे चिमुरड्यांच्या कीडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या सिरपचं वितरण गांबियासोबत इतरही अनेक देशात झालेलं असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकूण चार सिरप बाबत जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.

कोणती आहेत ही सिरप

प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलिन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिपर अशी या चार कफ सिरपची नावं आहे. ही चारही कफ सिरप हरियाणामध्ये असलेल्या मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती.

 

संशयास्पद चार सिरपमुळे पोटदुखी, उलट्या होणं, लघवीला न होणं, डोकेदुखी, कीडनीचे विकार बळावणं, अशी लक्षणं दिसून आली होती. त्यामुळे या सर्व उत्पादनांची तातडीने सखोल चौकशी आणि तपास केला जाईल. तोपर्यंत हे सर्व कफ सिरप असुरक्षित मानले जातील, असं WHO ने म्हटलं आहे.

Block "ad1" not found

घरगुती गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा. वर्षभरात ‘एवढे’ सिलिंडर बूक करता येतील.


एलपीजी सिलिंडर बातमी :आता सिलिंडरसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार आता घरगुती स्वयंपाक सिलिंडर ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करताना आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन (Non Subsidy Connection) असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलिंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार याला आता बंधन आले आहे. त्यामुळे वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.

अनुदानित सिलिंडरही ठराविक मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज लागल्यास विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे जास्तीचे पैसे मोजावे लागतील.

मोठी बातमी: PFI वर पाच वर्षासाठी बंदी.

पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. ही बंदी पुढील पाच वर्षासाठी आहे.

२२ सप्टेंबर रोजी एनआयए तसंच ईडी अशा काही तपास यंत्रणांनी संयुक्तपणे पीएफआयवर कारवाई केली होती. या संघटनेशी संबंधित १०६ लोकांना या पहिल्या फेरीमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे दुसऱ्या फेरीत जवळपास २४७ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता या तपास यंत्रणांनी गृह मंत्रालयाकडे केलेल्या शिफारसीनुसार गृहमंत्रालयाने पाच वर्षांसाठी पीएफआयवर बंदी घातली आहे.

भाजपच्या संसदीय बोर्डातपण नितीन गडकरी यांना स्थान नाही… गडकरींचा ‘अडवाणी’ करायचा प्लॅन?

दिल्ली: काल भाजपने आपल्या संसदीय बोर्डची यादी घोषणा करत त्यातील सदस्याची नावे जाहीर केली आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे ह्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्र राज्यातील नेत्याच्या समावेश केला गेला नाही आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावलले गेले आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पण ह्या समितीमध्ये स्थान देण्यात असलेले नाही आहे. त्यामुळे ह्या समितीमध्ये आता एकही मुख्यमंत्री नाही आहे.

ह्या समितीमध्ये जे. पी. नड्डा यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांचे खच्चीकरण?

भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्ड आणि केंदीय निवडणूक समितीमध्ये भाजपचे कार्यशील आणि वजनदार नेते नितीन नमस्कार यांना स्थान दिले नसल्याने विविध चर्चा होत आहेत.

पक्षाने असे का केले या विषयी काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. ह्या समितीवर निवडीसाठी वयाची अट पाहता ती पक्षाने 75 ठेवली आहे. नितीन गडकरी यांचे वय 65 आहे. त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या बी. एस. येडियुरप्पा यांचे वय 77 आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांना का डावलले याचे नेमके कारण आजून समजले नाही.

नितीन गडकरी यांना भावी पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जात आहे. नितीन गडकरी यांचे केंद्रात आणि पक्षात वाढणारे प्राबल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्यांचे जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे बोलले जात आहे. दुसरीकडे नितीन गडकरी यांना त्यांचा स्पष्टवक्तेपणा नडत असल्याचे आणि त्यांच्या मागील काही विधानांमुळे त्यांना दूर करण्यात येत आहे अशी चर्चा आहे. मागेच नितीन गडकरी यांनी आता सत्ताकारणाचा कंटाळा आला आहे असे जाहीरपणे बोलून पण दाखवले होते. कारण काहीही असो पण त्यांना डावलून एकप्रकारे भाजप महाराष्ट्र राज्याचा अपमान करत आहे असे दिसून येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search