Category Archives: देश

केरळमध्ये भूस्खलन, २३ जणांचा मृत्यू; शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

   Follow us on        

Wayanad Landslide: केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

 

 

Loading

Breaking: हावडा-मुंबई एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

 

Loading

Important: आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या वेटिंग तिकीटधारकांवर होणार कठोर कारवाई; दंडही आकारला जाणार आणि….”

   Follow us on        
Strict Action on Waiting Passnger:रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरक्षित डब्यात होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास संपूर्णपणे मनाई केली आहे. असे प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर आता दुहेरी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून पुढील स्थानकावर उतरविण्यात येणार आहे.
अशी असेल दंडाची रक्कम 
जर कोणी प्रतीक्षा यादीतील तिकीट घेऊन प्रवास करत असेल तर त्याला खालील दंड भरून पुढील स्थानकावर उतरावे लागेल.
एसी कोच दंड  – 440 रुपये + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
स्लीपर कोच दंड – रु 250 + पुढील स्थानकापर्यंचे भाडे
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांच्या आरक्षित डब्यांत होणाऱ्या गर्दीच्या त्रासाबद्दल अनेक तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवर या डब्यातील गर्दीचे विडिओ व्हायरल होत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासन उपाययोजना म्हणून ही कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलेले आहे.

Loading

अखेर रेल्वेला आपली चूक उमजली, सामान्य वर्गातील प्रवाशांसाठी घेतला मोठा निर्णय

   Follow us on        




Indian Railway News: भारतीय रेल्वे अपग्रेड करण्याच्या आणि उत्त्पन्न वाढविण्याच्या नादात प्रशासनाला सामान्य वर्गातील प्रवाशांचा विसर पडला होता. मात्र उशिरा का होईना सरकारला आपली चूक उमजली आहे. रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नॉन एसी कोच निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे गाड्यांमधील वाढलेली प्रचंड गर्दी आणि जनरल कोचची कमी असलेली संख्या यामुळे सामान्य वर्गातील प्रवाशांची प्रचंड कुचंबना होत आहे. त्या संबंधाने मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. त्या लक्षात घेता  यातील ५३०० कोच जनरल राहणार आहेत, हे विशेष !गेल्या वर्षभरात सर्वच मार्गावर रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात रेल्वेकडून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमधील जनरल कोचची संख्या कमी केल्याने गरिब वर्गाच्या रेल्वे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. एसीचे तिकिट काढून प्रवास करणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते जनरलच्या तिकिटा घेऊन गाडीत चढतात. जागा मिळेल तेथे बसून, उभे राहून प्रवास करतात. त्यामुळे अन्य प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे रेल्वे गाड्यात वाद होतात. त्याच्या तक्रारीही होतात अन् अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला जातो. हा सर्व प्रकार प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वे अधिकाऱ्यांसाठीही मनस्तापाचा विषय ठरला आहे. तो लक्षात घेता रेल्वे बोर्डाने पुढच्या दोन वर्षांत १० हजार नवीन कोच निर्माण करण्याची योजना तयार केली आहे. त्यात ५३०० कोच जनरलचे राहणार आहेत. असा आहे कोच निर्मितीचा आराखडा२०२४ -२५ मध्ये अमृत भारत जनरल कोच सह एकूण २६०५ कोच, १४७० स्लीपर आणि नॉन एसी कोच, ३२३ एसएलआर कोच, ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पॅन्ट्री कार तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे २०२५-२६ मध्ये अमृत भारत जनरल कोचसह २७१० कोचची निर्मिती केली जाणार असून, १९१० नॉन एसी स्लीपर, ५१४ एसएलआर कोच, उच्च क्षमतेच्या २०० पार्सल व्हॅन आणि ११० पॅन्ट्री कार निर्माण करण्याची योजना रेल्वेने बनविली आहे.




Loading

Fact Check: भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत सुरु केल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        
Fact Check: सोशल मीडियावर सध्या एका बातमीचे कात्रण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कात्रणामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत पुन्हा सुरू केली आहे. या बातमीनुसार  60 वर्षांवरील पुरुषांसाठी 40 टक्के आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी 50 टक्के रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे.
मात्र खोलवर चौकशी केली असता असे आढळले की या बातमीत केलेला दावा खोटा असून असा कोणताही निर्णय भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेला नाही.
देशातील एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने रेल्वे मंत्रालयाचे एडीजी जनसंपर्क राजीव जैन यांच्याशी संपर्क साधला असता जैन यांनी या बातमीला “फेक न्यूज” म्हणत स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, “असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, 1 जुलैपासून सवलतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. फक्त सध्याच्या सवलती सुरू राहतील.”
या वर्षी 19 मे रोजी आयआयटी मद्रास येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते कि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पुन्हा सुरू करता येणार नाही कारण रेल्वे आधीच सवलतीच्या दराने कार्यरत आहे.
ही अफवा कोणी सुरू पसरवली ?
“रेल मेल” नावाच्या एका फेसबुक पेजने एका पोस्टमध्ये दावा केला आहे की भारतीय रेल्वे 1 जुलैपासून वृद्धांसाठी सवलत पुन्हा सुरू करणार आहे. तथापि, फेसबुक पेजने नंतर आपला दावा मागे घेतला आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र ही बातमीचे कात्रण अजूनही  सोशल मीडियावर मोठ्या  प्रमाणात व्हायरल होत असल्याने अफवा पसरत आहेत.
20 मार्च 2020 पासून कोरोना काळात रेल्वेने दिव्यांगजनांच्या केवळ चार श्रेणी, रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींचा अपवाद वगळता इतर सवलती अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बहाल करण्याची मंत्रालयाची कोणतीही योजना नाही.

Loading

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज येणार 2000 रुपये; लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे

   Follow us on        
PM Kisan Samman Nidhi Scheme: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा 17 वा हफ्ता जमा होणार आहे. देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.
अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी 
1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवर PM Kisan अॅप डाऊनलोड करावे लागेल.
2. अॅप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अॅपमध्ये टाका
4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

Loading

कांचनजंगा एक्सप्रेसला अपघात, एक्स्प्रेसची मालगाडीला धडक

   Follow us on        

Kanchenjunga Express accident: पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले.

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

 

 

 

 

 

Loading

….म्हणून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळले

सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही.  नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.

Loading

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर;जाणून घ्या कोणाला कोणते खाते भेटले

   Follow us on        

दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?

अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना कोणती खाती?

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.

 

 

 

Loading

मोठी बातमी: नारायण राणे यांना नवीन सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान नाही

   Follow us on        
दिल्ली: कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन 
मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
वेगळी महत्वाची जबाबदारी दिली जाणार? 
भाजपचे सरकार आल्यावर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत होती. मात्र भाजपने नारायण राणे यांना मंत्रीपद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नारायण राणे यांचे राज्यातील खासकरून कोकण भागातील राजकीय वजन पाहता त्यांना दुसरी महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search