Category Archives: पर्यटन
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी आशादायक असलेल्या पाणबुडी प्रकल्पासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे, त्यामुळे गेले काही वर्ष रखडलेला वेंगुर्ले निवती समुद्रातील प्रस्ताविक पाणबुडी प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. सन २०१८-१९ च्या राज्य अर्थसंकल्पात सिंधुदुर्गासाठी पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली होती. त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले निवती रॉक जवळ समुद्रात पाणबुडी प्रकल्प होणार होता.
या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना खोल समुद्राच्या पाण्यातील अंतरंग अनुभवता आला असता, समुद्रातील अंतरंगात असलेला खजिना यामुळे न्याहाळत सफर झाली असती. आता केंद्र सरकारने निधी दिला असल्याने पर्यटन प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. साधारण वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन समुद्राखालील अंतरंग बसून न्याहाळू शकतात. कोकणात सर्वात जास्त कोरल्स, रंगबिरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग दिसणारे अनोखे विश्व हे फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असून हे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प निवती समुद्रात होणार आहेमहाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोकणातील या प्रकल्पाला ४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र सरकारने तशी घोषणाही केली. परंतु पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सरकारने पावले उचलली नाहीत. समुद्र किनारी पर्यटन स्थळे विकसित झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात, म्हणून पाणबुडी प्रकल्पाला महत्त्व आले आहे.
- पर्यटन भवन
- अगुडा किल्ला
- Sinqeurim किल्ला
- कांडोलीम समुद्रकिनारा
- कलंगुट समुद्रकिनारा
- बागा समुद्रकिनारा
- अंजुना समुद्रकिनारा
- व्हागातोर समुद्रकिनारा
- शापोरा किल्ला
- पर्यटन भवन
- दोना पावला
- गोवा सायन्स सेंटर
- मिरामर समुद्रकिनारा (Miramar Beach)
- कला अकादमी
- पणजी बाजार
- पणजी जेट्टी
- दीवजा सर्कल
- ओल्ड गोवा चर्च
- मंगेशाचे देऊळ
- अटल सेतू




Matheran toy train: हिवाळी पर्यटनासाठी माथेरानला जाण्याचा बेत असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.का
ही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे




पालघर दि. ३० सप्टें. २०२४: पालघर जिल्ह्यातील शिरगाव हा ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.
यासाठी सरकारच्या वतीने सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे PWD करण्यात करण्यात येत आहे. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, भानुदास पालवे, कुंदन संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत. आता हा किल्ला ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने त्याचे जतन करण्यात येणार आहे.
सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी केल्याच्या बर्याच तक्रारी येत आहेत. आता तर काही पर्यटकांनी चक्क विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेतच मद्याची पार्टी करून हद्दच पार केली आहे. आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे.
आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल. श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.