Category Archives: महाराष्ट्र

ATM in Railway: धावत्या रेल्वेमध्ये देशातील पहिली एटीएम सेवा सुरू

   Follow us on        

Atm in Railway : मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा उपलब्ध झाली असून, अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे. त्यामुळे आता प्रवासादरम्यानही प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

रेल्वे गाड्यांमध्ये एटीएम बसवण्याचा विचार प्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता. या कल्पनेला प्रतिसाद देत, बँक ऑफ महाराष्ट्रने “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला होता. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहार्यता व कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे. ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावते. एकूण 22 डब्यांच्या या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी दररोज प्रवास करतात. संपूर्ण गाडी वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या एटीएमचा सहज लाभ घेता येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून एक खास कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये एटीएम बसवण्यात आले असून, हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी ही एटीएम सेवा असलेली ट्रेन मुंबईत दाखल झाली. हे एटीएम ‘एक्स्प्रेस’ सेवेच्या एसी चेअर कार कोचमध्ये बसवण्यात आले असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएम सुरळीतपणे कार्यरत राहावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण उपक्रम योजना भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या समन्वयातून राबवला जात आहे. या ऑनबोर्ड एटीएम सेवेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान सहज आर्थिक व्यवहार करता येणार असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही एटीएम सेवा मोबाईल नेटवर्कद्वारे सतत जोडलेली राहणार असून, गाडी सुरू असतानाही खऱ्या वेळेत व्यवहार शक्य होणार आहे. एटीएमची सुविधा ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे.

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगाम विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी – लोकमान्य टिळक (टी) (AC)साप्ताहिक स्पेशल:
गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर शुक्रवारी , ११/०४/२०२५ ते २३/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी  १२:०० वाजता करमाळी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ करमाळी – लोकमान्य टिळक (टी) स्पेशल (साप्ताहिक) दर शनिवारी , १२/०४/२०२५ ते २४/०५/२०२५ पर्यंत करमाळी येथून दुपारी १४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) ला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड,आणि थिविम आणि  या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० LHB कोच : दोन टायर एसी – ०८कोच, थ्री टायर एसी – १० कोच, जनरेटर कार – ०२ कोच

Shaktipeeth Expressway: ”…. तर कुणाल कामराज चे गाणे वाजवून करणार शिंदेंना विरोध”

शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर 5 एप्रिल ला एकनाथ शिंदेंना अडवणार: गिरीश फोंडे यांचा इशारा

1 मे महाराष्ट्र दिन रोजी देखील कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही असाइशारा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway: कोल्हापुरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिले ‌. पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे. या पार्श्वभूमी वरती आज सर्किट हाऊस मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले,” एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २९०० शेतकरी दररोज आठ आत्महत्या केलेल्या असताना विजय मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.12 मार्च च्या मुंबई मोर्चा रोजी देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामरा चे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल”

उभाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,” महाराष्ट्र युती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांच्या वरती दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भिक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे.”गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले,”निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू नये.”

शिवाजी कांबळे म्हणाले,” सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंट ना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे.

कृष्णात पाटील म्हणाले,” एकनाथ शिंदे चे कोल्हापुरातील आमदार हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना चितावणी देत आहेत. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.”

इंडिया आघाडीने देखील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता सर्किट हाऊस येथे मीटिंग बोलवली आहे. त्यामुळे आंदोलनाची व्यापकता वाढणार आहे.

यावेळी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार सरवडे येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विजय मेळाव्याच्या शेजारी म्हणजे मुदाळ तिट्टा जवळ शेतकऱ्यांची एक टीम जमेल. दुसऱ्या व तिसऱ्या टीमचा निर्णय वेळप्रसंगी घेऊ.

यावेळी शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुरेश बन्ने,किसान सभेचे नामदेव पाटील ,दिनकर सूर्यवंशी, प्रकाश पाटील,वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय एन पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Weather Update: पुढील पाच दिवस राज्याला अवकाळी पावसाचा इशारा; वाचा कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार

   Follow us on        
Weather update:महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक महत्वाची  बातमी आहे. भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत.
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला  ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
अवकाळी पाऊस कशामुळे येतोय?
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
31 मार्च: ठाणे पालघर नाशिक नगर धुळे नंदुरबार सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
– रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव पावसाची शक्यता
1 एप्रिल: ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक, नगर जळगाव छत्रपती संभाजी नगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट.
– पालघर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली नंदुरबार धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा
2 एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी वाद….नेमके प्रकरण काय? 

 

   Follow us on        

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे एक वादग्रस्त प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे., जे ऐतिहासिक सत्यता आणि सांस्कृतिक भावनांभोवती फिरते. ही समाधी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचे मानले जाते. लोककथेनुसार, वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने १६८० मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून प्राण त्यागले. ही कथा निष्ठेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषत: राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकामुळे, ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.

प्रकरणाची मुळे अशी आहेत की, १९२७ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सुमारे १०-१२ वर्षांनी, म्हणजे १९३६ मध्ये, रायगड स्मारक समितीने गडकरींच्या नाटकाला आधार मानून वाघ्याचा पुतळा आणि समाधी उभारली. पण या कथेला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. शिवकालीन दस्तऐवज किंवा समकालीन नोंदींमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा अशा घटनेचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही (ASI) असा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या समाधीवरून वाद का आहे? काही इतिहासकार आणि शिवप्रेमी, जसे की संभाजीराजे छत्रपती, यांचे म्हणणे आहे की ही समाधी कपोलकल्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे हा त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. संभाजीराजे यांनी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मेपर्यंत हटवण्याची मागणी केली, कारण ती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसलेली आणि रायगडावरील अतिक्रमण आहे. याउलट, काही लोकांना ही समाधी सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली वाटते, कारण ती निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.

दुसरीकडे, संभाजी भिडे यांनी वाघ्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे आणि संभाजीराजेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कथा लोकपरंपरेतून आल्याचे सांगितले, परंतु ठोस पुराव्यांऐवजी त्यांचा भर भावनिक आणि पारंपरिक विश्वासांवर आहे.

भारतीय पुरातत्व विभागानेही असा खुलासा केला आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.

या वादात अनेक बाजू आहेत:

ऐतिहासिक सत्यतेचा मुद्दा: वाघ्याची कथा लोककथा असू शकते, पण ती सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. काहींच्या मते, समाधी उभारताना सापडलेली हाडे उद-मांजराची होती, कुत्र्याची नव्हे.

सांस्कृतिक महत्त्व: काही समुदाय, उदा. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके, यांनी समाधी हटवण्यास विरोध केला आहे, कारण त्यांना ती परंपरेचा भाग वाटते.

राजकीय आणि सामाजिक आयाम: हा वाद औरंगजेबाच्या कबरीसारख्या इतर प्रकरणांशी जोडला गेला असून, काहींनी याला राजकीय रंग दिला आहे.

थोडक्यात, वाघ्या कुत्र्याची समाधी ही एका कथेवर आधारित आहे, ज्याला ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांस्कृतिक प्रतीक म्हणून टिकून आहे. सध्या, संभाजीराजे आणि समर्थक ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर काहींना ती ठेवायची आहे. हे प्रकरण ऐतिहासिक अचूकता आणि भावनिक मूल्यांमधील संघर्षाचे उदाहरण आहे…

 

 

 

सावंतवाडी:चराठा येथे २ लाख ३८ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांसहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. बाबाजी विजय नाईक (४२, रा. खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (५०, रा. वायंगणी तालुका मालवण) अशी संशयतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.

ओटवणे ते चराठा अशी कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या संशयित अल्टो कारला थांबवून त्याची पाहणी केली असता या गाडीत अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा सर्व मुद्देमाल तसेच अल्टो कार ताब्यात घेण्यात आली तर या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.

या दोघांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, जयेश करमळकर यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

धक्कादायक! राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गाच्या दिशादर्शक फलकांवरील गावांची नावे चक्क हिंदीत.

   Follow us on        
महाराष्ट्र:-
मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र राज्यात मराठीचे महत्व कमी करून त्याजागी हिंदीचा वापर होत असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली जात आहे. असाच एक प्रकार नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर घडला आहे.
या महामार्गाच्या फलकावरची नावे चक्क हिंदीत छापण्यात आली आहेत. उदाहरणार्थ जंबारगांवच्या जागी जंबारगाँव, करंजगावच्या जागी करंजगाँव तर हडस पिंपळगांवच्या जागी  हडस पिंपलगाँव अशा नावाचे फलक लावण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत न येत तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येत आहे. असे असूनही इथे मराठी भाषा डावलली जात असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली गेली आहे. या महामार्गावरील सर्व फलकांवरची  नावे ताबडतोब मराठीमध्ये करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत भेट

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.

कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.

माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या : 

  • जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
  • रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
  • मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
  • एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
  • उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

कोकण रेल्वे

  • प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
  • अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
  • मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.

Kokan Railway: कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२

२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२

३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक: 

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Bank Holiday Cancelled: या दिवशीची सार्वजनिक सुट्टी रद्द; बॅंका राहणार चालू

   Follow us on        

Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

 

३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?

प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.

पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने

सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण

सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.