Category Archives: महाराष्ट्र

महाराष्ट्रात लवकरच दिसणार आहेत महिला एसटी बसचालक….

MSRTC NEWS : एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच प्रथमच महिला चालक बसचे स्टेरिंग हातात घेणार आहेत. औरंगाबाद येथे  मागील एक वर्षांपासून  १६३ महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या मार्च अखेर हे प्रशिक्षण पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या सुरवातीस महाराष्ट्राच्या रस्त्यावर प्रत्यक्ष महिला बसचालक एसटी बस चालवताना  दिसतील असे महामंडळातर्फे सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी महिला चालक ह्या पदाकरिता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च २०१९ मध्ये सुरू झाली. मात्र करोना निर्बंध, बेमुदत संपामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. त्यांचे बंद झालेले प्रशिक्षण गेल्यावर्षी मार्च मध्ये पुन्हा सुरु झाले होते.
मार्चअखेर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची एक दिवसाची अंतिम चाचणी घेतली जाईल. उत्तीर्ण होणार्यांना बस चालविण्याची परवानगी मिळेल. नापास होणाऱ्यांना पुन्हा १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन एक संधी दिली जाईल. त्यानंतरहि नापास होतील त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल असे एसटी प्रशिक्षण विभागाचे वाहतूक निरीक्षक अनंत पवार म्हणाले आहेत.
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

Loading

रत्नागिरीत गॅस सिलिंडरचा स्फोट..२ महिला अडकल्याची भीती

रत्नागिरीः रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील पाच जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन महिला घरातच अडकल्या आहेत. त्याना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत

अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अश्फाक काझी पहाटे पाचच्या सुमारा घरी आले व त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे

Loading

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली…निलेश राणे यांचे त्याच भाषेत प्रत्युत्तर..

 

मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यास प्रत्युत्तर म्हणुन माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा त्याच भाषेत समाचार घेतला. संजय राऊत जिथे भेटतील तिथे त्यांना फटके देवू अशी धमकी ही त्यांनी दिली आहे.

 

 

 

Loading

पगार रखडले.. एसटी कर्मचारी आक्रमक

 

MSRTC Employees News :महिन्याची 12 तारीख उलटली तरी पगार झाला नसल्याने एसटी कामगार चिडले आहेत. मागे एसटी कामगारांनी संप केला होता, त्यावेळी हायकोर्टाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन देण्याचे कोर्टात मान्य केले होते. पण महामंडळ आपला शब्द पाळत नसून कोर्टाचा अवमान करत असल्याचे दिसत आहे.

(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर)

काल 12 तारखेपर्यंतही वेतन न झाल्याने हा कोर्टाचा केलेला अवमान आहे. शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे असे ते पुढे म्हणाले.

 

Loading

एसटीच्या ‘अच्छे दिन’ साठी ‘हि’ त्रिसूत्री आवश्यक

MSRTC NEWS: राज्यातील एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी राज्य सरकारने त्रिसूत्री कार्यक्रम राबविल्यास आशिया खंडातील सर्वात मोठे महामंडळ नफ्यात येण्यास वेळ लागणार नाही, असे मत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे यांनी  कामगारांच्या संवाद बैठक मेळाव्यात व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, राज्यातील इतर महामंडळापेक्षा एसटी महामंडळ हे राज्य सरकारला उत्पन्न मिळवून देत राज्याच्या विकासात आर्थिक हातभार लावत असते राज्य सरकारने एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी त्रिसूत्री राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे हि त्रिसूत्री?
1) एसटी टोलमुक्त करावी.
राज्यात आता महामार्गाचे जाळे विणले जात आहे हि एक सकारात्मक गोष्ट आहे. पण ह्या महार्गावरील आकारण्यात येणारी टोल रक्कम जास्त असल्याने काहीवेळा ती एसटीला परवडण्यासारखी नाही आहे. काही फेऱ्या जनहितासाठी कमी प्रवासीसंख्या असतानासुद्धा चालू ठेवाव्या लागतात ह्याचा विचार करून एसटीला पूर्ण राज्यात टोल मुक्ती देण्यात यावी.
2)डिझेलवरील अबकारी कर राज्य सरकारने माफ करावा. 
पेट्रोल आणि  डिझेल वरील केंद्र सरकार द्वारे लावण्यात येणाऱ्या कर कमी होण्याची शक्यता नाही कारण तो पूर्ण देशात सर्व राज्यांना निश्चित स्वरूपाचा असतो. पण राज्यस्तरावर  लावण्यात येणाऱ्या अकबारी करात सवलत किंवा तो एसटीसाठी माफ केल्यास वाहतूक खर्चात बचत होऊन एसटी महामंडळ फायद्यात राहील. एसटी महामंडळ हे राज्याचा अंगीकृत व्यवसाय असल्याने एसटी महामंडळाला राज्यसरकारकडून हि अपेक्षा आहे.
3)प्रवासी कर कमी करावा.
संदीप शिंदे यांनी महामंडळ चालवण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळ भरत असलेल्या  प्रवासी कर कमी करावा अशी मागणी केली आहे. देशातील इतर राज्याची तुलना करता महाराष्ट्रात हा कर जास्त आहे.
राज्यसरकारने जाहीर केलेल्या विविध वर्गासाठी विविध सवलती म्हणजे वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, अपंगासाठी तसेच विध्यार्थ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दराने प्रवास इत्यादी एसटी कडून राबवण्यात येत असतात. काही वेळा प्रवासीसंख्या कमी असूनही जनहितासाठी काही खेडोपाडी बसफेऱ्या चकवाव्या लागतात. हे सर्व विचारात घेऊन राज्यसरकारने एसटीच्या बचावासाठी हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Loading

अबब! राज्यातील तळीरामांनी 9 महिन्यात रिचवले 58 कोटी लिटर मद्य…

मुंबई :एप्रिल 2022 पासून पुढील 9 महिन्यात राज्यातील मद्य विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. खासकरून विदेशी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. ह्या विक्री वाढीमुळे सरकारच्या महसुलात 30% वाढ झाली आहे. मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर ही वाढ दिसून आली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.

(Also Read >उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र)

कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे. तर विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.

Loading

उद्योजकांसाठी खुशखबर! रत्नागिरी MIDC क्षेत्रातील भूखंड वाटपासाठी तयार…अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जानेवारी

रत्नागिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे (MIDC) रत्नागिरी येथे २ औद्योगिक क्षेत्रांकरिता उपलब्ध भूखंड वाटप केले जाणार आहे. हे वाटप “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” ह्या तत्वावर (सामान्य/अ.जा./अ.ज. ह्या प्रवगासाठी राखीव) ऑनलाईन सरळ पद्धतीने केले जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४/०१/२०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

खालील औद्योगिक क्षेत्राकरिता अर्ज मागवले आहेत.

औद्योगिक क्षेत्र वाटपास उपलब्ध क्षेत्र
(हे. आर)
भूखंडाची संख्या 
अतिरिक्त लोटे परशुराम 10.24 12
अडाळी 32.02 210

वाटप केल्या जाणाऱ्या भूखंडाचे दर,क्षेत्र आणि इतर माहितीसाठी खालील पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. 

(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)

अर्ज करण्यासाठी आणि इतर सविस्तर माहितीकरिता https://www.midcindia.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी

   Follow us on        

Loading

कोकणच्या समृद्धीसाठी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत आणायलाच हवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मागील 12 वर्षांपासुन रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत.

Mumbai-Goa Highway News:कोकणाच्या समृद्धीसाठी ‘मुंबई-गोवा महामार्ग’ सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केले आहे.

   Follow us on        

आपण ह्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत पण बोलणे झाले. समृद्धी महामार्ग जर कमी वेळात पूर्ण होऊ शकतो तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामात काय अडथळे येत आहेत असे असा सवाल त्यांनी नितीन गडकरी यांना केला. तुम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणुन तुम्ही लक्ष घालून हे काम पूर्णत्वास न्या या माझ्या विनंतीवर गडकरी यांनी आठ ते दहा दिवसांत ह्या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

ग्रामपंचायत निवडणूक-2022 निकाल(Live-19:00)

   Follow us on        

ग्रामपंचायत निवडणूक २०२२ –  संपूर्ण महाराष्ट्र – पक्षनिहाय 

पक्ष ग्रामपंचायतीसरपंच
भाजप22411987
शिंदे गट772709
ठाकरे गट668571
राष्ट्रवादी15121263
काँग्रेस1038796
इतर 1255989

माविआ : 2715
शिंदे-भाजप : 2795
इतर : 1135

कोकणातील स्थिती

पक्षनिहाय ग्रामपंचायती

पक्ष रत्नागिरीसिंधुदुर्गरायगडपालघरठाणे
भाजप17182181113
शिंदे गट4524790214
ठाकरे गट1017438074
राष्ट्रवादी080245040
काँग्रेस030103000
इतर 472157394

 

 

Loading

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खाजगी आस्थापनांना निवडणुकीच्या दिवशी सुट्टी…शासनाचा आदेश

Grampanchayat Election 2022 :  जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करावे यासाठी १८ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचही या आदेशात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने हे आदेश जारी केले आहेत.

नक्की काय आहे हा आदेश

1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)

   Follow us on        

3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

4) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search