Category Archives: सिंधुदुर्ग

सावंतवाडी – वेंगुर्ल्यात मायनिंग प्रकल्प? ग्रामपंचायतीला आलेल्या ‘त्या’ पत्रामुळे खळबळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जेएसडब्लू कंपनीने तळकोकणातील आजगाव ग्रामपंचायतीला पत्र देऊन खनिज उत्खननाच्या सोमवारपासून गावातील ८४० हेक्टर भागात सोमवार पासून ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आजगाव ग्रामपंचायत कडे गुरुवार दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी सहा वाजता JSW (जिंदाल कंपनी )चे अधिकारी मायनींग संदर्भात पत्र घेऊन ग्रामपंचायत ऑफिस मध्ये आले होते. त्यांनी आपण सोमवार पासून सर्व्हे सुरू करीत आहोत याची माहिती ग्रामपंचायत ला कळवीत आहोत असे सांगितले. सदरील पत्रात ८४० हेक्टर एवढी आजगाव ब्लॉक मधील जमीन महाराष्ट्र सरकार कंपनी ला मायनींग साठी देणार आहे ,त्यासाठी खनिज साठा किती आहे याची तपासणी करण्याबाबत चे हे पत्र आहे. त्या पत्रात असे नमूद आहे की, मायनींग साठी ड्रोन ने सर्व्हे करायची परवानगी कंपनी ला महाराष्ट्र सरकार ने तसेच जिल्हाधिकारी (कलेक्टर )सिंधुदुर्ग यांनी दिली आहे .आणि ते सोमवार दिनांक ८ जुलै ते ३० जुलै या कालावधीत ड्रोन ने मायनींग विषयक सर्व्हे -तपासणी करणार आहेत. मात्र या सर्व्हे साठी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नसल्याची माहिती आहे.

याआधीही येथे मायनींग विषयक चाचणी करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांकडून त्याला विरोध केला गेला होता. मायनिंग मुळे या क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला त्यावेळी होता. आता पुन्हा मायनिंगसाठी प्रयत्न चालू झाल्याने येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

आंबोली: नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई सुरु

16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
   Follow us on        
सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरातील  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा  निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-1000 रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-1000 रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-1000 रु. दंड, धूम्रपान करणे-500 रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.
या अंतर्गत दिनांक-16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- 2 व्यक्ती, धूम्रपान करणारे  3 व्यक्ती, मद्यपान करणारे 2 व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- 6 व्यक्ती शा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे

सावंतवाडी टर्मिनस बनविण्यासाठी महत्त्वाची असलेली पाणी पुरवठा योजना मंजूरीच्या प्रतिक्षेत..

   Follow us on        

सावंतवाडी : सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस गेले 9 वर्ष प्रतीक्षेत आहे. टर्मिनस झाल्यास त्याठिकाणी मुबलक पाणी असणे अत्यंत गरजचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन  येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यासाठी असलेल्या शक्यतांवर विचार करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या डिसेंबर मध्ये एक योजना सुचवली होती. तसेच ही योजना मंजूर करून घेऊन योजनेस अर्थपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र ही योजना गेल्या 6 महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 

तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी ते वेंगुर्ले या नळपाणी पुरवठा योजनेवर दांडेली ते मळगाव कोकण रेल्वेसह 3 गावांना पुरक नळपाणी योजना 8 कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला गेला आहे.

रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विकास अंतर्गत निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शवली नाही तर आपण सिंधुरत्न योजनेतून आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. दरम्यान डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा आराखडा मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील मळगाव रेल्वे स्थानकावर पाणी पुरवठा होईल आणि सर्व गाड्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर थांबतील यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.

आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर आला; वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

   Follow us on        
आंबोली,दि. ६ जून : आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. ही घटना  पूर्वीचा वस परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली आहे.  दरम्यान हा प्रकार घडला तरी वाहतूक सुरळीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या घटनेमुळे येथून वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे, असे पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका आंबोली पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी राजगुरू यांनी केली आहे.



आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाट वारंवार कोसळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पर्याय काय? हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान घाट धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असते. 

Revas Reddy Coastal Highway: कुणकेश्वर व काळबादेवी पुलांसाठी ‘विजय एम मिस्त्री’ ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway Updates:विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड (VMCPL) ला शुक्रवारी  रेवस रेड्डी या सागरी महार्गावरील कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग SH-4 (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील दोन्ही पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या 8 नवीन पुलांच्या मालिकेचा भाग आहेत. 
MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. 15 मे रोजी कुणकेश्वर पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 3 आणि काळबादेवी पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 2 निविदा उघडण्यात आल्या होत्या.
कुणकेश्वर पूल
1.6 किमी कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे.  यामध्ये 165 मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह 330 मीटर लांबीचा “आयकॉनिक केबल-स्टेड” पूल हे घटक समाविष्ट आहेत.
MSRDC चा अंदाज: रु. 158.69 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 187.53
Ashoka 196.78
T and T Infra तांत्रिकदृष्ट्या अपात्र
“iconic” cable-stayed Kunkeshwar Bridge
काळबादेवी पूल
2 लेन असलेला 1.8 किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर बांधण्यात येणार आहे.
MSRDC चा अंदाज: रु. 291.64 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 353.32
Ashoka 367.47
“Iconic” cable-stayed Kalbadevi Bridge
विजय एम मिस्त्री यांची रु. कुणकेश्वर पुलासाठी 187.53 कोटी आणि रु. काळबादेवी पुलासाठी 353.32 कोटी MSRDC च्या अंदाजापेक्षा 18.18% आणि 21.15% जास्त होत आहे. त्यामुळे MSRDC आणि  बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे. 



या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती 
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)

Konkan Railway | “…….तर सावंतवाडी स्थानकाच्या उत्पन्नात ५०% वाढ झाली असती.”

   Follow us on        
सावंतवाडी, प्रतिनिधी: गर्दीच्या स्थानकांत गाडयांना थांबे दिलेत कि प्रवासी संख्या वाढते आणि परिणामी  त्या स्थानकाचे उत्पन्न वाढते हे सरळ गणित आहे. गेल्या वर्षी गोवा आणि दक्षणेकडील  काही स्थानकावर गाडयांना थांबे मंजूर झालेत, त्यांचे फलित म्हणून त्या त्या स्थानकाचे उत्त्पन्न चांगल्या टक्क्यांनी वाढले. गोव्याच्या कानाकोना या स्थानकावर गांधीधाम-नागरकोईल आणि नेत्रावती या गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन त्या स्थानकांच्या उत्पन्नात २३२% भरीव वाढ झाली. तर बारकुर या स्थानकावर मत्यगंधा या गाडीला थांबा देण्यात आला. त्या स्थानकाचे उत्पन्न सुमारे ४४% वाढले.
मात्र गरज आणि मागणी असूनही कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी (टर्मिनस) स्थानकावर गेल्या काही वर्षात गाडयांना थांबे न देऊनही या स्थानकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याची दिसत आहे.  २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात अनुक्रमे १२% आणि ९% इतकी वाढ झाली. मागणी आणि गरज असूनही एकाही गाडीला येथे थांबा दिला नसताना ही वाढ झाली ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही नियमित गाडयांना येथे थांबे दिले असते तर  या स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास ३०% ते ५०% ने वाढ झाली असती असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.



सावंतवाडी स्थानकांच्या टर्मिनस चे काम रखडले आहे. अनेक सुविधांचा अभाव आहे. स्थानकाचे बाहेरून सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे पण काही मूलभूत बाबींचा पण विचार करणे गरजेचे आहे.  येथील प्लॅटफॉर्म वर पुरेशा प्रमाणात निवारा शेडची सोय नाही; त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. इतर स्थानकावर गाड्यांचे थांबे सहज मंजूर होत असताना येथे अत्यंत गरज असताना वारंवार आंदोलने, मागण्या करूनही थांबे का मंजूर होत नाही आहेत हा एक यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.

आंबोलीत पुन्हा जमीन हडपण्याचा प्रयत्न; वातावरण तापणार

भलताच सातबारा दाखवून भूमिअभिलेख अधिकार्‍यांना हाताशी धरून जमीन प्रयत्न. स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा. 

   Follow us on        

आंबोली, दि-३०:– महिन्याभरापूर्वी येथील जमीन बेकायदा हडपून त्यावर बांधकाम केल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. तसाच प्रकार आंबोलीत दुसऱ्या भूखंडात घडत आहे. सर्वे क्रमांक ८४ड मध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असून, भलताच सातबारा दाखवून आपली नावे असल्याचे सांगत भूमिअभिलेख ला हाताशी धरत मोजणी करत आहे,याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

23 नंबर सर्वे मध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्याला एक महिना ही पूर्ण न होता परत तोच प्रकार आंबोलीत चालू आहे आंबोली मधील सर्वे नंबर 84 ड महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये परप्रांतीयांनी सर्वे करून जमीन हडपण्याचा प्रकार चालू केला आहे. आंबोलीतील जमिनी महाराष्ट्र शासनच्या नावावर करून सरकारचा धन दांडगे आणि भूमापिया यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र शासन या नावाने सातबारा असूनही भूमी अभिलेख अधिकारी पोलीस प्रोटेक्शन सह महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा सर्वे करत आहेत आणि भूमाफियांना जमीन वाटप करत आहेत .महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परप्रांतीयांचा परस्पर सर्वे करून भूमी अभिलेख काय सिद्ध करत आहे असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे आंबोलीतील भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत परप्रांतीयांनी अतिक्रमण केले तर पुन्हा एकदा त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

धक्कादायक! सावंतवाडी तालुक्यातील वेत्येत सापडली मानवी हाडे

   Follow us on        

सावंतवाडी दि. २८ मे. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे काल संध्याकाळी येथील एका स्थानिकाला मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

 

खळबळजनक: रत्नागिरीतील कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ जणांची फसवणूक केल्याचे उघड; गुन्हा दाखल

   Follow us on        
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search