- कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
- कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
- “अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
- कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
- महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
- कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
- मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.
Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.
बॅनरमधील मजकूर काय आहे ?
“प्रिय दिपकभाई,
म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.
मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.
तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.
आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??
भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.










