Category Archives: कोकण रेल्वे

मेमू स्पेशल दादरपर्यंत विस्तारित करा; चाकरमान्यांची रेल्वेकडे मागणी

Konkan Railway News : पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला लाखो मुंबईकर चाकरमानी कोकण रेल्वेने कोकणात दाखल होतात. यासाठी मध्यरेल्वेच्या सहकार्याने मेमू स्पेशल गाडी दिव्यावरून सोडण्यात येणार आहे. ही गाडी रत्नागिरीपर्यंत धावणार आहे. ही गाडी दिव्याऐवजी दादरवरून सोडावी, अशी मागणी कोकणवासी प्रवाशांनी केली आहे. यासाठी रेल्वेला पत्रही पाठवण्यात आले आहे.
कोकण रेल्वेमार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या १५६ फेऱ्या जाहीर नियमित गाड्यांसह यापूर्वी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे गणपती उत्सवातील आरक्षण फुल्ल झाल्यामुळे मध्यरेल्वेने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यानुसार २०२३ मधील गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. या आधी गणेशोत्सवात डेमू तसेच मेमू स्पेशल गाडीचा प्रयोग चिपळूणपर्यंतच करण्यात आला होता. त्यापुढे मेमू स्पेशल गाड्या चालवल्या जात नव्हत्या; मात्र येत्या सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडून दिवा ते रत्नागिरी मार्गावर प्रथमच मेमो स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत रत्नागिरी स्थानकापर्यंत प्रथमच मेमू स्पेशल गाडी धावणार आहे. रेल्वेने यंदा गणेशोत्सवासाठी दिवा येथून चिपळूण तसेच रत्नागिरीसाठी मेमू स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत; मात्र मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांचा विचार करता तसेच यापूर्वी अनेक वर्षे सुरू असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यातूनच रत्नागिरीला येत असल्यामुळे पश्चिम उपनगरातील कोकणवासीय जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे खास गणेशोत्सवासाठी रत्नागिरीपर्यंत चालवण्यात येणारी मेमू स्पेशल गाडी दिव्याऐवजी दादरवरून रत्नागिरीपर्यंत चालवावी, अशी मागणी आहे. ही गाडी दिव्यावरून सोडल्यामुळे त्याचा उपयोग दादर आणि त्या परिसरातील चाकरमान्यांना होत नाही. त्यांना ही गाडी पकडण्यासाठी दिव्यापर्यंत यावे लागते. ही गाडी सुटण्याची वेळ सकाळची असल्यामुळे दादरवरून प्रवाशांना एक ते दीड तासआधी बाहेर पडावे लागते. साहित्य घेऊन बाहेर पडणाऱ्या या चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन

यंदा प्रथमच धावणारी दिवा ते रत्नागिरी मेमू स्पेशल गाडीच्या ३९ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ही गाडी रोज धावणार आहे. सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी दिवा स्थानकातून रत्नागिरीला ती दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी ती दिवा जंक्शनला पोहोचेल. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली व संगमेश्वर रोड. यंदाच्या गणेशोत्सवात रत्नागिरीपर्यंत प्रथमच धावणाऱ्या गणपती स्पेशल मेमू गाडीला एकूण १२ डबे जोडले जाणार आहेत.

Loading

गणपती विशेष गाडीचे १० डबे ठाणेसाठी राखीव ठेवण्यात यावेत; जलफाऊंडेशनचे मध्यरेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन

मुंबई: गणेशोत्सव काळात कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाडीमधील २४ पैकी १० डबे ठाणे स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता या स्टेशनकरीता राखीव ठेवावेत, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन जल फाउंडेशनच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व व्यवस्थापक, मुंबई विभाग यांना दिले आहे, अशी माहिती जल फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सणांच्या काळात कोकणात कोकण रेल्वेने जाताना आणि परतीच्या प्रवासात खूपच गर्दी असते. गणेशोत्सव हा तर कोकणी माणसाचा आत्मा आहे. गणपती उत्सवाला प्रत्येक कोकणी माणूस गावाकडे मिळेल त्या वाहनाने जातो. कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान अनारक्षित विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी १३ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत सोमवार, बुधवार व शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२ नंतर सुटणार आहे. या गाडीला २४ डब्बे पूर्णपणे अनारक्षित आहेत.घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातून प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांची संख्या लक्षणीय आहे. ते ठाणे येथून प्रवास करतात. त्यांना या गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन या गाडीचे २४ पैकी १० डब्बे ठाणे स्टेशनला राखीव ठेवावेत आणि ते ठाणे स्टेशनवर उघडले जावेत, अशी अपेक्षा आहे.
या महत्त्वाच्या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे प्रमुख महाव्यवस्थापक व रेल्वे व व्यवस्थापन -मुंबई विभाग यांना हे निवेदन दिले आहे. दिनांक ९ रोजी मुंबई येथील कार्यालयात ते फाऊंडेशन मार्फत पोचले आहे, असेही श्री. जाधव यांनी सांगितले.

Loading

वसई-सावंतवाडी नियमित ट्रेनच्या मागणीसाठी खा. विनायक राऊत यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

रत्नागिरी :कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड रेल्वे स्टेशन महाराष्ट्र आणि सावंतवाडी , सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरु करण्यात यावी यासाठी खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी या गाडीच्या मागणीचे निवदेन रेल्वे मंत्र्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की , मोठ्या संख्येने कोकणातील लोक वसई आणि  जवळपासच्या भागात काम आणि व्यवसाय इत्यादीसाठी राहतात. ते त्यांचे मूळ गाव कोकण ते वसई दरम्यान वारंवार प्रवास करतात. मात्र, सध्या वसई रोड स्थानकावरून सावंतवाडीला जाण्यासाठी थेट नियमित गाडी नाही, त्यामुळे कोकण आणि वसई दरम्यान रेल्वेने ये-जा करण्यासाठी दादर आणि ठाणे ही रेल्वे स्थानके हेच पर्याय उपलब्ध असल्याने त्यांची गैरसोय तर होतेच शिवाय त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कोकण रेल्वेमार्गावर वसई रोड ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.  कोकणातील लोकांच्या या  मागणीचा अनुकूलपणे विचार करून कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड स्टेशन (महाराष्ट्र) आणि सावंतवाडी दरम्यान नियमित विशेष ट्रेन त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खा . राऊत यांनी केली आहे

Loading

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी धावणार उधना – मडगाव विशेष गाडी

Konkan Railway News:  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक अतिरिक्त गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
 Train No. 09018 / 09017 Udhna – Madgaon Jn. – Udhna  (Bi-Weekly) Special on Special Fare:
09018 Udhna – Madgaon  Bi-Weekly Special 
ही गाडी शुक्रवारीदिनांक 11/08/2023 या दिवशी  उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
09017 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special 
ही गाडी शनिवार दिनांक 12/08/2023 या दिवशी मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या  नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी , राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती
Composite ( First AC + 2 Tier AC)  – 01 Coach, 2 Tier AC – 02 Coaches, 3 Tier AC – 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches, General – 03 Coaches, SLR – 01, Generator Car – 01. असे मिळून एकूण 22  LHB डबे
आरक्षण
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 09017 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special on Special Fare या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 10 ऑगस्ट पासून अधिकृत संकेतस्थळांवर आणि आरक्षण खिडक्यांवर सुरू होणार आहे.

Loading

कोकणातील १२ रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रत्नागिरी |कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित KRCL आणि सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या स्थानकांवरील कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या कामांचे मुख्यमंत्री  यांच्या हस्ते भूमिपूजन ऑनलाईन पध्दतीने काल करण्यात आले.

खालील १२ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभिकरण :

✅रायगड जिल्हा- वीर, माणगाव आणि कोलाड

✅रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड

✅सिंधुदुर्ग जिल्हा – कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी

Loading

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार्‍या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर…

Konkan Railway News | 09 Aug 2023 18:00
पाश्चिम रेल्वेने नुकत्याच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचे आरक्षण दिनांक 12 ऑगस्ट रोजी अधिकृत संकेतस्थळ आणि तिकीट आरक्षण खिडक्यांवर चालू होणार आहे.
1) Train no. 09019 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special on Special Fare
2) Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare



Konkan Railway News | 08 Aug 2023 21:30 :रेल्वे प्रशासनाने दिलेल्या अधिक माहितीनुसार प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद ते कुडाळ ही एक अजून एक विशेष गाडी चालविणार आहे. त्यामुळे या तिन्ही गाड्यांच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. या गाडीची अधिक माहिती खालीलप्रमाणे
3) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn. – Kudal – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare:
Train no. 09412 Ahmedabad Jn. – Kudal (Weekly) Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १२,१९आणि २६ या तारखांना (मंगळवारी) अहमदाबाद या स्थानकातून सायंकाळी ०९:३० वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी कुडाळ येथे पहाटे ०४ वाजून १० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09411 Kudal (Weekly) – Ahmedabad Jn. Special on Special Fare:
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) कुडाळ या स्थानकातून सकाळी ०६:३० वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी अहमदाबाद येथे पहाटे ०३:३० वाजता पोहचेल
ही गाडी खालील स्थानकांवर  थांबेल 
वडोदरा,सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड,  संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची स्थिती
2 Tier AC  – 02 Coach, 3 Tier AC – 06 Coaches, Sleeper – 08 Coaches,  Second Seating – 04 Coaches , SLR  – 01, Generator Van – 01 असे मिळून एकूण 22 LHB डबे



Konkan Railway News | 08 Aug 2023 19:30: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वेस्टर्न रेल्वेने अजून काही गाड्या कोकण रेल्वेमार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार खालील गाड्या गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येतील.
1) Train No. 09020 / 09019 Udhna – Madgaon Jn. – Udhna  (Bi-Weekly) Special on Special Fare:
09020 Udhna – Madgaon  Bi-Weekly Special 
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १६,२०,२३, २७,३० (बुधवार आणि शनिवार) या दिवशी  उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
09019 Madgaon  – Udhna Bi-Weekly Special 
ही गाडी सप्टेंबर महिन्याच्या १७,२१,२४, २८ आणि ओक्टोम्बर महिन्याच्या १ तारखेला (गुरुवार आणि रविवार) या दिवशी मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या  नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिर, राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती
Composite ( First AC + 2 Tier AC)  – 01 Coach, 2 Tier AC – 02 Coaches, 3 Tier AC – 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches, General – 03 Coaches, SLR – 01, Generator Car – 01. असे मिळून एकूण 22  LHB डबे

2) Train No. 09057 / 09058 Udhna  – Mangaluru Jn. – Udhna (Weekly) Special on Special Fare:

Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Weekly Special 
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १३,२०आणि २७ या तारखांना (बुधवारी) उधाणा येथून सायंकाळी ८ वाजता  सुटून दुसर्‍या दिवशी मंगळरू येथे संध्याकाळी ०६ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Weekly Special 
ही गाडी दि. सप्टेंबर महिन्याच्या १४,२१ आणि २८ या तारखांना (गुरुवारी)  मंगळरू येथून रात्री २०:४५ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ८  वाजता ती उधणा येथे पोहचेल.
ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी, मडगाव, कानकोना, कारवार, अंकोला ,गोकर्णा रोड,कुमता, होन्नावर, मुरुडेश्वर,भटकल,मूकाम्बिका रोड, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरथकाल  स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
Composite (First AC + 2 Tier  AC) – 01 Coach,  2 Tier AC – 02 Coaches,, 3 Tier AC – 06 Coaches,  Sleeper – 08 Coaches,  General – 03 Coaches, Generator Car – 01,  SLR  – 01. असे मिळून एकूण 22  LHB डबे
या गाड्यांच्या आरक्षणाची तारीख अजून जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर करण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या इंदोर-कोचुवेली एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        

Konkan Railway News :पश्चिम रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन क्र 20932 / 20931 इंदूर – कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाडीचे 02 स्लीपर कोच बदलून त्याऐवजी 02 इकॉनॉमी थ्री टायर एसी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

20932 इंदूर-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक १९ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.

20931कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक २२ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.

श्रेणी सध्याची संरचना
सुधारित संरचना बदल
टू टियर एसी0202बदल नाही
थ्री टायर एसी0606बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी 0002२ डबे वाढवले
स्लीपर 0806२ डबे कमी केले
जनरल 0303बदल नाही
जनरेटर कार 0101बदल नाही
एसएलआर0101बदल नाही
पेन्ट्री कार0101बदल नाही
एकूण 2222बदल नाही

Loading

‘अमृत भारत’ योजनेच्या यादीत कोकणातील एकाही स्थानकाचे नाव का नाही?

Konkan Railway News : केंद्र सरकार ‘अमृत भारत’ योजनेद्वारे देशातील ५०८ रेल्वेस्थानकांचे पुनर्वसन करणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ४४ स्थानकांचा समावेश आहे. आच्छर्याची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त गरज असताना कोकणातील एकाही रेल्वे स्थानकाचा समावेश नसल्यामुळे कोकणावर पुन्हा अन्याय झाल्याची भावना कोकणवासीयांत निर्माण झाली आहे.
‘अमृत भारत’ या रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल २५ हजार कोटी रुपये खर्चून देशातील ५०८ स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले; मात्र विकास प्रकल्पांतही कोकणाला नेहमीप्रमाणे वगळले आहे. पहिल्या यादीत कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा समावेश नसल्याने कोकणातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे आवश्यक
संपूर्ण देशात फक्त कोकण रेल्वेच्या मडगाव या एकमेव स्थानकाचा यामध्ये समावेश केलेला आहे. ही यादी बनवताना कोणते निकष वापरले याबाबत हे पाहणे पण महत्वाचे आहे. एक गोष्ट नेहमीच  प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोंकण रेल्वेला अर्थसंकल्पात स्थान न देणे किंवा केंद्र सरकारच्या अशा योजनांपासून वगळण्यात येणे . कोकण रेल्वे KRCL एक स्वतंत्र आस्थापना Companyआहे. ती बांधा- वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर सुरू केली होती. त्यातील ‘बांधा’ हा टप्पा १९९८ ला पूर्ण झाला व तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा सुरू आहे. सर्व कोकणवासीय आता ‘हस्तांतरित करा’ या टप्प्याची वाट पाहत आहेत. सोयीसुविधा व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात स्थान मिळण्याच्या दृष्टीने या महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच कोकण रेल्वेच्या रोहा-मडगाव मार्गाचे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळात व मडगाव-मंगळुरू मार्गाचे नैर्ऋत्य रेल्वेत विलीनीकरण करणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे मत आहे. सध्याची स्थिती पाहता कोंकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे आवश्यक आहे. दुहेरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, त्यासाठी केंद्रसरकारच्या अंदाजपत्रकात तरतूद करणे आवश्यक असल्याने कोंकण रेल्वेचे विलीनीकरण करणे ही काळाची गरज आहे.

Loading

रेल्वेने आणि राजकारण्यांनी ‘वाऱ्यावर’ सोडलेले सावंतवाडी (टर्मिनस?)

सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा‌. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.

कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?

Loading

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ‘या’ गाड्यांवर परिणाम

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन(रत्नागिरी स्थानक वगळून) दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) तिरुनेलवेली- जामनगर (१९५७७) या दि. ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.

2) तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान १ तास थांबवून ठेवली जाणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search